MR/Prabhupada 0294 - श्रीकृष्णांना शरण जाण्याचे सहा मुद्दे



Lecture -- Seattle, October 4, 1968

श्रीकृष्णांना शरण जाण्याचे सहा मुद्दे आहेत. शरण जाण्याचा एक मुद्दा, असा विश्वास की "श्रीकृष्ण माझे रक्षण करतील." जसा लहान मुलाला त्याच्या आईवर पूर्ण विश्वास असतो: "माझी आई इथे आहे. इथे काही धोका नाही." विश्वास मी ते पहिले आहे. प्रत्येकाने. मला मिळाले आहे… मी एक व्यावहारिक उदाहरण सांगतो. कलकत्त्यामध्ये, माझ्या तरुणपणी, मी ट्रामने प्रवास करत होतो, आणि माझा धाकटा मुलगा माझ्या बरोबर होता. तो दोन किंवा अडीच वर्षाचा होता. तर चालक, विनोदाने म्हणाला, "मला तुझे भाडे दे." तर तो सर्व प्रथम असे म्हणाला; "माझ्याकडे पैसे नाहीत." चालक म्हणाला, "मग तू खाली उतर." तो लगेच म्हणाला. "इथे माझे वडील आहेत." (हशा) आपण पहा. "तुम्ही मला खाली उतरण्यास सांगू शकत नाही.माझे वडील इथे आहेत." तर हे मानसशास्त्र आहे. जर तुम्ही श्रीकृष्णांकडे गेलात, तर तुम्हाला सगळ्यात मोठया संकटाची सुद्धा भीती वाटणार नाही. हे खरे आहे. अशी गोष्ट म्हणजे कृष्ण. सर्वात मोठे वरदान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा,कृष्ण. आणि श्रीकृष्ण काय सांगतात? कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति(भ.गी. ९.३१) | "माझ्या प्रिय अर्जुना, कुंतीचा मुलगा, अर्जुन, जगात घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही." कधीही नाश होत नाही. कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति. त्याचप्रमाणे भगवद् गीतेमध्ये असे अनेक परिच्छेद आहेत. मी भगवद् गीतेमधील संदर्भ देत आहे कारण ते पुस्तक जगात लोकप्रिय आहे, आणि... समजण्याचा प्रयत्न करा,हे पुस्तक वाचा,अमूल्य ज्ञानाचा खजाना असलेले पुस्तक. तर श्रीकृष्ण सांगतात: अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः

(भ.गी. १०.८)

कोण श्रीकृष्णांची आराधना करू शकतो? ते इथे वर्णन केले आहे, की बुधा. बुधा म्हणजे अतिशय बुद्धिवान व्यक्ती. बुध, बुध म्हणजे ज्ञान, आणि बुधा म्हणजे ज्ञानी, संपूर्ण ज्ञान असलेला. प्रत्येकाला ज्ञानाची ओढ आहे. इथे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आहे. तिथे बरेच विद्यार्थी आहेत. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी इथे आले आहेत. तर ज्याने परिपूर्ण ज्ञान किंवा ज्ञानाचा उच्च स्तर प्राप्त केला आहे, त्याला बुधा म्हणतात. फक्त बुधा नाही पण भाव-समन्वित: भाव म्हणजे उत्साह. एखादा अत्यंत विद्वान आणि हुशार असला पाहिजे, त्याच बरोबर त्याने अध्यात्मिक परमानंद अनुभवला पाहिजे. "अशी व्यक्ती," श्रीकृष्ण सांगतात, इति मत्वा भजन्ते मां. "अशा व्यक्ती माझी पूजा करतात किंवा माझ्यावर प्रेम करतात." जो खूप बुद्धिमान आहे आणि जो अतिशय विलक्षण उत्साही आहे. अशी व्यक्ती श्रीकृष्णांवर प्रेम करते किंवा श्रीकृष्णांची आराधना करते. का? कारण इति मत्वा, "हे समजून घेऊन." हे काय आहे? अहं सर्वस्य प्रभवो मत्तः (भ.गी. १०.८) "मी सर्वांचे उगमस्थान आहे, "सर्वस्य." तुम्ही जे काही आणता, ते आहे, जर तुम्ही शोधत गेलात, तर शेवटी तुम्हाला श्रीकृष्ण सापडतील. वेदांत सुद्धा याच गोष्टी सांगते. ब्रम्हन काय आहे? अथातो ब्रह्म जिज्ञासा.