MR/Prabhupada 0317 - आपण श्रीकृष्णांना शरण जात नाहीत, हाच आजार आहे



Lecture on BG 4.7 -- Bombay, March 27, 1974

धर्म काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. तर भगवंत एक आहेत. भगवंत कोठेही असे म्हणून शकत नाही की "हा धर्म आहे आणि हा धर्म नाही." भगवंत म्हणतात, भगवान कृष्ण भगवद्गीतेत म्हणतात... येथे असे म्हटले आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति (भ. गी.४.७), परित्राणाय साधू... पुढच्या श्लोकात ते म्हणाले,

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे ।।
(भ. गी. ४.८)

श्रीकृष्णांची दोन कार्ये. कारण त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे, भूतानामीश्वरः. "मी सर्व जीवांचा नियंता आहे." त्यामुळे जेव्हा धर्माच्या आचरणाची अवहेलना होते, तेव्हा श्रीकृष्णांना दंड व वरदान द्यावे लागते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । दोन गोष्टी. ज्याप्रकारे नियम पाळणाऱ्या नागरिकांना संरक्षण देणे व न पाळणाऱ्यांना दंड देणे हे सरकारचे कार्य आहे. सरकारच्या ही दोन कर्तव्ये आहेत. आणि सर्वोच्च सरकार, कृष्ण... कारण ही संकल्पना कोठून आली आहे? सरकार नियम पाळणाऱ्या लोकांना सुविधा व संरक्षण देते, आणि जे नियम पळत नाहीत, त्यांनाही संरक्षण देते, मात्र दंडासह. त्यामुळे धर्म म्हणजे, ज्याप्रमाणे कृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ. गी. १८.६६). हा आहे धर्म. हा आहे धर्म. आणि आपला धर्म, आपला स्वभावही तोच आहे. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण कोणालातरी शरण गेलेला आहे. प्रत्येकाचे विश्लेषण करा. प्रत्येकासाठी कोणीतरी उच्च असतेच, ज्याला तो शरण गेलेला असतो. मग तो त्याचा परिवार असो, त्याची पत्नी, किंवा त्याचे सरकार, त्याचा समाज, त्याचा राजकीय पक्ष. तुम्ही कोठेही जा, शरण जाण्याचाच स्वभाव दिसून येतो. त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. ही मॉस्कोतील प्राध्यापक कोटोवस्की यांच्यासह झालेल्या संभाषणाच्या वेळची गोष्ट आहे. मी त्यांना विचारले, "आता, आता, तुमचे तत्त्वज्ञान हे साम्यवादी तत्त्वज्ञान आहे. आणि आमचे कृष्णांचे तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानांत फरक कोठे आहे? तुम्ही लेनिनला शरण गेले आहात, आणि आम्ही कृष्णांना शरण गेलो आहोत. यात फरक कोठे आहे?" प्रत्येकाला शरण जावे लागते. तो कोणाला शरण जातो हे महत्त्वाचे नाही. जर योग्य ठिकाणी शरण गेला, तर सर्वकाही योग्यच होईल. जर अयोग्य ठिकाणी शरण गेला, तर काहीच योग्य होणार नाही. हेच तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे आपण शरण जात आहोत. श्री चैतन्य महाप्रभूंनी हेच स्पष्ट केले आहे. जीवेर स्वरूप हय नित्यकृष्णदास (चै. च. मध्य २०.१०८-१०९). आपण शरण जात आहोत. मात्र आपण श्रीकृष्णांना शरण जात नाहीत. हाच आजार आहे. हाच आजार आहे. आणि कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे हाच आजार बरा करणे. हा आजार बरा करणे. यासाठी कृष्णही येतात. ते म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य (भ. गी. ४.७). आणि धर्मस्य ग्लानिः, धर्माचे आचरण करण्याची अवहेलना, जेव्हा अशी अवहेलना होते, कृष्ण म्हणतात, तदात्मानं सृजाम्यहम् । आणि अभ्युत्थानमधर्मस्य । या दोन गोष्टी आहेत. जेव्हा लोक श्रीकृष्णांना शरण जात नाहीत, तेव्हा ते खूप सगळे नवीन कृष्ण तयार करतात. शरण जाण्यासाठी खूप सगळे मूर्ख लोक तयार करतात. हाच अधर्म आहे. धर्म म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे, पण श्रीकृष्णांना शरण जाण्याऐवजी, त्यांना मांजरी, कुत्रे, हे, ते, अशा खूप सगळ्या गोष्टींना शरण जावेसे वाटते. कृष्ण काही तथाकथित हिंदू किंवा ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्माची स्थापना करायला आले नाहीत. नाही. ते खऱ्या धर्माची स्थापना करण्यासाठी आले. खरा धर्म म्हणजे म्हणजे आपण मूळ पुरुषाला शरण जायला हवे. तो खरा धर्म आहे. आपण शरण जात आहोत. प्रत्येकाची काही आदर्श मते असतात. तो त्यांना शरण जातो. मग ते राजकीय असोत, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, किंवा अन्य कोणतेही. प्रत्येकाचा काहीतरी आदर्श असतो. आणि त्या आदर्शांसाठीची एखादी आदर्श व्यक्तीही असते. तर मग आपले कार्य आहे शरण जाणे. हे एक तथ्य आहे. पण आपल्याला माहीत नाही कोणाला शरण जावे. हीच समस्या आहे. आणि अयोग्य ठिकाणी शरण गेल्यानेच सर्व जग गोंधळाच्या अवस्थेत आहे. आपण या शरणाला त्या शरणाशी बदलत आहोत. आता कोणतीही काँग्रेस पार्टी नाही. आता कम्युनिस्ट पार्टी." आणि पुन्हा, "कोणतीही कम्युनिस्ट पार्टी नाही. हा... हा पक्ष, तो पक्ष." पक्ष बदलण्याचा काय उपयोग आहे? कारण हा पक्ष असो किंवा तो पक्ष, ते श्रीकृष्णांना शरण गेलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही श्रीकृष्णांना शरण जात नाहीत, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही. हाच खरा मुद्दा आहे. तळण्याच्या कढईतून आगीत जाण्याने तुमचे रक्षण होणार नाही.