MR/Prabhupada 0344 - श्रीमद-भागवत, केवळ भक्तीशी संबंधित आहे
Lecture on SB 3.26.11-14 -- Bombay, December 23, 1974
व्यासदेव, सर्व वैदिक साहित्य लिहिल्यानंतरही ते समाधानी झाले नव्हते. त्यांनी चार वेद लिहिले, नंतर पुराण - पुराण लिहिल्यावर - पुराण म्हणजे वेदांना पूरक - आणि मग वेदांत-सूत्र, वैदिक ज्ञानाचा अंतिम शब्द वेदांत-सूत्र. पण ते समाधानी नव्हते. तर त्याचे आध्यात्मिक गुरु नारद मुनी, त्यांनी विचारले की: "अनेक पुस्तके लिहिल्यावर, मानव समाजाला ज्ञान दिल्यावरही तुला असंतोष का वाटत आहे?" तर ते म्हणाले, श्रीमान, होय, मी मला माहित आहे की मी लिहिले आहे… पण मला समाधान मिळत नाही मला त्याचे कारण माहित नाही." मग नारद मुनींनी सांगितले, "असंतोषाचे कारण आहे तू परम भगवंतांच्या कार्याचे वर्णन केले नाहीस. म्हणून तू समाधानी नाहीस. तू केवळ बहिर्गत बाबींबद्दल चर्चा केली आहेस, पण अंतर्गत बाबींबद्दल, तू वर्णन केले नाहीस. म्हणून तू समाधानी नाहीस . आता तू ते कर." म्हणून व्यासदेवांच्या निर्देशानुसार… एर, नारद मुनी,व्यासदेवांचे आध्यात्मिक गुरु, त्यांचे अंतिम परिपक्व योगदान श्रीमद-भागवतं आहे.
श्रीमद-भागवतं अमलं पुराणं यद वैष्णवानां प्रियं. म्हणून वैष्णव श्रीमद-भागवतंला अमलं पुराणच्या रूपात स्वीकारतात. अमलं पुराणं म्हणजे… अमलं म्हणजे कोणत्याही दोषाशिवाय. सर्व इतर पुराण, ती कर्म,ज्ञान योगाशी निगडीत आहेत. म्हणून ती समलं आहेत, भौतिक दोषांनी युक्त. आणि श्रीमद भागवतं, भक्ती योगाशी निगडीत आहे: म्हणून ते अमलम आहे. भक्ती म्हणजे सर्वोच्च भगवंतांशी थेट संबंध, भक्ती आणि भगवान आणि व्यवहार भक्ती आहे. भगवान आहेत आणि भक्त आहे, जसे स्वामी आणि दास. आणि स्वामी आणि दास यांच्यातील नाते, व्यवहार, सेवा आहे.
म्हणून सेवा हि केलीच पाहिजे… हि आपली नैसर्गिक, नैसर्गिक वृत्ती आहे आपण सेवा करतो. पण दूषित असल्या कारणाने, हि चेतना,चित्त, या भौतिक बाबींनी दूषित असल्यामुळे, आपण वेगळ्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणी कुटुंबाची, समाजाची, देशाची सेवा करायला इच्छुक असतो, मानवता, अधिकाधिक, पण या सर्व सेवा दूषित आहेत. पण जेव्हा तुम्ही कृष्णभावनामृतामध्ये सेवा करायला सुरवात करता, ती परिपूर्ण सेवा आहे. ते परिपूर्ण जीवन आहे. तर कृष्णभावनामृत आंदोलन मानव समाजाला सेवा करायच्या स्तरापर्यंत उभे करण्याचा प्रयत्न करत आहे.
खूप खूप धन्यवाद.