MR/Prabhupada 0352 - हे साहित्य संपूर्ण जगात क्रांती घडवेल
Lecture on SB 1.8.20 -- Mayapura, September 30, 1974
तद-वाग-विसर्गो जनताघ-विप्लव:. कोणतीही रचना जिथे आहे तिथे, कुठेतरी आणि कधीतरी सर्वेश्वराची स्तुती, कोणतेही साहित्य आहे. तद-वाग-वीस… जनताघ-विप्लव:. अशा प्रकारचे साहित्य क्रांतिकारी आहे. क्रांतिकारी. विप्लव:. विप्लव म्हणजे कृतिकारी. कोणत्या प्रकारचे विप्लव? जसे क्रांतीमध्ये, एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षावर विजय मिळवतो, किंवा एक प्रकारचे… आपण समजतो क्रांती म्हणजे राजकीय क्रांती. एक प्रकारचा राजकीय विचार इतर प्रकारच्या राजकीय विचारांवर मत करतात. त्याला क्रांती म्हणतात. तर इंग्लिश शब्द क्रांती, आणि संस्कृत शब्द विप्लव. तर तद-वाग-विसर्गो जनताघ-विप्लव: जर असे साहित्य सादर केले… जे आम्ही सादर करतो. आम्ही फार मोठे विद्वान नाही. आमचे… आमच्याकडे अशी काही खास पात्रता नाही की आम्ही खूप चांगले साहित्य लिहू शकू. त्याच्यात खूप चुका असू शकतील किंवा… जे काही आहे ते. पण ते क्रांतिकारी आहे. ते खरे आहे. हे क्रांतिकारी आहे. नाहीतर, मोठे मोठे विद्वान,प्राध्यापक, विद्यापीठ अधिकारी, ग्रंथपाल, ते का स्वीकारत आहेत? ते विचार करतात त्यांना माहित आहे की हे साहित्य संपूर्ण जगात क्रांती आणेल. कारण पाश्चिमात्य जगात, असे विचार नाहीत. ते सहमत आहेत. तर का ते क्रांतिकारक आहे? कारण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, कृष्णाची स्तुती करण्याचा प्रयत्न केला आहे. जास्ती काही नाही. हा साहित्यिक व्यवसाय नाही. तर हे स्वीकारले जाते. तद-वाग-विसर्गो जनताघ-विप्लवो यास्मिन प्रति-श्लोकं अबद्ध… श्लोक (श्रीमद् भागवतम् १.५.११) ।
संस्कृत श्लोक लिहिण्यासाठी, त्याला प्रगाढ ज्ञान आवश्यक आहे त्यासाठी कितीतरी नियम आहेत. असे नाही की तुम्ही काहीही लिहिता आणि तुम्ही कवी बनता. नाही. भरपूर नियम आहेत, एखाद्याला अनुसरण करावे लागेल. मग एखादा रचना करू शकेल. जसे तुम्ही पाहिले, त्याला लय आहे.
- तथा परमहंसानां
- मुनीनाममलात्मनाम्
- भक्तीयोगविधानार्थं
- कथं पश्येम हि स्त्रियः:
- (श्रीमद् भागवतम् १.८.२०)
त्याला लय आहे. प्रत्येक श्लोक, त्याला लय आहे. तर, जरी ते मानक लयीत लिहिले नसेल, आणि काहीवेळा तुटक्या फुटक्या भाषेत असले. तरीही, कारण त्यात भगवंतांची स्तुती आहे… नामान्य अनन्तस्य. अनंत सर्वोच्च, अमर्यादित आहे. त्यांची नावे तिथे आहेत. म्हणून माझे गुरु महाराज स्वीकार करत. जर अनन्तस्य, अनंताचे, सर्वोच्च, तिथे नाव आहे - "कृष्ण," "नारायण," "चैतन्य." अशी - तर श्रृण्वंति गायंति गृणंति साधवः साधवः म्हणजे साधू व्यक्ती. अशा प्रकारचे साहित्य, जरी ते तुटक्या फुटक्या भाषेत लिहिले असले, तरी ते ऐकतात. ते ऐकतात कारण त्यामध्ये भगवंतांची स्तुती आहे. तर हि प्रणाली आहे. कोणत्याना कोणत्या मार्गाने, आपण श्रीकृष्णांशी संलग्न असले पाहिजे मय्यासक्त मनः पार्थ. हेच केवळ आपले काम आहे, आपण कसे जोडले जाऊ शकतो… काही फरक पडत नाही, मोडक्या भाषेत. काहीवेळा… अनेक संस्कृत आहेत… मला म्हणायचे आहे, योग्यरीत्या उच्चारलेले नाही. जसे आम्ही करतो. आम्ही खूप तज्ञ नाही. अनेक तज्ञ संस्कृत उच्चारण करता आहेत, वेद-मंत्र. आणि आम्ही फार तज्ञ नाही. पण आम्ही प्रयत्न करतो. आम्ही प्रयत्न करतो. पण श्रीकृष्णांचे नाव तिथे आहे. म्हणून ते पुरेसे आहे. म्हणून ते पुरेसे आहे.