MR/Prabhupada 0377 - भजहू रे मनचे तात्पर्य



Purport to Bhajahu Re Mana -- Los Angeles, May 27, 1972

तर हे गाणे गोविंद दास यांनी गायले. गोविंद-दास-अभिलाषी रे. त्यांची काय इच्छा आहे? अभिलाषी म्हणजे इच्छा. भजहू रे मन श्री-नंद-नंदन: "माझ्या प्रेमळ मना…" कारण मन आपले मित्रही आहे आणि शत्रूही आहे. जर तुम्ही मनाला प्रशिक्षण दिलेत, तर मन तुमचे मित्र आहे. आणि जर तुम्ही मनाला प्रशिक्षित करू शकत नसाल, तर आपले दुराग्रही शत्रू होईल. स वै मनः कृष्ण-पदरविंदो: (श्रीमद भागवतम ९.४.१८) | म्हणून मनाला सतत कृष्णाच्या पदकमलांशी गुंतवले पाहिजे, मग मन आपोआप नियंत्रित होईल आणि मित्र बनेल. तर गोविंद दास त्यांची इच्छा व्यक्त करीत आहेत: "माझ्या प्रेमळ मना, तू फक्त नंद-नंदनाच्या भक्तिपूर्ण सेवेत गुंतून रहा." ते… ते कृष्ण म्हणत नाहीत. ते नंद-नंदन म्हणतात. भजहू रे मन श्री-नंद-नंदन जर आपण थेट कृष्णाला संबोधित केले, तर ते फार आनंददायी नाही, पण जर आपण म्हणालो कृष्ण: नंद-नंदन, यशोदा-नंदन, देवकी नंदन, पार्थ-सारथी - त्याच्या भक्ताच्या नात्याने - मग तो अधिक आनंदी होतो. तर भजहू रे मन श्री-नंद-नंदन. श्री-नंद-नंदन का? आता, अभय-चरणारविंद रे. जर तू कृष्णाच्या,नंद-नंदनाच्या पदकमलांचा आश्रय घेतला, तर तुला कसलीही चिंता, भय वाटणार नाही.

समाश्रिता ये पद-पल्लव-प्लवं
महत-पदं पुण्य-यशो मुरारे:
भवाम्बुधीरर्वत्सपदं परं पदं
पदं पदं यद्विपदां न तेषां
(श्रीमद भागवतम १०.१४.५८) |

हे भगवत-दर्शन आहे. पदं पदं यद्विपदां. हे भौतिक जग, पदं पदं म्हणजे पावलो पावली संकट आहे. तर आपण कृष्णाच्या पदकमलांचा आश्रय घेतला, महत-पदं पुण्य-यशो मुरारे: समाश्रिता, त्याच्यासाठी कोणताही धोका नाही. अभय-चरणारविंद रे. कृष्णाचा पूर्ण आश्रय घेणे कसे शक्य आहे. जे निर्भय, चिंता रहित, वैकुंठ आहे? दुर्लभ मानव-जनम सत-संगे. जर तू भक्तांच्या संगामध्ये राहिलास तर ते शक्य आहे. जर तू विचार केलास की " आता मी खूप प्रगत झालो आहे. आता मी एकटा राहतो, आणि हरिदास ठाकूर यांचे अनुकरण करतो हरे कृष्ण जप करतो,' तो मूर्खपणा आहे. तू हरिदास ठाकुर यांचे अनुकरण करू शकत नाही. तू भक्तांच्या संगात राहिले पाहिजे. दुर्लभ मानव-जनम सत-संगे. सत-संगे. संतां-प्रसंगां मम वीर्य-संविदो (श्रीमद भागवतम ३.२५.२५) ।

जर तू भक्तांसह राहिलास, तर त्यांच्या संगाने, त्यांच्या बरोबर बोलून. ला भगवंताच्या चेतनेची खरी समज मिळेल. हे खूप व्यवहारिक समज आहे. ज्याप्रमाणे या भौतिक जगात अनेक संघटना, समाज आहेत. व्यापारी, त्यांची स्टोक एक्सचेंज असोसिएशन आहे, जे देवाण घेवाण करण्याचा व्यवसाय करतात. त्यांची संघटना आहे. ते तिथे जातात, आणि त्यांची व्यवसाय सुविधा खूप चांगली असते. त्याचप्रमाणे, अनेक संघ. जर तुम्हाला प्यायचे असेल आणि मजा चाखायची असेल, तुम्ही त्यांच्या बरोबर अनेक संघात आणि संघटनात गेलात आणि तुम्ही कसे प्यायचे, कशी इंद्रीयतृप्ती करायची ते शिकाल. ते संगत खूप महत्वाची आहे. म्हणून, आमचा कृष्णभावनामृत संघ, आम्ही लोकांना आमच्या संगात येण्याची संधी देत आहोत, तर तो कृष्ण काय आहे, कृष्णभावनामृत काय आहे हे समजून घेण्यास सक्षम होईल.

म्हणून गोविंद दास शिफारस करतात, दुर्लभ मानव-जन्म-सत-संगे. मानव. हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो फारच क्वचित प्राप्त होतो. कुत्रांची संघटना, कावळ्यांची संघटना, नाही पण हंस संघटना. अगदी नैसर्गिक संघटना असतात. "समान जातीचे पक्षी एकत्र जमतात." कावळे, ते कावळ्यांच्यात मिसळतात, आणि हंस हंसाच्या समूहात मिसळतात. पांढऱ्या हंसाला स्वच्छ निर्मळ पाणी, सुंदर बाग, त्याला आवडते. कावळ्यांना ते आवडणार नाही. कावळ्यांना घाणेरड्या गोष्टी जिथे फेकलेल्या आहेत तिथे आवडेल. ते तिथे आनंद घेतात. तर त्याचप्रमाणे, नैसर्गिक गुणानुसार, मनुष्य समाजात वेगवेगळ्या संघटना आहेत. पण अशी शिफारस केली आहे की दुर्लभ मानव सत-संगे: कावळ्यां बरोबर नाही तर हंसा बरोबर. तुम्ही हंसाला दूध आणि पाणी दिलेत, तर तो दुधाचा भाग घेईल आणि पाण्याचा भाग बाजूला काढेल. त्याचप्रमाणे, हंस, परमहंस, म्हणजे या मनुष्य जन्मात, जो जीवनाचा आध्यात्मिक भाग घेतो आणि जीवनाचा भौतिक भाग नाकारतो, त्याला हंस, परमहंस म्हणतात.

आपण मिश्रित आहोत. आपले शरीर भौतिक आहे, पण मी आत्मा आहे. तर आपल्याला कल्पना असली पाहिजे, कसे या भौतिक बंधनातून बाहेर पडायचे. ते या भौतिक शरीरातून बाहेर पडेल, पण जेव्हा ते बाहेर येईल तेव्हा भौतिक शरीराचा नाश होईल. खूप चांगले उदाहरण. अग्नी, लाकडात अग्नी असतो, हे सर्वाना माहित आहे. तर तुम्ही अग्नी प्रज्वलित केला, आणि जर तुम्ही ते कोरडे केलेत, तर अग्नी ताबडतोब पेट घेईल. आणि जेव्हा आग पेटलेली असेल, तेव्हा लाकूड जाळून जळेल. लाकूड अस्तित्वात राहणार नाही. त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमची आध्यात्मिक चेतना कृष्ण चेतना जागृत केलीत, जेव्हा ते चांगल्या प्रकारे होईल, तेव्हा आपले भौतिक अस्तित्व समाप्त होईल. हि पद्धत आहे. दुर्लभ मानव-जनम सत-संगे तरह ए भव-संधू रे.

अशा प्रकारे, अज्ञानाच्या महासागराच्या दुसऱ्या बाजूला जा. मग, एखादा म्हणेल की "जर मी कृष्णभावनामृत आंदोलनाशी जोडला गेलो. तर माझे कौटुंबिक व्यवहार कसे चालू राहतील? कोण माझ्या पत्नी आणि मुले, समाज, मित्र, प्रेम याची काळजी घेईल? मला अनेक उद्योग आहेत." म्हणून तो म्हणतो, शीत आतप बात बरीषण ऐ दिन जामिनी जागी रे: "माझ्या प्रेमळ मना, तू इतके परिश्रम करीत आहेस." शीत आतप. "कडाक्याच्या थंडीत तू कामाला जातोस. कडक उन्हात मुसळधार पावसात तू कामाला जातोस. तू तुझे काम थांबवत नाहीस." शीत आतप बात बरीषण. "रात्रपाळी, संपूर्ण रात्र काम करीत आहेस." लोक हे करत आहेत. शीत आतप बात बरीषण ऐ दिन जामिनी जागी रे: संपूर्ण दिवस काम, पुन्हा मला जास्त पैसे मिळतील, मी रात्रीच्य वेळी जास्तीचे काम करीन. अश्याप्रकारे आपण काम करीत आहोत. तुम्ही का काम करीत आहात? तुम्ही का काम करीत आहात?

शीत आतप बात बरीषण ऐ दिन जामिनी जागी रे, बिफले सेविनु कृपण दुर्जन चपल सुख लभ लागी रे अशाप्रकारे मा माझा वेळ वाया घालवला," बिफले सेविनु. "तथाकथित समाज, मैत्री आणि प्रेम, कृपण दुर्जनची सेवा करण्यासाठी, कृपण ते कधीही कृष्ण चेतनेमध्ये गुंतणार नाहीत, पण मी त्यांच्या सेवेमध्ये व्यस्त आहे." तर हे सर्वसाधारणआहे, नाही की प्रत्येक कुटुंब. बहुतेक ९९.९. तर बिफले सेविनु, "अशाप्रकारे मी माझा वेळ वाया घालवत आहे. आणि आनंद काय आहे?" चपल सुख-लभ लागी रे. "काही क्षणाचे लैगिक सुख, एवढेच." लैगिक सुखासाठी, खूप परिश्रम. म्हणून गोविंद दास सांगतात की "तू संपत्तीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत आहेस," ऐ-धन, यौवन, पुत्र, परिजन. भौतिक आनंद म्हणजे पैसा, धन मिळवणे; आणि मग जन, अनेक अनुयायी किंवा आश्रित - पत्नी, मुले, मित्र, समाज, अनेक गोष्टी, देश.

तर पुत्र, परिजन, इथे की आचे परतिती रे. "यामध्ये तुला कोणताही दिव्य आनंद मिळणार नाही." कमल-दल-जल, जीवन तलमल. तुझे जीवन अस्थिर आहे. तू सांगू शकत नाहीस तुझे आयुष्य केव्हा संपेल. उदाहरण दिले आहे. कमल-जल-दल. कमळाच्या पानाप्रमाणे. जर तू पानावर पाणी टाकलेस, ते रहाणार नाही, ते अस्थिर राहील. कोणत्याही क्षणी ते पडेल. त्याचप्रमाणे, आपले आयुष्य आहे, अस्थिर. कोणत्याही क्षणी - संपेल. कमल-जल=दल, जीवन… भाजहू हरी-पद नीती रे. म्हणून जेवढे शक्य आहे तेवढे स्वतःला कृष्ण भावानेमध्ये गुंतवून घ्या. मरण येण्या अगोदर संपवा. ते तुमचे कार्य आहे. आणि कृष्णभावनामृत म्हणजे का? श्रवण,कीर्तन स्मरण, वंदन, पाद-सेवन… पूजन, सखी-जन, आत्म-निवेदन, नऊ प्रकारच्या भक्ती सेवा, गोविं-दास-अभिलाष रे.

म्हणून सर्वानी गोविंद दास प्रमाणे इच्छा ठेवली पाहिजे. श्रवण कीर्तन, या भक्तीच्या प्रक्रिया आहेत. ऐकणे, जप करणे, आठवणे, अर्चन, मूर्ती पूजा, वंदन, प्रार्थना करणे. असे नऊ प्रकार आहेत. तर मनुष्य जन्म या उद्देशासाठी आहे, आणि... या प्रक्रियेने, हळूहळू आपण कृष्ण भावनामृतचा, किंवा आध्यात्मिक चेतनेचा अग्नी प्रज्वलित करतो. मग त्या अग्नीने, ज्याप्रमाणे अग्नीमुळे लाकूड जळून राख होते. तर आपले, सर्व आच्छादन… आत्मा पदार्थाद्वारे, अज्ञानाद्वारे झाकला जातो. तर हे आच्छादन आणि अज्ञान जळून राख होईल. आणि तुम्ही मुक्त व्हाल आणि परमधाम परत जाल. हे या गाण्याचे तात्पर्य आहे.