MR/Prabhupada 0381 - दशावतार स्तोत्र भाग १



Purport to Sri Dasavatara Stotra -- Los Angeles, February 18, 1970

प्रलय-पयोधि-जले-धृतवान असि वेदं, विहित-वहित्र-चरित्रं अखेदं. आज भगवान कृष्णाच्या सुकर अवताराचा प्रकट दिन आहे. त्यांनी पृथ्वीला उचलले जेव्हा गर्भोदक महासागरातील पाण्यात ती बुडवली होती. जे विश्व आपण पाहत आहोत, ते केवळ अर्धे आहे. बाकीचे अर्धे पाण्याने भरले आहे, आणि त्या पाण्यात गर्भोदकशायी विष्णू पडलेले आहेत. तर एक असुर, हिरण्याक्ष. त्यांनी हा पृथ्वी ग्रह त्या पाण्यामध्ये ढकलला, आणि भगवान कृष्णानी हा पृथ्वी ग्रह सुकरच्या आकारात पाण्यातून वाचवला. तर तो शुभ दिवस आज आहे, वराह-द्वादशी. त्याला वराह-द्वादशी म्हणतात. म्हणून या दिवशी विश्वातील भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांचा गौरव करण्यासाठी गाणे चांगले आहे. प्रथम अवतार माशाचे रूप आहे.

तर या प्रार्थना जयदेव गोस्वामींनी अर्पण केल्या होत्या. भगवान चैतन्य यांच्या प्राकटयाच्या सातशे वर्ष आधी एक वैष्णव कवी आले. ते महान भक्त होते, आणि त्यांची विशिष्ट कविता, गीत-गोविंद. संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. गीत-गोविंद. गीत-गोविंद राधाराणी विषयी कृष्ण वाजवत असलेल्या बासरी विषयी आहे. तो गीत-गोविंदचा विषय आहे. तेच कवी, जयदेव गोस्वामी, यांनी हि प्रार्थना केली आहे. प्रलय-पयोधि-जले-धृतवान असि वेदं, ते सांगतात, "माझ्या प्रिय भगवंता, जेव्हा या विश्वात प्रलय होतो, तेव्हा सर्वकाही पाण्याने भरते . त्यावेळी तुम्ही एका बोटीत अडकलेल्या वेदांचे रक्षण केलेत. आणि तुम्ही मोठया माशाच्या आकारात पाण्यात बुडणारी बोट पकडलीत." लहान माशाप्रमाणे हा मासा सर्व प्रथम पाण्याच्या भाड्यात पकडला होता. मग तो वाढला, आणि मासा मोठ्या पाण्याच्या जलाशयात ठेवला. अशा प्रकारे मासा वाढत गेला. मग माश्याने माहिती दिली की "प्रलय होणार आहे. तू सगळे वेद बोटीवर संभाळ, आणि मी त्याचे रक्षण करीन." तर जयदेव गोस्वामी प्रार्थना करीत आहेत, "हे देवा तू वेद वाचवलेस, जेव्हा प्रलय होता, माशाच्या आकारात."

पुढील कूर्मावतार आहे. सागर मंथन होते. एका बाजूला सर्व देव आणि एका बाजूला सर्व असुर आणि मोठा पर्वत मंदर-पर्वत रवी म्हणून होता. कासवाच्या रूपात असलेल्या भगवंतांच्या पाठीवर रवी ठेवली होती. तर ते प्रार्थना करीत आहेत की "रवी ठेवण्यासाठी तुम्ही कासवाच्या रूपात अवतरला. आणि हे घडले कारण तुम्हाला तुमच्या पाठीवर खाजण्याची संवेदना होत होती. तर तुम्ही हि मोठी रवी स्वीकारलीत, मंदर पर्वत, खाजवण्यासाठी," मग पुढील अवतार वराह आहे. डुक्कर. नाकाच्या शेंड्याने पृथ्वी ग्रहाला त्यांनी वाचवले, आणि त्यांनी संपूर्ण जग त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर ठेवले. आपण कल्पना करू शकतो तो किती मोठा असू शकेल. आणि त्यावेळी जग चंद्रासारखे त्याच्यावर काही चिन्ह असलेले दिसले. तर केशव धृत-वराह-शरीर. ते सांगतात, माझ्या प्रिय भगवंता, तुम्ही मोठे वराह रूप घेऊन अवतरलात. म्हणून मी तुम्हाला आदरयुक्त नमस्कार करतो."

चौथा अवतार नृसिंहदेव आहे. नृसिंहदेव प्रल्हाद महाराजांना वाचवण्यासाठी अवतरले, जो पाच वर्षांचा मुलगा होता. आणि त्याच्या निरीश्वरवादी पित्याकडून त्याला त्रास दिला जात होता. तर ते महालाच्या खांबातून अर्ध मानव, अर्धा सिंह म्हणून अवतरले. कारण हिरण्यकश्यपूने ब्रम्हाकडून वर घेतला होता की, तो कोणत्याही मानवाकडून किंवा प्राण्याकडून मारला जाणार नाही. तर देवाने मानव नाही आणि प्राणीहि नाही असे अवतरले. हा भगवंतांच्या बुद्धिमत्तेत आणि आपल्या बुद्धिमत्तेत फरक आहे. आपण विचार करतो की आपण भगवंतांना आपल्या हुशारीने फसवू शकतो. परंतु भगवान आपल्यापेक्षा अधिक हुशार आहेत. हिरण्यकश्यपू ब्रम्हाला अप्रत्यक्ष वराने फसवू इच्छित होता. सर्वप्रथम तो अमर बनू इच्छित होता. ब्रम्हाने सांगितले, "ते शक्य नाही कारण मी पण अमर नाही. या भौतिक जगात कोणीही अमर नाही. ते शक्य नाही." तर हिरण्यकश्यपू. एक असुर… असुर खूप बुद्धिमान असतात. त्याने विचार केला की "अप्रत्यक्षरीत्या, मी अमर बनू शकेन." त्याने ब्रम्हाला प्रार्थना केली की. "कृपया मला वर द्या, की मी कोणत्याही मानवाद्वारे किंवा कोणत्याही प्राण्याद्वारे मारला जाणार नाही." ब्रम्हा म्हणाले, "हो, हे ठीक आहे." "मला आकाशात, पाण्यावर किंवा जमिनीवर मला मरण येणार नाही," ब्रम्हा म्हणतात, "ठीक आहे ." "मी कोणत्याही मानव निर्मित अस्त्राने मारला जाणार नाही." "एवढेच." अशाप्रकारे, त्याने अनेक प्रकारे त्याच्या बुद्धीचा वापर केला फक्त अमर होण्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी. पण भगवंत इतके वस्ताद आहेत. की त्यांनी ब्रम्हाने दिलेला वर तसाच ठेवला, तरीही तो मारला गेला. तो म्हणाला की "मी दिवसा किंवा रात्री मरणार नाही." तर तो मारला गेला संध्याकाळच्या वेळी दिवस संपताना आणि रात्र होण्याआधी. तुम्ही म्हणू शकत नाही हा दिवस किंवा रात्र आहे. त्याने वर घेतला की "मला आकाशात, पाण्यात, जमिनीवर मरण येणार नाही." म्हणून तो त्यांच्या मांडीवर मारला गेला. त्याने वर घेतला की "मी कोणत्याही मानव निर्मित किंवा देव निर्मित शस्त्राने मारला जाणार नाही." तो दिला गेला, "ठीक आहे." म्हणून तो नखानी मारला गेला. अशाप्रकारे, संपूर्ण वर तसाच ठेवला, तरीही तो मारला गेला.

त्याचप्रमाणे, आपण योजना बनवू शकतो, आपण वैज्ञानिक ज्ञानामध्ये प्रगती करू शकतो, पण निसर्गाची मृत्यू प्रक्रिया हि असेलच. कोणीही सुटू शकत नाही. आपल्या हुशारीने आपण सुटू शकत नाही. भौतिक अस्तित्वाची चार तत्वे म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, आणि व्याधी. आपण अनेक औषधे, अनेक शस्त्रे, अनेक साधने अनेक पद्धती निर्माण करू शकतो, पण तुम्ही या भौतिक अस्तित्वाच्या चार तत्वांपासून मुक्त होऊ शकत नाही, तुम्ही कितीही महान असलात तरीही. ते हिरण्यकश्यपूच्या वेळी सिद्ध झाले होते. हिरण्यकश्यपू कट्टर भौतिकवादी होता, आणि त्याला सुख उपभोगायचे, आणि अमर राहायचे होते. पण तो सुद्धा जगू शकला नाही. सर्व काही संपले.