MR/Prabhupada 0253 - भगवद् गीतेत वास्तविक सुख वर्णन केलं आहे



Lecture on BG 2.8 -- London, August 8, 1973

प्रद्युम्न:प्रद्युम्न: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुरणामपि चाधिपत्यम्

(भ गी २।८)

भाषांतर,"ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही." प्रभुपाद: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य हि भौतिक अस्थित्वाची स्थिती आहे. आपण कधी कधी अडचणीत असतो. कधी कधी नाही. सतत,आपण अडचणीत असतो. पण त्याला कधी कधी म्हणतो, कारण अडचणी दूर करण्याकरता, आपण काही प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नाला आनंद समजतो. खरंतर आनंद कुठेही नाही. पण कधी कधी, या आशेवर की: " या प्रयत्नाने, मी भविष्यात आनंदी होईन,"... जसे तथाकथित शास्त्रज्ञ स्वप्न बघतात: "भविष्यात,आपण अमर बनू." अनेकजण हे स्वप्न बघत आहेत. पण जे विद्वान आहेत, ते म्हणतात: कीतीही सुखद असलं तरी भविष्यावर विश्वास ठेऊ नका. तर ती खरी स्थिती आहे. न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य. म्हणून तो श्रीकृष्णांकडे गेला:शिष्यस्तेSहं(भ गी २।७) गेला:शिष्यस्तेSहं (भगवद् गीता २.७). "आता मी तुमचा शिष्य झालो आहे." "तू माझ्याकडे का आला आहेस?" "कारण मला माहित आहे कोणीही या धोकादायक परिस्थितीतून मला वाचवू शकणार नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्(भ गी २।८) नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् (भगवद् गीता २.८). च्छोकम. जेव्हा आपल्याला मोठया अडचणीत टाकलं जात, ते इंद्रियांचे अस्तित्व शुष्क करते. इंद्रियतृप्ती हि आपल्याला आनंदी करु शकत नाही. च्छोषणमिन्द्रियाणाम्. इथे सुख म्हणजे इंद्रियतृप्ती. खरंतर हे सुख नाही. भगवद् गीतेत वास्तविक सुख वर्णन केलं आहे: अतींद्रियं, सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं (भ गी ६।२१). वास्तविक सुख,अत्यन्तिकं, सर्वोच्च सुख, इंद्रियांनी उपभोगलेलं नाही. अतींद्रीय, मागे टाकणारा, इंद्रियांसाठी दिव्य . तो खरा आनंद आहे. पण आपण इंद्रियतृप्तीला सुख मानतो. तर इंद्रियतृप्तीने,कोणीही आनंदी बनू शकत नाही. कारण आपण या भौतिक अस्तित्वात आहोत. आणि आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. खरी इंद्रिय - अध्यात्मिक इंद्रिय तर आपली अध्यात्मिक चेतना जागृत केली पाहिजे. मग अध्यात्मिक इंद्रियांनी आपण आनंद घेऊ शकू. सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं (भ गी ६।२१) इंद्रियांच्या पलीकडे. इंद्रियांच्या पलीकडे म्हणजे... हि इंद्रिय,म्हणजे आवरण. ज्याप्रमाणे मी हे शरीर आहे. खरतर मी हे शरीर नाही,मी आत्मा आहे,मी हे शरीर नाही. पण हे माझ्या खऱ्या शरीराचे,अध्यात्मिक शरीराचे आवरण आहे, त्याचप्रमाणे, अध्यात्मिक शरीराची अध्यात्मिक इंद्रिय आहेत. नाही तर ती निराकार आहेत. निराकार का? हा एक सामान्य समज आहे. ज्याप्रमाणे जर तुम्हाला एक किंवा दोन हात मिळाले तुम्हाला दोन हात मिळाले आहेत. म्हणून जेव्हा काही कापडाने हात झाकला गेला, कपड्याला सुद्धा हात मिळतो. कारण मला हात मिळाला, म्हणून माझ्या पोशाखाला हात मिळाला. कारण मला माझे पाय मिळाले म्हणून माझे आवरण, पोशाखाला पाय मिळाले,विजार, (पँट) हा एक सामान्य समज आहे. कुठून हे शरीर आले? या शरीराचे वर्णन: वासांसि,कपडे. तर कपडे म्हणजे ते शरीराप्रमाणे कापलेले आहेत. ते कपडे आहेत. माझे शरीर कपड्यानुसार बनलेले आहे. हा साधी समज आहे. तर जेव्हा माझ्या सदऱ्याचे हात मला मिळाले,हे माझे स्थूल शरीर आहे. म्हणून मूलतः,अध्यात्मिकदृष्टया, मला माझे हात आणि पाय मिळाले आहेत. अन्यथा,ते कसे आले असते? तुम्ही ते कसे विकसित कराल?