MR/Prabhupada 0365 - याला (इस्कॉन) एक मल समाज बनवू नका - एक मध समाज बनवा



Lecture on SB 1.5.9-11 -- New Vrindaban, June 6, 1969

तर इथे नारद मुनी सल्ला देतात की "तू समजावून सांगितले आहेस… धर्मादायश्च चा अर्थ. "वेगवेगळी साहित्यात तू समजण्यासारख्या भाषेत संपूर्ण वेद विभागले आहेस, पुराण." पुराण म्हणजे वेदांना पूरक, वैदिक ज्ञान गुणवत्तेनुसार समजावण्यासाठी. प्रत्येक मनुष्य भौतिक स्वरूपाच्या गुणांच्या प्रभावाखाली असतो. काही अंधारात किंवा तमोगुणात आहेत. काही रजोगुणात आहेत. आणि काही मिश्र तमोगुण आणि रजोगुणात आहेत. आणि काही सत्वगुणात आहेत. सर्व एका पातळीवर नाही. मनुष्यांचे निरनिराळे वर्ग आहेत. आपल्या हयग्रीवाच्या ग्रंथालयाप्रमाणे तिथे तुम्हाला अनेक तत्वज्ञान विषयक पुस्तके आढळतील. पण जर तुम्ही सामान्य व्यक्तीकडे गेलात तर तुम्हाला तत्वज्ञानशून्य साहित्य, काल्पनिक आणि लैगिक मानसशास्त्र आढळेल, असं आणि तसं मिळेल. आवडीप्रमाणे. आवडीप्रमाणे, वेगवेगळी आवड. कारण माणसांचे वेगवेगळे वर्ग आहेत. ते पुढच्या श्लोकात सांगितले आहेत. नारदमुनी सांगतात,

न यद्वचच्श्रिपदं हरर्यशो
जगत्पवित्रं प्रगृणीत कर्हिचित्
तद्वायसं तीर्थमुशन्ति मानसा
न यत्र हंसा निरमन्त्युभिक्क्षयाः
(श्रीमद भागवतम् १.५.१०)

तर त्यांनी वेदांत तत्वज्ञानासह व्यासदेवानी लिहिलेल्या सर्व पुस्तकांची तुलना केली त्यांनी सांगिले की हे वायसं तीर्थं आहे. वायसं म्हणजे कावळे. कावळे, आणि त्यांचे आनंदाचे स्थान. तुम्ही कावळे बघितले आहेत? भारतात आमच्याकडे पुष्कळ कावळे आहेत. तुमच्या देशात खूप कावळे नाहीत… पण भारतामध्ये कावळे, ते सर्व घाणेरड्या गोष्टीत आनंद घेतात. कावळे. आपल्याला ते अशा ठिकाणी आढळतील जिथे वाईट गोष्टी, कचरा फेकला जातो. ते कचरा घेतील, घाण शोधतील. पु कुठे आहे. कुठे… काय… माश्यांप्रमाणे. ते विष्ठेवर बसतील. माक्षिकं भ्रमरा इच्छन्ति. आणि मधमाश्या त्या मध घेण्याचा प्रयत्न करतील आपण प्राण्यांमध्ये देखील पाहू शकता. मध… मधमाश्या कधीही विष्ठेवर येणार नाहीत. आणि सर्वसाधारण माश्या, त्या कधीही मध गोळा करायला जात नाहीत.

त्याचप्रमाणे, पक्षामध्ये, प्राण्यांमध्ये, मानवी समाजामध्ये विभाग आहेत. तर तुम्ही अपेक्षा करू शकत नाही की साधारण व्यक्ती कृष्णभावनामृतकडे येईल. तुम्ही बघा? कारण त्यांना माश्या बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते, ते मल आवडेल. तुम्ही बघत आहात? आधुनिक शिक्षण लोकाना माश्या बनण्याचे शिक्षण देत आहे. फक्त मल. इथे नाही, कृष्णभावनामृत. पण तुम्ही ते एक मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे बनवा. जे मधाच्या शोधात आहेत, त्यांना सापडेल, "इथे काहीतरी आहे." तुम्ही बघत आहात? याचा एक मल समाज बनवू नका. तुम्ही बघत आहात ? त्याचा एक मध समाज बनवा. जे मधाच्या शोधात आहेत, कमीतकमी त्यांना एक संधी द्या लोकांना फसवू नका. तर ते येतील.

तर इथे नारद मुनी सांगतात की "तु अनेक पुस्तके संकलित केली आहेस, ठीक आहे. कल्पना काय आहे? कल्पना आहे धर्मादयः तू धार्मिक तत्व शिकवत आहेस." वीस, विंशति धर्म-शास्त्र आहेत. मनू संहिता, पराशर मुनींचा कायदा, आणि सामाजिक रीतिरिवाज, हे,ते. असे बरेच काही आहे. ते मूलतः वेगवेगळ्या मुनींनी लिहिले आहे, पण व्यासदेवानी ते योग्य वापरासाठी संकलित केले आहे. लोक ते समजू शकतील तर त्यांनी सर्व पुस्तके मानवी समाजच्या निसंकोच वापरासाठी स्पष्ट केली आहेत. धार्मिक कसे व्हावे,आर्थिक स्थिती कशी विकसित करायची, कसे जाणायचे मुक्ती म्हणजे काय, कसे समाधानी राहायचे, मर्यादित, इंद्रियतृप्ती. ज्याप्रमाणे पुस्तकात, व्यासदेवांच्या पुस्तकात, तुम्हाला हे वेगवेगळे प्रकार सापडतील… जे मांस खातात त्यांच्या सारखे. ते सुद्धा व्यासदेवांद्वारा सांगितले आहे, तामसिक-पुराणामध्ये. पुराण अशा व्यक्तीसाठी आहे जी तमोगुणात आहे. तर ते कोणलाही नाकारत नाहीत. त्यांनी अशाप्रकारे पुस्तके लिहिली की कोणतीही व्यक्ती पुस्तकं वाचेल… शाळेसारखे तिथे वेगवेगळे वर्ग असतात आणि वेगवेगळ्या वर्गासाठी निरनिराळ्या पुस्तकाची शिफारस केलेली असते. त्याचप्रमाणे, व्यासदेवानी सुंदर पद्धतीने पुराणाच्या रूपात संपूर्ण वैदिक साहित्य दिले. की अशाप्रकारे पुस्तके वाचून, कोणताही माणूस उच्च स्थितीपर्यत पोहोचेल. उदाहरणादाखल घ्या की एखादा नशा, मांस खाणे, कामजीवन यात आसक्त आहे - कारण ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे, लोके व्यवायामिष-मद्य-सेवा नित्या हि जन्तोर्न हि तंत्र चोदना (श्रीमद भागवतम् ११.५.११),कोणालाही शिकवायची गरज नाही. कोणालाही लैगिक संभोग कसा करावा शिकवायची गरज नाही. कोणलाही कसे घ्यायचे, मला म्हणायचे आहे, कशी नशा घ्यायची हे शिकवायची गरज नाही.

तुम्ही पाहिले नाही नशेखोर, मद्यपान केलेली व्यक्ती, ते स्वतःच बनले आहेत? असे विद्यापीठ नाही. अशी काही शैक्षणिक व्यवस्था नाही की तुम्ही बना… एलएसडी अशाप्रकारे घ्या." नाही. ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नशेखोर बनणे, पान, दारू, एलएसडी, गांजा घेणे, ओह, खूप सहज तुम्ही शिकू शकता. कामजीवनाचा उपयोग करणे… लोके व्यवाय… ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ते बनू शकतात… ते स्वतःच होऊ शकतात. तिथे प्रश्न नाही… मग पुस्तकाचा काय उपयोग आहे? पुस्तके बंधनासाठी आहेत. ते त्यांना माहित नाही.

जेव्हा व्यासदेव सल्ला देतात की लग्नाच्याद्वारे तुम्ही लैगिक संबंध ठेऊ शकता. याचा अर्थ निर्बंध. याचा अर्थ निर्बंध. तुम्ही अनिर्बंध इथे तिथे कामजीवन करू शकत नाही. एक पत्नी किंवा एक पती आहे, आणि ते देखील मर्यादित: फक्त मुलाला जन्म देण्यासाठी लैगिक सबंध होऊ शकतो. तर अनेक गोष्टी. संपूर्ण कल्पना मर्यादा आहे. असे नाही की "कारण मला पत्नी मिळाली आहे. ती कामजीवनासाठी एक मशीन आहे." नाही, नाही. लग्नाचा अर्थ हा नाही. लग्नाचा अर्थ असा नाही. ती मर्यादा आहे. संपूर्ण वैदिक संस्कृती मनुष्याला दिव्य स्तरापर्यंत आणण्यासाठी आहे. त्याच्या सर्व मूर्ख सवयी मर्यादित करून शून्य करण्यासाठी. पण अचानक नाही. हळूहळू, गुणवत्तेनुसार. त्याचप्रमाणे, ज्यांना मांस खाण्याची सवय आहे, "ठीक आहे." वैदिक साहित्य सांगते, "ठीक आहे. तुम्ही मांस खाऊ शकता. पण काली देवीसमोर तुम्ही प्राणी अर्पण करा, मग तुम्ही खाऊ शकता." जेणेकरून जो मनुष्य मांस खातो, तो विद्रोह करणार नाही.