MR/Prabhupada 0393 - निताई गुन मणि अमारचे तात्पर्य



Purport to Nitai Guna Mani Amara

हे गाणे लोचनदास ठाकूर यांनी गायले आहे. जवळजवळ भगवान चैतन्य महाप्रभु यांचे समकालीन. त्यांच्याकडे चैतन्य महाप्रभु यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तके आहेत. तर ते सांगत आहेत की नित्यानंद प्रभू सद्गुणांनी युक्त आहेत, गुण-मणि. गुण-मणि म्हणजे अमूल्य रत्न. तर निताई गुण-मणि आमार निताई गुण-मणि. ते वारंवार सांगत आहेत की नित्यानंद प्रभू सर्व चांगल्या गुणांचे भांडार आहेत.

आनिया प्रेमेर वन्या भासाइलो अवनी आणि त्यांच्या आध्यात्मिक गुणांच्या आधारे, त्यांनी संपूर्ण जगाला भगवंतांच्या प्रेमाच्या महापुराने समृद्ध केले. त्यांच्या दयाळूपणाने लोक अनुभवू शकतात भगवंतांचे प्रेम काय आहे प्रेमेर वन्या लोईया निताई आइला गौड-देशे. जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी घर सोडले आणि संन्यास घेतला, त्यांनी त्यांचे मुख्यालय जगन्नाथ पुरी बनवले. तर त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारल्या नंतर, जेव्हा त्यांनी घर आणि देश सोडला, भगवान नित्यानंद प्रभू देखील जगन्नाथ पुरीपर्यंत त्यांच्या बरोबर होते. तर काही दिवसा नंतर, भगवान चैतन्य यांनी त्यांना विनंती केली की "जर आपण दोघे इथे राहिलो, तर बंगालमध्ये कोण प्रचार करेल?"

बंगालला गौड-देश म्हणून ओळखले जाते. तर चैतन्य महाप्रभूंच्या आदेशानुसार त्यांनी त्यांच्याकडून, भगवंतांच्या प्रेमाचा पूर आणला, आणि त्यांनी संपूर्ण बंगालला वाटला, गौड-देश. आणि त्या भगवंतनाच्या प्रेमाच्या पुरात, सर्व भक्त बुडले. केवळ जे अभक्त होते, बुडू शकले नाहीत, पण ते तरंगत होते, दिन हिन बाचे. पण जिथं पर्यंत नित्यानंद प्रभूंचा संबंध आहे, ते भक्त आणि अभक्तांमध्ये काही भेदभाव करीत नाहीत.

दिन हिन पतित पामर नाही बाचे. गरीब किंवा श्रीमंत किंवा ज्ञानी किंवा मूर्ख, प्रत्येकजण चैतन्य प्रभूंचे मार्गदर्शन घेऊ शकतो, आणि भगवंतच्या प्रेमाच्या महासागरात बुडू शकतो. असे भगवंतांचे प्रेम ब्रह्मार दुर्लभ आहे. अगदी ब्रम्हदेव, जे या विश्वाचे परम शिक्षक आहेत, ते देखील आस्वाद घेऊ शकत नाहीत. पण चैतन्य महाप्रभूंच्या आणि नित्यानंद महाप्रभूंच्या कृपेने, हे भगवंतांचे प्रेम कोणत्याही भेदभावाविना सर्वाना वितरित केले गेले. तर आबध्द करुणा-सिंधू, तो एका महासागराप्रमाणे होता जो सर्व बाजूनी अडवलेला होता. भगवंतांच्या प्रेमाचा सागर एक मोठा महासागर आहे, पण तो जलमय झालेला नव्हता.

तर नित्यानंद प्रभुनी सागरातून एक नहर बनवली, आणि त्यांनी प्रत्येक दरवाजपर्यंत ती नहर आणली. घरे घरे बुले प्रेम-अमियार बान. भगवंतांच्या प्रेमाच्या पुराचे अमृत अशा प्रकारे बंगालच्या प्रत्येक घराघरात वाटले गेले वास्तविक जेव्हा चैतन्य महाप्रभु आणि नित्यानंद प्रभूंची गोष्ट येते बंगाल अजूनही अभिभूत आहे. लोचन बोले, आता लेखक त्यांच्या वतीने बोलत आहे, की जो कोणी नित्यानंद प्रभुनी दिलेल्या संधीचा लाभ घेत नाही, तर त्यांच्या मते ते विचार करतात की हि व्यक्ती जाणूनबुजून आत्महत्या करीत आहे.