MR/Prabhupada 0390 - जय राधा माधवचे तात्पर्य
Purport to Jaya Radha-Madhava -- New York, July 20, 1971
तर हि कृष्णाची मूळ प्रकृती आहे. कृष्णाचा मूळ स्वभाव. ते राधा-माधव आहेत. ते श्रीमती राधाराणीचे प्रियकर आहेत. आणि कुंज-विहारी, सदैव वृंदावनाच्या जंगलातील झाडात गोपींच्या संगतीत आनंद घेत आहेत. राधा-माधव कुंज-विहारी. तर ते फक्त राधाराणीचे प्रियकर नाहीत, पण ब्रज-जन-वल्लभ. सर्व वृंदावनाचे रहिवासी, कृष्णावर प्रेम करतात. त्यांना इतर काही माहित नाही. त्यांना माहित नाही की कृष्ण देव आहे, की नाही; ते खूप त्रासलेले नसतात, की "मी कृष्णावर प्रेम करेन जर ते भगवान असतील तर." "ते भगवंत असतील किंवा ते इतर जे कोणी असतील. त्यांनी काही फरक पडत नाही, पण आम्ही कृष्णावर प्रेम करतो." एवढेच. यालाच शुद्ध प्रेम म्हणतात.
"जर कृष्ण भगवान आहे, तर मी त्याच्यावर प्रेम करेन." - हे सशर्त प्रेम. हे शुद्ध प्रेम नाही. कृष्ण भगवान असेल किंवा तो जो कोणी असेल, पण त्याच्या अद्भुत कार्याने, व्रजवासी, ते विचार करतात, "ओ कृष्ण, तो एक अद्भुत मूल आहे, कदाचित कोणी देवता. कदाचित कोणी देवता," कारण लोकांची सर्वसाधारण कल्पना असते की देवता सर्व-शक्तिशाली असतात. त्या भौतिक जगात शक्तिशाली असतात. पण त्यांना माहित नाही की कृष्ण त्या सर्वांच्या वरती आहेत. ईश्वर: परम: कृष्ण: सचिदानंद-विग्रह: (ब्रम्हसंहिता ५.१).
सर्वोच्च देवता, ब्रम्हानी, आपले मत दिले आहे, "सर्वोच्च नियंत्रक कृष्ण आहे." तर वृंदावनचे रहिवाशी म्हणून, ते कृष्णावर कोणत्याही अटी शिवाय प्रेम करतात, त्याचप्रमाणे, कृष्ण सुद्धा त्यांच्यावर प्रेम करतात. व्रज-जन-वल्लभ गिरी-वर-धारी. जेव्हा वृंदावनातील रहिवासी संकटात असतात कारण त्यांनी इंद्र-यज्ञ थांबवला. आणि इंद्र अतिशय क्रोधीत झाला, आणि त्यांनी खूप मोठे, शक्तिशाली ढग पाठवले, आणि सात दिवस सतत वृंदावनवर पाऊस पडला. तर जेव्हा रहिवाशी खूप त्रस्त झाले, कृष्ण, जरी ते फक्त सात वर्षांचा मुलगा होते. त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून त्यांना वाचवले.
तर त्यांनी देवता, इंद्रदेव याला शिकवले, की, "तुझा उपद्रव थांबवणे माझ्या छोट्या बोटाचे काम आहे. एवढेच." तर तो गुढगे टेकत आला. या गोष्टी तुम्हाला कृष्ण पुस्तकात सापडतील. तर गोपी-जन-वल्लभ म्हणून. त्यांचे काम केवळ गोपी-जन चे कसे संरक्षण करायचे हे आहे. तर आपले कृष्णभावनामृत आंदोलन गोप-जनांपैकी एक कसे बनायचे हे आहे. मग कृष्ण आपल्याला कोणत्याही संकटापासून वाचवतील. अगदी टेकडी किंवा पर्वत उचलून. कृष्ण खूप दयाळू आणि शक्तिशाली आहेत. जेव्हा कृष्णांनी पर्वत उचलला, तेव्हा त्यांनी कोणत्याही योग पद्धतीचा अभ्यास केला नव्हता. आणि तोच देव आहे. जरी ते लहान मुल होते, ते लहान मुलाप्रमाणे खेळत होते, ते लहान मुलाप्रमाणे वागत होते, पण जेव्हा गरज होती, तेव्हा ते देवाच्या रूपात प्रकट झाले.
तो कृष्ण आहे. तो कृष्ण आहे, असे नाही की त्यांना काही योग पद्धतीचा अभ्यास करावा लागतो, मग ते देव बनतात. नाही. ते त्या प्रकारचे देव नाहीत, निर्मित देव नाहीत. ते भगवान आहेत. तर गोपी-जन-वल्लभ गिरी-वर-धारी. आणि लहान मुलाच्या रूपात, यशोदेचा प्रेमळ पुत्र म्हणून. यशोदानंदन… कृष्णाला भक्तांचा मुलगा व्हायला आवडते. त्यांना आपल्या भक्त आई आणि वडिलांकडून शासन करून घ्यायला आवडते. कारण सर्वजण त्यांची पूजा करतात, कोणीही त्यांना शिक्षा करायला जात नाहीत, तर जेव्हा एखादा भक्त त्यांना शिक्षा करतो तेव्हा त्यांना आनंद होतो. हि कृष्णाची सेवा आहे.
जर कृष्ण शिक्षा करून घेण्यात आनंद घेत असतील तर भक्त ती जबाबदारी स्विकारतात: "ठीक आहे, मी तुमचा पिता बनेन आणि तुम्हाला शिक्षा करीन." जेव्हा कृष्ण लढू इच्छितात, त्यांच्या भक्तांपैकी एक हिरण्यकश्यपू बनतो आणि त्यांच्याशी लढतो. तर श्रीकृष्णाची सर्व कार्य त्यांच्या भक्तांसोबत आहेत. ते आहेत... म्हणून, कृष्णाचे पार्षद बनण्यासाठी, कृष्णभावनामृत विकसित करण्यासाठी… यशोदा-नंदन व्रज-जन-रंजन. त्याचे एकमेव कार्य आहे कसे संतुष्ट करू… ब्रज-जनचे कार्य आहे कृष्णाला कसे संतुष्ट करू, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे कार्य आहे ब्रज-जनला कसे संतुष्ट करू. हि प्रेमाची देवण घेवण आहे. यमुना-तीर-वन-चारी. कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान यमुनेच्या तीरावर भटकत आहेत. गोपी, गोप, पक्षी, प्राणी, वासरे यांना खुश करण्यासाठी ते सामान्य पक्षी, प्राणी, वासरे किंवा पुरुष नाहीत. ते आत्म-साक्षात्काराच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. कृत-पुण्य-पुंजाः (श्रीमद भागवतम १०.१२.११) | अनेक अनेक जन्मानंतर त्यांना ते स्थान मिळाले आहे. कृष्णाच्या बरोबर खेळण्याचे.
तर कृष्णभावनामृत आंदोलन खुप छान आहे, प्रत्येकजण कृष्णलोक जाऊ शकतो, आणि मित्राच्या रूपात किंवा वडिलांच्या रूपात, मातेच्या रूपात किंवा इतर अनेक गोष्टीत त्यांचा पार्षद बनू शकतो, आणि कृष्ण या प्रस्तावांपैकी कोणत्याही एकाशी सहमत आहेत. या गोष्टी भगवान चैतन्यच्या शिकवणीत अतिशय सुंदरपणे वर्णन केल्या आहेत. तर कृष्ण वृंदावनाच्या बाहेर एक पाऊलही जात नाहीत. मूळ कृष्ण वृंदावनमध्ये आहेत. ते ब्रम्हसंहितेत वर्णन केले आहे,
चिंतामणि-प्रकर-सद्मसु-कल्पवृक्ष लक्षावृतेषु सुरभीरभिपालयन्तम् लक्ष्मी-सहस्र-शत-सम्भ्रमसेव्यमानं गोविंदमादि-पुरुषं… (ब्रम्हसंहिता ५.२९) ब्रम्हा स्वीकार करतात परम भगवान गोविंद, कृष्ण वृंदावनमध्ये वेणुं क्वणन्तम: "ते बासरी वाजवण्यात रमले आहेत. "
- अरविन्ददलायताक्षं
- बर्हावतंसमसिताम्बुदसुन्दराङ्गम्
- कन्दर्पकोटिकमनीयविशेषशोभं
- गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि (ब्रम्हसंहिता ५.३०)
तर या पुस्तकांचा, ज्ञानाचा, आणि प्रसादाचा फायदा घ्या, या जपाचा, आणि आनंदी बना आणि कृष्णाकडे जा. खूप छान गोष्ट. ठीक आहे.