MR/Prabhupada 0342 - आपण सर्व वैयक्तिक जीव आहोत, आणि कृष्ण सुद्धा वैयक्तिक जीव आहेत
Lecture on CC Adi-lila 7.7 -- Mayapur, March 9, 1974
आपण सगळे जीव, आपण सर्वजण वैयक्तिक जीव आहोत. कृष्ण सुद्धा वैयक्तिक स्वरूप आहे. हे ज्ञान आहे. नित्यो नित्यानां चेतनस चेतनानां इको यो बहूनाम विदधाति कामान (कथा उपनिषद २.२.१३). कृष्ण, किंवा देव, ते सुद्धा नित्य, शाश्वत आहेत. आपण सुद्धा नित्य,शाश्वत आहोत. ना हन्यते हन्यमाने शरीरे (भ.गी. २.२०) । आपण मरत नाही. ते आध्यात्माचे प्रार्थमिक ज्ञान आहे, ते "मी हे शरीर नाही, मा आत्मा आहे, अहं ब्रम्हास्मि, पण मी व्यक्ती आहे." नित्यो नित्यानां. कृष्ण वैयक्तिक स्वरूप आहे; मी सुद्धा वैयक्तिक जीव आहे. जेव्हा कृष्ण असे सांगतात की सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ.गी. १८.६६), त्याचा अर्थ असा नाही की मी कृष्णांबरोबर एक झालो किंवा कृष्णांच्या अस्तित्वात विलीन झालो. मी माझे स्वतंत्र व्यक्तिव ठेवतो, कृष्ण आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवतात, मी त्यांच्या आज्ञांचे पालन करायला तयार आहे. म्हणून कृष्ण भगवद् गीतेत अर्जुनाला सांगतात की "मी तुला सर्व काही सांगितले आहे. आता तुझा निर्णय काय आहे?" व्यक्तिगत. असे नाही की कृष्ण अर्जुनाला जबरदस्ती करत आहेत. यथेच्छसि तथा कुरु: (भ.गी. १८.६३)" । "आता जे तुला करायचे असेल ते तू कर, हे स्वतंत्र आहे.
हे परम ज्ञान आहे, हे मायावादी तत्वज्ञान, एक होणे,अस्तित्वात विलीन होणे, अस्तित्वात विलीन होणे म्हणजे आपण कृष्णाच्या आदेशात विलीन झालो आहोत. सध्याच्या क्षणी आपली वैयक्तीकता माया आहे, कारण आपण बऱ्याच गोष्टींच्या योजना आखात आहोत. म्हणून तुमचे व्यक्तित्वात आणि माझे व्यक्तित्वात संघर्ष होतो. पण जेव्हा संघर्ष होणार नाही - आपण सहमत होऊ, "केंद्रबिंदू कृष्ण आहे." - ती एकता आहे, असे नाही की आपण आपली वैयक्तिकता गमावतो. तर जसे सर्व वैदिक साहित्यात आणि कृष्णांनी सांगितले आहे, आपण सर्व व्यक्ती आहोत. सर्व व्यक्ती. स्वयं भगवान ऐकले ईश्वर. फरक हा आहे की ते परम शासक आहेत, ईश्वर. ईश्वर म्हणजे शासक. प्रत्यक्षात ते शासक आहेत, आणि आपण देखील शासक आहोत पण आपण अधिनस्थ शासक आहोत. म्हणून ते ऐकले ईश्वर आहेत, एक शासक. ईश्वर परम कृष्ण, ब्रम्हसंहितेमध्ये. एकले ईश्वर. अनेक ईश्वर असू शकत नाही. असा ईश्वर असत नाही. मायावादी तत्वज्ञान प्रत्येकजण देव आहे, तो फार योग्य निष्कर्ष नाही. ती धूर्तता आहे. कृष्ण सांगतात, मूढा. न माम प्रपद्यन्ते मूढा: (भ.गी. ७.१५) । जो सर्वोच्च ईश्वर, परम भगवानांना शरण जात नाही, तुम्हाला पूर्णपणे चांगले माहित असले पाहिजे की "इथे एक मूढ, दुष्ट आहे," कारण असे नाही की, आपण प्रत्येकजण ईश्वर बनू शकू. ते शक्य नाही. ईश्वर शब्दाला काही अर्थ राहणार नाही. ईश्वर म्हणजे शासक. समजा आपण एका गटात आहोत, आपली हि आतंरराष्ट्रीय संघटना. जर प्रत्येकजण शासक किंवा आचार्य बनला, तर ते कसे व्यवस्थापित करता येईल. नाही. तिथे कोणीतरी मुख्य असला पाहिजे. आपल्या व्यावहारिक जीवनाचे हे तत्व आहे. आपण आपल्या राजकीय नेत्याचे अनुसरण करतो. मी जोपर्यंत नेत्याचे अनुसरण करत नाही तोपर्यंत "मी या पक्षाचा आहे" असे म्हणू शकत नाही. ते नैसर्गिक आहे.
तर ते वैदिक कथन आहे, नित्यो नित्यानाम चेतनास चेतनानाम (कथा उपनिषद २.२.१३). एक नेता, समान गुणवत्त्येचा, नित्य असला पाहिजे. मी नित्य आहे, कृष्ण नित्य आहेत, कृष्ण सुद्धा जीव आहेत, मी सुद्धा जीव आहे. नित्यो नित्यनाम चेतनस चेतनानाम. तर कृष्ण आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? फरक असा आहे की दोन नित्य किंवा दोन चेतनस आहे. एकाला एकवचनी म्हणून वर्णन केले आहे, आणि दुसऱ्यांचे अनेकवचनी म्हणून वर्णन केले आहे. नित्यो नित्यनाम. हे नित्यनाम अनेकवचनी आहे. आणि नित्य एकवचनी आहे. तर भगवान नित्य,एकवचनी आहे, आणि आपल्यावर स्वामित्व केले गेले आहे. आपण अनेकवचनी आहोत. हा फरक आहे. आणि तो अनेकवचनी सख्यांवर कसे शासन करत आहे? कारण इको यो बहुनाम विदधाति कामान. तो या सर्व अनेकवचनी संख्येच्या जीवनातील सर्व गरजा पुरवत आहे; म्हणून ते ईश्वर आहेत, ते कृष्ण आहेत, ते भगवान आहेत. जो जीवनातील सर्व गरजा पुरवतो, तो ईश्वर आहे, ते कृष्ण आहेत, ते भगवान आहेत. तर आपण चांगल्याप्रकारे समजू शकतो की कृष्ण आपले रक्षण करत आहे. आणि तो आपले रक्षण का करणार नाही? हे सत्य आहे.