MR/Prabhupada 0255 - त्याचप्रमाणे देवाच्या राज्यात अनेक संचालक असले पाहिजेत, त्याना देवता म्हणतात
Lecture on BG 2.8 -- London, August 8, 1973
तर आता श्रीकृष्ण म्हणतील "ते ठीक आहे. तुम्ही तात्पुरते आहात... तुम्ही लढाईवर जा आणि जेव्हा तुम्हाला राज्य मिळेल,तुम्ही आनंदी व्हाल. मला गुरु करायची आवश्यकता नाही. ते नाही आहे..." सामान्य माणसाप्रमाणे, ते विचार करतात की: आम्ही एवढा पैसे मिळवतो. गुरु करण्याचा काय उपयोग आहे? मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने सर्वकाही समजू शकतो. आणि दुसरा मूर्ख आहे: "हो,यत मत तत् पथ. जे काही त्यांचे मत आहे, ते ठीक आहे. तुम्ही तुमची स्वतःची मत तयार करू शकता." हे चाललं आहे. देवाला समजण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची मत बनवू शकता. तर सर्व मूर्ख, ते त्यांची स्वतःची मत बनवतात. नाही ते शक्य नाही. म्हणून अर्जुन म्हणतो: अवाप्य भूमावसपत्नमृद्धं (भ गी २।८) हा फार महत्वाचा शब्द आहे, सपत्नी. सपत्नी म्हणजे " प्रतिस्पर्ध्याच्या पत्नी दुसरी -पत्नी जर एखाद्याला दोन,तीन पत्नी बायका असल्या... दोन,तीन का? आपल्या देवाला १६.१०० होत्या तरं हा देव आहे. सपत्न्या, पण तिथे स्पर्धा नव्हती. तुम्हाला कृष्ण पुस्तकात सगळ्या राण्यांच्या बोलण्यात सापडेल, जेव्हा त्या द्रौपदीशी बोलत होत्या. प्रत्येक पत्नीने वर्णन केले होते की ती किती श्रीकृष्णांची दासी बनण्यास उत्सुक होती. कोणीही प्रतिस्पर्धी नाही. भौतिक जगात एखाद्याला एका पेक्षा जास्त पत्नी असतील तर तिथे चढाओढ असते. प्रतिस्पर्धा. हे उदाहरण श्रीमद् भागवतात दिले आहे की ज्याप्रमाणे आपल्याला आपली इंद्रिय मिळाली आहेत, त्याप्रमाणे, जर एखाद्याला अनेक पत्नी असतील, तर एक पत्नी त्याला हिसकावून घेते. "तू माझ्या खोलीत ये," दुसरी बायको खेचते:"तू माझ्या खोलीत ये." तर तो गोंधळतो. त्याचप्रमाणे आपल्याला या बायका,इंद्रिय मिळाल्या आहेत. डोळे खेचत आहेत: "कृपया चित्रपट बघायला चल." जीभ खेचत आहे: "कृपया उपहारगृहात चल." हात कुठेतरी नेत आहेत. पाय कुठेतरी नेतात. आपली स्थिती अशी आहे. तोच माणूस, ज्याला अनेक पत्नी मिळाल्या आहेत आणि त्याला वेगवेगळ्या खोलीत खेचत आहेत. हि आपली परिस्थिती आहे. तर हि स्थिती का आहे? कारण या पत्नी प्रतिस्पर्धी आहेत. इथे;सपत्नमृद्धं. जर अनेक राजे एका मालमत्तेवर हक्क गाजवायला असतील,तर अडचण आहे. . आणि अर्जुन म्हणतो:अवाप्य भूमावसपत्नमृद्धं(भ गी २।८) "संपत्तीवर हक्क गाजवण्यासाठी दुसरे कोणी दावेदार नाहीत. एकमेव मी मालक आहे, जरी मला हि संपत्ती मिळाली, राज्यं असे राज्य, सुराणामपि चाधिपत्यम् केवळ या जगाचे नाही, पण उच्च ग्रह प्रणालीचे सुद्धा…" हि माणसं चंद्र ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तिथे सुद्धा दुसरे राज्य आहे, दुसरे राज्य. तर ते राज्य उच्च दर्जाच्या जीवांच्या मालकीचे आहे. ज्यांना देवता म्हणून ओळखलं जात. ते खूप शक्तिशाली आहेत. ज्याप्रमाणे इंद्र. इंद्र पावसाचा शक्तिशाली नियंत्रक आहे. त्याला वज्र मिळालं आहे. लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत,पण आम्ही ठेवतो. वैदिक साहित्यात काय वर्णन केलंय… विश्वास नाही. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हे सत्य आहे, हे गडगडाट कुठून येत आहे. पावसाची व्यवस्था कोण करत आहे? कोणीतरी संचालक असला पाहिजे. सरकारी कार्यालयात किंवा राज्यात, तिथे अनेक विभागीय व्यवस्थापक आहेत. त्याचप्रमाणे देवाच्या राज्यात अनेक संचालक असले पाहिजेत, अनेक अधिकारी. त्याना देवता म्हणतात. देवर्षिभूताप्तनृणां पितृणां (श्री भ ११।५।४१) श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार आपल्याला पुरवठा करतात. इंद्राप्रमाणे इंद्र आपल्याला पुरवठा करतो. म्हणून इंद्र यज्ञ, अन्य देवतांचे समाधान करण्याकरता यज्ञ आहेत. श्रीकृष्णांनी इंद्र यज्ञ थांबवला, गोवर्धन तुम्हाला माहित आहे. जेव्हा नंद महाराज इंद्र यज्ञाची तयारी करत होते, श्रीकृष्णांनी सांगितले: "बाबा, इंद्र यज्ञाची आवश्यकता नाही." ते म्हणजे जो कोणी कृष्णभावनामृत असेल त्याच्यासाठी, कोणत्याही यज्ञाची आवश्यकता नाही. विशेषतः या कली युगात,वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करणे खूप कठीण आहे. ते त्रेता युगात शक्य होते. कृतयद ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखैहः(श्री भ १२।३।५२) मखैहः म्हणजे यज्ञ, यज्ञ करणे. यज्ञर्थो र्मणाSन्यत्र लोकोSयं कर्मबन्धनः (भ गी ३।९) तर हे सूत्र,हे मार्गदर्शन,कुणीही त्याच अनुसरण करत नाही. या युगात हे शक्य नाही. म्हणून शास्त्राची आज्ञा आहे: यज्ञैः संकीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः ज्यांना चांगली बुद्धी प्राप्त झाली आहे, तर इतर अनेक गोष्टींची चिंता करण्यापेक्षा, त्यांनी संकीर्तन यज्ञ केला पाहिजे. हे शास्त्रातील विधान आहे.