MR/Prabhupada 0337 - तथाकथित सुख, दुःखाची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका



Lecture on CC Madhya-lila 20.103 -- Washington, D.C., July 8, 1976

अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्याशी आपल्याला संघर्ष करावा लागतो. याला अस्तित्वासाठी संघर्ष म्हणतात. आधुनिक शास्त्रज्ञ, ते म्हणतात… हि फार शांततापूर्ण परिस्थिती नाही. सनातन गोस्वामींनी याच प्रश्नांची विचारणा केली होती. अस्तित्वासाठी संघर्ष का केला पाहिजे? सोपे जीवन शांत जीवन का नाही? काही बाह्य घटक, ते आपल्याला विरोध करत आहेत? मला आनंदी व्हायचे आहे, पण विरोध होत आहे तो अस्तित्वासाठीचा संघर्ष. हा प्रश्न असेलच: का? आपल्याला माशीला हाकलावे लागते. मी माशीला काही त्रास न देता बसलो आहे, पण ती हल्ला करते, त्रास देते, बरेच आहेत. जरी आपण कोणताही अपराध न करता बसलात तरी… जसे तुम्ही रस्त्यावरून जात आहात, त्यात काही अपराध नाही, पण एखाद्या घरातून सगळे कुत्रे भुंकायला लागले: "तुम्ही इथे का आला आहात? तुम्ही इथे का आला आहात?" इथे भूंकण्याचे काही कारण नाही, पण कारण ते कुत्रे आहेत, त्यांचे काम "तुम्ही का आला आहात? तुम्ही का आला आहेत?"

त्याचप्रमाणे, सध्याच्या क्षणी आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे स्वतंत्र नाही. इमिग्रेशन विभाग आहे: "तुम्ही का आला आहात? तुम्ही का आला आहात?" बऱ्याच ठिकाणी आम्हाला प्रवेश करण्यास नकार दिला आहे. आम्हाला विमानात प्रवेश करण्यास नकार दिला आहे. "नाही, तुम्ही आत येऊ शकत नाही, परत जा." म्हणून मला परत जावे लागले. बऱ्याच गैरसोयी. पदं पदं यद विपदं ना तेषां (श्रीमद् भागवतम् १०.१४.५८) । या भौतिक जगात, तुम्ही खूप शांतपणे जगू शकत नाही. खूप शांतपणे नाही. अनेक अडचणी आहेत. शास्त्र सांगते, पदं पदं यद विपदं: पावलो पावली धोका आहे. फक्त या जनावरांपासून नाही, मानवी समाज, निसर्ग, ज्याच्यावर आपले काही नियंत्रण नाही. तर अशा प्रकारे, या भौतिक जगात आपले जीवन खूप सुखी नाही आपण चौकशी करण्या इतके प्रगत असले पाहिजे, की एवढे अडथळे का आहेत. हे मानवी जीवन आहे. हे मानवी जीवन आहे.

मग चौकशी कशी करावी? आनंदी कसे बनावे? जीवनाचे ध्येय काय आहे? सनातन गोस्वामी… केवळ सनातन गोस्वामी नाही, ते आपले प्रतिनिधित्व करतोय. आम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही. चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने किंवा चैतन्य महाप्रभूंच्या सेवकांच्या कृपेने एखाद्याचे अज्ञान दूर होऊ शकते… जीवनाचे ध्येय काय आहे, अस्तित्वासाठी संघर्ष काही, मृत्यू का होतो. मला मृत्यू नको आहे, जन्म का आहे? मला आईच्या गर्भात प्रवेश करून, अनेक दिवस बंदिस्त अवस्थेत राहण्याची माझी इच्छा नाही. मला वृद्ध व्हायची इच्छा नाही पण या गोष्टी माझ्यावर लादल्या जातात. म्हणून आपले काम आहे, वास्तविक काम आहे, या प्रश्नांचे निराकरण कसे करायचे, अर्थिक विकासाची व्यवस्था करण्याचे नाही. आर्थिक विकास, जे आपल्या दैवत असेल, ते आपल्याला मिळेलच. आनंद नाहीतर दुःख, आपल्याला मिळेलच. ज्याप्रमाणे सुखासाठी आपण प्रयत्न करत नाही, पण ते येते. ते आपल्यावर लादले जाते. त्याचप्रमाणे, थोडेसे सुख जे तुमच्या नशिबात असेल, ते सुद्धा मिळेल. तो शास्त्राचा सल्ला आहे. कृत्रिमरीत्या आनंद मिळवण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. जे काही सुख तुमच्या दैवत आहे, ते आपोआप मिळेल. ते कसे मिळेल? यथा दुःखं अयत्नतः. त्याच मार्गाने. ज्याप्रमाणे तुम्ही दुःखासाठी प्रयत्न करत नाही, पण ते तुमच्यावर कोसळते. त्याचप्रमाणे, अगदी तुम्ही सुखासाठी प्रयत्न केला नाही, जेकाही तुमच्या नशिबी आहे ते तुम्हाला मिळेल. म्हणून तथाकथित सुखाची आणि दुःखाची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्या मूल्यवान वेळ जीवनाचे ध्येय काय आहे हे समजण्यात घालवा. इतक्या समस्या का आहेत, तुम्हाला अस्तित्वासाठी संघर्ष का करावा लागतो. हे तुमचं काम आहे… हे कृष्णभावनामृत आंदोलन आहे. आम्ही लोकांना समस्या जाणण्यासाठी प्रवृत्त करत आहोत. हि सांप्रदायिक किंवा तथाकथित धार्मिक चळवळ नाही. हि शैक्षणिक सांस्कृतिक चळवळ आहे. प्रत्येक व्यक्तीने जीवनाचे ध्येय काय आहे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने अस्थित्वासाठी संघर्ष का आहे हे समजले पाहिजे, काही उपाय आहे, जर अशी काही प्रक्रिया असेल जिथे आपण कोणत्याही गोंधळाशिवाय शांततेत जगू शकू… हे मानवी जीवनात शिकण्यासारखे आहे, आणि एखाद्याने विनंती केली पाहिजे… सनातन गोस्वामींप्रमाणे. ते मंत्री होते, खूप शिकलेले होते, पण ते चैतन्य महाप्रभूंकडे गेले. म्हणून आपण चैतन्य महाप्रभू किंवा त्यांच्या प्रतिनिधीना शरण गेले पाहिजे तव्दिध्दि प्रणिपातेन (भ.गी. ४.३४) । आव्हानात्मक नाही, "तुम्ही मला देव दाखवू शकता का?" हे आव्हान झाले. अशा प्रकारे नाही.

देव सर्वत्र आहे, पण देवाला पाहण्यासाठी आपले डोळे शुद्ध करा. मग तुम्ही आव्हान द्या, "तुम्ही मला देव दाखवू शकता का?" हि वृत्ती आपल्याला मदत करणार नाही. नम्र. तव्दिध्दि प्रणिपातेन. हा शास्त्राची आदेश आहे. जर तुम्हाला शास्त्र, दिव्या शास्त्र समजून घेण्याची इच्छा असेल. तद्विद्धि - समजण्याचा प्रयत्न करा - पण प्रणिपातेन, खूप नम्रपणे. अगदी सनातन गोस्वामींप्रमाणे नम्रपणे शरण जाऊन.