MR/Prabhupada 0306 - आपण आपले शंकात्मक प्रश्न विचारायला हवेत



Lecture -- Seattle, October 2, 1968

प्रभुपाद : काही शंका? सर्वप्रथम भक्तांकडून. आम्ही प्रश्न स्वीकारतो. जर तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया (भ. गी. ४.३४). सर्वकाही, जर तुम्ही जाणून घेण्याबद्दल गंभीर असाल तर, आपण आपले शंकात्मक प्रश्न विचारायला हवेत व जाणून घायला हवे. होय?

तरुण : एखाद्या व्यक्तीला शब्दांपलीकडील चेतना प्राप्त होते का? किंवा, मला म्हणावेसे वाटते की, शब्दांपलीकडे असा संवाद आहे का जो एक शब्द नसून स्वतः एक ध्वनितरंग आहे, जो ध्वनीसारखा किंवा स्वतः ध्वनी असेल? कदाचित काहीसे 'ऊँ' सारखे? असा काही संवाद आहे का, तुमच्या व माझ्यात, किंवा माझ्यात व माझ्या भावामध्ये, इतरांमध्ये, आपणा सर्वांत? असा काही अनुभव आहे का... ते 'डाँग', 'आँग', यांसारखे आहे का? शाब्दिक संवादाच्या पलीकडे काही आहे का?

प्रभुपाद : होय, हे हरेकृष्ण.

तरुण : हरेकृष्ण.

प्रभुपाद : होय.

तरुण : तुम्ही स्पष्ट करू शकता का? ते कसे शक्य आहे? ते सर्वदा कसे असू शकते? मनुष्य होण्याऐवजी, इंग्रजीसारख्या किंवा अन्य भाषेत बोलण्याऐवजी? ती एक भाषा कशी बोलावी?

प्रभुपाद : ध्वनी कोणत्याही भाषेत निर्माण करता येतो. हरेकृष्ण हे केवळ संस्कृतात ध्वनित केले जाते असे नाही. तुम्ही ते इंग्रजी स्वरातही उच्चारू शकता, "हरेकृष्ण." ही मुले, तीसुद्धा हरेकृष्ण उच्चारत आहेत. त्यामुळे त्यात काहीही कठीण नाही. ध्वनी अधिक महत्त्वाचा आहे. तो कोण ध्वनित करतो हे महत्त्वाचे नाही. जसे की पियानो, तुम्ही स्पर्श कराल, तर "डंग", असे ऐकू येते. एक अमेरिकन किंवा एक भारतीय किंवा एक मुस्लिम वाजवतो आहे हे महत्त्वाचे नाही, ध्वनी ध्वनी आहे. त्याचप्रमाणे, हा हरेकृष्ण या नामांचा पियानो, तुम्ही त्याला केवळ स्पर्श करा व तो ध्वनित होईल. एवढेच. होय?

तरुण (२) : तुम्ही एकांतात ध्यान करता का? जेव्हा तुमचे मन विचलित होते तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही कशाचातरी विचार करता का? तुम्ही त्याला कशावर तरी केंद्रित करता की त्याला स्वतःच स्वच्छंद भ्रमण करू देता?

प्रभुपाद : सर्वप्रथम हे सांग की ध्यानाची तुमची परिभाषा काय?

तरुण (२) : एकांतात शांत बसून राहणे.

प्रभुपाद : हं?

तमाल कृष्ण : एकांतात शांत बसून राहणे.

प्रभुपाद : एकांतात शांत बसून राहणे. ते शक्य आहे? तुम्हाला वाटते की ते शक्य आहे?

तरुण (२) : जर तुम्ही तुमच्या मनाला ऐकून घेणार.

प्रभुपाद : मन तर सदैव कार्यरत असते.

तरुण (२) : ते तुम्हाला विचलित करते.

प्रभुपाद : मग तुम्ही स्तब्ध मनाने कसे काय बसू शकता? मन सदैव कार्यरत असते. असा काही अनुभव आहे का की तुम्ही शांत बसले आहात व मन काहीही क्रिया करत नाहीये? जेव्हा तुम्ही झोपता, मन कार्य करते. तुम्ही स्वप्न पाहत असता. हे मनाचे कार्य आहे. तुम्हाला तुमचे मन शांत असल्याचे केव्हा वाटते?

तरुण (२) : तेच मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न करत आहे.

प्रभुपाद : होय. म्हणूनच, हे मन कधीही शांत नसते. तुम्ही तुमचे मन कोठेतरी केंद्रित करायला हवे. ते आहे ध्यान.

तरुण (२) : ते तुम्ही कोठे केंद्रित करता?

प्रभुपाद : होय, ते आहेत कृष्ण. आम्ही आमचे मन अतिसुंदर अशा पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित करतो. केवळ मनालाच नाही, इंद्रियांना सुद्धा कार्यरत ठेवणे. कारण मन आपल्या इंद्रियांसह कार्यरत असते.