MR/Prabhupada 0369 - माझे शिष्य माझे अंश आहेत



Room Conversation with Life Member, Mr. Malhotra -- December 22, 1976, Poona

श्री. मल्होत्रा: असे कसे असू शकते की भूतकाळातील अनेक ऋषी, त्यांनी अहं ब्रम्हास्मि घोषित केले. प्रभुपाद: (हिन्दी).तुम्ही ब्राम्हण आहात. कारण तुम्ही परब्रम्हचे अंश आहेत. ते मी तुम्हाला आधीच सांगितले आहे, की… सोने, मोठे सोने आणि लहान कण, ते सोनेच आहे. त्याचप्रमाणे, भगवान परब्रम्हन, आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणून मी ब्रह्मन आहे. पण मी परब्रम्हन नाही. अर्जुनाद्वारे कृष्णाला परब्रम्हन म्हणून स्वीकारले जाते: परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान (भ.गी. १०.१२) |

परब्रम्हन. तर परं, हा शब्द वापरला जातो, परमात्मा, परब्रह्मन, परमेश्वर. का? तो फरक आहे. एक सर्वोच्च आहे आणि एक कनिष्ठ आहे. कनिष्ठ ब्रह्मन. तुम्ही ब्रह्मन आहात, यात शंका नाही. पण परब्रम्हन नाही. जर तुम्ही परब्रह्मन आहात, तर तुम्ही परब्रम्हन बनण्यासाठी साधना का करत आहेत? का? जर तुम्ही परब्रह्मन असाल, तर तुम्ही नेहमी परब्रह्मन आहात. तुम्ही या परिस्थितीत का पडलात की तुम्हाला परब्रह्मन बनण्यासाठी साधना करावी लागत आहे? तो मूर्खपणा आहे. तुम्ही परब्रह्मन नाही. तुम्ही ब्रह्मन आहात. तुम्ही सोने आहात, एक लहान कण. पण तुम्ही म्हणू शकत नाही की मी सोन्याची खाण आहे. "तुम्ही असे म्हणू शकत नाही." परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान (भ.गी. १०.१२) |

गोपाल कृष्ण: तर तो आता जाण्याची वेळ झाली का ते तपासत आहे. तुम्हीपण आमच्या बरोबर येणार आहात का? खूप छान.

प्रभुपाद: थोडे पाणी आण. हे, माझे शिष्य ते माझे अंश आहेत. त्यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्य चालले आहे. पण जर त्यानी सांगितले की मी माझ्या गुरु महाराज्यांच्या तुल्य आहे. तर तो अपराध आहे.

श्री. मल्होत्रा: कधी कधी गुरुची इच्छा असते की माझे शिष्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ असावे.

प्रभुपाद: त्याचा अर्थ तो खालच्या स्तरावर आहे. सर्वप्रथम आपण हे स्वीकारले पाहिजे.

श्री. मल्होत्रा: जसे प्रत्येक वडील आपल्या मुलांना मोठे झालेले पाहू इच्छितात.

प्रभुपाद: होय, तरीही वडील वडील राहतात, आणि मूल वडील बनू शकत नाही.

श्री. मल्होत्रा: वडील वडील राहतात पण त्यांना वाटते की, प्रगती करु शकतात…

प्रभुपाद: नाही, नाही. वडील हे पाहू इच्छितात की मुलगाही तितकाच पात्र आहे. पण तरीही वडील वडील आहेत, आणि मूल मूल आहे. हे शाश्वत आहे. त्याचप्रमाणे, भगवंतांचा अंश खूप शक्तिशाली असू शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की तो भगवान बनला.

श्री. मल्होत्रा: इतर परंपरा, गुरु शिष्य, मग शिष्य गुरु बनतात, मग शिष्य. गुरु बदलू शकतात.

प्रभुपाद: ते बदलू शकत नाहीत. जर गुरु बदलले तर, शिष्य कार्य करतात, पण तो कधी म्हणू शकत नाही की मी गुरुच्या बरोबरीचा किंवा गुरु बरोबर एक झालो. ते तसे नाही.

श्री. मल्होत्रा: मी विचार करीत आहे, स्वामीजी, तुमचे गुरु महाराज तुमच्याद्वारे प्रचार करीत आहेत, आणि तुम्ही त्यांच्याद्वारे प्रचार करीत आहात

प्रभुपाद: होय.

श्री. मल्होत्रा: तर शिष्य गुरु आहे आपल्या शिष्यांच्या माध्यमातून.

प्रभुपाद: ते ठीक आहे. एवं परंपरा प्राप्तम (भ.गी. ४.२) । पण तो झाला नाही. तो बनला आहे… तो गुरूचा प्रतिनिधि, देवाचा प्रतिनिधि असू शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की तो देव बनला.

श्री. मल्होत्रा: पण तो आपल्या शिष्यां बरोबर गुरु बनतो.

प्रभुपाद: ते ठीक आहे.

श्री. मल्होत्रा: गुरूच्या बरोबरीचा नाही.

प्रभुपाद: बरोबरीचा नाही, प्रतिनिधी. बरोबरीचा नाही. मी या माणसाला प्रतीनिधिच्या रूपात पाठवले, आणि तो खूप तज्ज्ञ असू शकतो. खूप चांगले कार्य करतो, तरीही तो माझ्या बरोबरीचा असू शकत नाही. तो माझ्या प्रतिनिधिच्या रूपात कार्य करीत आहे. ती एक वेगळी गोष्ट आहे. पण असे नाही की तो मूळ मालक बनला.

श्री. मल्होत्रा: पण तुमच्या शिष्यांप्रमाणे, तुम्हाला गुरु मानले जाते.

प्रभुपाद: पण ते कधीही म्हणणार नाहीत की ते माझ्या बरोबरीचे झाले. "मी प्रगती केली आहे माझ्या गुरूंचे स्थान मिळवण्यासाठी. "कधीही म्हणणार नाहीत. या मुलाप्रमाणे तो नमस्कार करत आहे. तो माझ्यापेक्षा प्रचार करण्यात कुशल असू शकेल. पण तो जाणतो की "मी कनिष्ठ आहे." नाहीतर कसा तो नमस्कार करेल? तो विचार करू शकतो, "ओह, आता मी खूप शिकलो, मी इतका प्रगत आहे. मी त्यांचा श्रेष्ठ म्हणून का स्वीकार करू?" नाही. हे चालू राहते. माझ्या मृत्यूनंतरही, मी गेल्यावरही, तो माझ्या फोटोला नमस्कार करेल.

श्री. मल्होत्रा: पण त्याच्या शिष्यांमध्ये त्याची पूजा केली जाईल...

प्रभुपाद: ते ठीक आहे, पण तो त्याच्या गुरूचा शिष्य राहील. तो कधीही म्हणणार नाही की "आता मी गुरु बनलो, आता मी माझ्या गुरूंची पर्वा करत नाही." तो कधीही म्हणणार नाही. जसे मी करत आहे, पण अजूनही मी माझ्या गुरूंची पूजा करीत आहे. म्हणून मी नेहमी माझ्या गुरूंचा सेवक राहतो. जरी मी गुरु बनलो तरीसुद्धा मी माझ्या गुरूंचा सेवक राहीन.