MR/Prabhupada 0395 - परम करुणाचे तात्पर्य



Purport to Parama Koruna -- Los Angeles, January 16, 1969

परम कोरुणा, पाहू दुई जन, निताई गौरचंद्र. हे गाणे लोचनदास ठाकुर यांनी गायले आहे, चैतन्य महाप्रभूंचा महान भक्त, जवळजवळ समकालीन. त्यांनी चैतन्य महाप्रभूंचे कार्य दर्शणारे एक पुस्तक लिहिले, चैतन्य-मंगल. ते खुप प्रसिद्ध पुस्तक आहे, चैतन्य-मंगल. आणि त्यांनी अनेक गाणी रचली. व्यावहारिकदृष्ट्या सर्व वैष्णव, ते अलौकिक कवी आहेत. तो वैष्णवांचा २६ गुणांपैकी एक गुण आहे. तर ते सांगतात की "हे दोन प्रभू," निताई गौरचंद्र, "नित्यानंद प्रभू आणि गौरांग प्रभू, किंवा चैतन्यप्रभू, ते खूप दयाळू अवतार आहेत." सब अवतार-सार शिरोमणी. "ते सर्व अवतारांचे सार आहेत."

या अवताराबद्दल भगवद् गीतेत सांगितले आहे. की जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी भगवान अवतार घेतात, किंवा ते या भौतिक जगात अवतरित होतात, पुण्यवान लोकांची रक्षा करण्यासाठी आणि पापी लोकांचा नाश करण्यासाठी हा अवतार घेण्याचा उद्देश आहे. प्रत्येक अवतार घेण्यात तुम्हाला दोन गोष्टी सापडतील. श्रीकृष्ण, ते इतके सुंदर, दयाळू आहेत, पण ते राक्षसांसाठी खूप धोकादायक आहेत. राक्षस त्यांना वज्राच्या रूपात पाहतात. आणि गोपी त्यांना सगळ्यात सुंदर कामदेवाच्या रूपात बघत होत्या. तर भगवद् गीतेत सुद्धा असे सांगितले आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते (भ.गी. ४.११)

भगवान एखाद्याच्या असुर प्रवृत्तीच्या स्वातंत्र्यानुसार जाणता येतो. तर या युगात… अर्थात, अंतिम अवतार, कल्की, फक्त मारेल. खूप काळानंतर, ते येतील. पण इथे चैतन्यप्रभू, त्यांचे कार्य मारणे नाही, केवळ दया करणे आहे. ती चैतन्यप्रभुंची खास विशेषतः आहे. कारण या युगात, अर्थातच, अधर्माचे खूप वर्चस्व आहे. पण जर चैतन्यप्रभू त्यांना मारू इच्छितात, तर त्यांच्या मुक्तीचा प्रश्नच येत नाही. ते होतील… अर्थातच, जोकोणी अवताराद्वारे मारला जाईल त्याला देखील मोक्ष मिळेल. पण आध्यात्मिक ग्रहावर नाही, पण ते ब्रम्हजोतीमध्ये विलीन होतील जसे मायावादी इच्छितात. दुसऱ्या शब्दात, मायावादींचे ध्येय मोक्ष मिळवणे आहे, भगवंतांच्या शत्रूच्या मुक्ती सारखेच आहे. ते खूप कठीण काम नाही.

तर चैतन्यप्रभू दयाळू आहेत, कारण ते सगळ्यांना आलिंगन देऊन कृष्ण प्रेम देत आहेत. रूप गोस्वामी चैतन्यप्रभूंचे वर्णन सर्व अवतारमधील कृपाळू रूप म्हणून करतात. कारण ते सर्वाना कृष्ण देतात, कोणत्याही योग्यतेशिवाय. तर लोचनदास ठाकुर सांगतात की परम कोरुणा, पाहू दुई जन, निताई गौरचंद्र, आणि ते सर्व अवताराचे सार आहे. केवळ आनन्द-कंद. आणि त्यांचा प्रचाराची पद्धत खूप छान आहे. चैतन्य महाप्रभु सल्ला देतात "तुम्ही हरे कृष्णाचा जप करा, सुंदर नृत्य करा, आणि जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल, तेव्हा विश्रांती घ्या आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करा." तर त्यांचे सूत्र खूप चांगले आहे. केवळ आनंद-कंद. जेव्हा ते असताना. प्रत्येकदिवशी संध्याकाळी, नृत्य, जप सुरु असायचे. आणि नृत्य संपल्यावर, ते प्रसाद वाटत होते. तर हजारो लोक प्रत्येक रात्री जमत होती.

तर केवळ आनंद, हे आंदोलन. केवळ आनंद-कंद. मग ते सल्ला देतात, भजो भजो भाई, चैतन्य निताई. "माझ्या प्रिय भाऊ, जरा या दोन प्रभूंची चैतन्य आणि नित्यानंदांचे भजन करण्याचा प्रयत्न करा," सुदृढ विश्वास कोरि, "विश्वास आणि दृढतेने." चैतन्यप्रभूंच्या शब्दावर विश्वास असला पाहिजे. चैतन्यप्रभू सांगतात की "जप करत जा. फक्त जप करून, एखाद्याला जीवनाची परिपूर्णता लाभेल." तर हे सत्य आहे. जोपर्यंत आपण जप करत नाही, आपल्याला साक्षात्कार होणार नाही, पण जे जप करत आहेत, ते हे जाणत आहेत की त्यांना जीवनाची इच्छित परिपूर्णता खूप लवकर मिळत आहे. तर आपण श्रद्धेने आणि दृढतेने या मंत्राचा जप केला पाहिजे. पण ते म्हणतात, या संबंधात एकमात्र आवश्यक असलेली योग्यता, विषय छाडिया, से रसे मजिया, मुखे बोलो हरि हरि.

आपण श्रद्धेने आणि विश्वासाने जप केला पाहिजे, त्याच वेळी आपण काळजी घेतली पाहिजे, आपण इंद्रियतृप्तीमध्ये सावधानता बाळगली पाहिजे. विषय छाडिया, विषय म्हणजे इंद्रिय संतुष्टी, आणि छाडिया म्हणजे त्यागणे. व्यक्तीला इंद्रिय संतुष्टी सोडून दिली पाहिजे. अर्थात, या भौतिक जीवनात आपल्याला इंद्रिये मिळाली आहेत आणि आपल्याला त्यांचा वापर करायचा सराव झाला आहे. आपण ते थांबवू शकत नाही. परंतु त्यांना थांबवायचा प्रश्नच नाही, पण संयमन करायचे आहे. जसे आपल्याला इच्छित आहोत. विषय म्हणजे आहार,निद्रा,भय, आणि मैथुन. तर या गोष्टींसाठी पूर्णपणे वर्जित नाहीत. पण त्या अनुकूल करण्यासाठी फक्त समायोजित केल्या जातात माझ्या कृष्णभावनामृताचे पालन करू शकेन.

म्हणून आपण घेऊ नये… जसे खाणे. आपण फक्त आस्वाद घेण्यासाठी खाऊ नये. आपण फक्त एवढेच खाल्ले पाहिजे जेणेकरून आपण स्वतःला धडधाकट ठेऊन कृष्णभावनामृताचे पालन करू शकू. तर खाणे थाबवाले नाही, पण ते योग्य प्रकारे संयमाने केले पाहिजे. त्याचप्रमाणे, संभोग, समागम करणे थांबवले नाही. पण नियमित तत्व आहे की तुम्ही लग्न केले पाहिजे, आणि फक्त कृष्णभावनामृत मुलांना जन्म देण्यासाठीच संभोग केला पाहिजे. नाहीतर हे नका. तर सर्वकाही नियंत्रित आहे. संरक्षण थांबवण्याचा कोणताही प्रश्न नाही. अर्जुन कृष्णाच्या आदेशानुसार लढत होता,संरक्षण. तर सर्वकाही तिथे आहे. काहीही थांबले नाही. केवळ आपल्या कृष्णभावनामृतची अंमलबजावणी करण्यासाठी समायोजित केले जाते.

विषय छाडिया. आपण या विषयांचा स्वीकार करू नये. शरीराच्या मागणीची हि चार तत्वे, मुखत्वे आहार, निद्रा, भय, आणि मैथुन, इंद्रियतृप्तीसाठी. नाही. राजकारणी, ते इंद्रियतृप्तीसाठी लढतात. ते लोकांचे भले पाहत नाहीत. ते त्यांच्या राजकीय उन्नतीसाठी लढतात. अशा लढाईला मान्यता नाही. पण जेव्हा लोकांच्या संरक्षणासाठी युद्ध गरजेचे आहे, ते युद्ध केले पाहिजे. आपण इंद्रियतृप्तीचे हे तत्व सोडून दिले पाहिजे, किंवा या प्रक्रियेला. देखो देखो भाई त्रि-भुवने नाई. मग ते म्हणतात, "जरा पहा, इथे कोणीही दुसरे इतके दयाळू नाही." पशु पाखि झुरे, पाषाण विदरे. त्यांच्या कृपेने अगदी पक्षी आणि प्राणी, त्यांचे देखील पालन होते. वास्तविक,

जेव्हा चैतन्य महाप्रभु मध्य भारतातील, झारखंड नावाच्या जंगलातून जात होते, त्याच्या बरोबर फक्त त्यांचा वयक्तिक सेवक होता, आणि ते एकटे होते, आणि जेव्हा ते त्या जंगलातून जात होते, त्यांनी एक वाघाला स्पर्श केला. तो झोपला होता. वाघ गरजला त्याने उत्तर दिले. सहकारी, चैतन्य महाप्रभूंचा सेवक, त्याने विचार केला "आता आपले काही खरे नाही." पण प्रत्यक्षात, चैतन्य महाप्रभुनी वाघाला विचारले, "तू का झोपला आहेस? उभा राहा. हरे कृष्ण जप कर."आणि वाघाने नाचायला सुरवात केली. तर वास्तवात हे घडले. जेव्हा चैतन्य महाप्रभु हरे कृष्ण आंदोलनाचा प्रचार करीत होते, वाघ, हरीण, … सर्वजण सामील होत. तर अर्थात, आपण इतके शक्तिशाली नाही. पण हे शक्य आहे, की... कमीतकमी, आम्ही पहिले आहे, कुत्रे संकीर्तनांत नाचताना. तर हे सुद्धा शक्य आहे स्वीकारणे… पण आपण अशी जोखम घेण्याचा प्रयत्न करू शकत नाही. पण चैतन्य महाप्रभु वाघाला नाचण्यासाठी प्रवृत्त करू शकत होते, आपण कमीतकमी माणसांना नाचण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. हे खरेच चांगले आंदोलन आहे.

तर पशु पाखी झुरे पाषाण विदरे. पाषाण म्हणजे दगड. तर अगदी दगड हृदयाची व्यक्ती देखील हरे कृष्णाचा जप करून पाझरू शकते. ते आपण अनुभवले, पहिले आहे, पाषाण विदुरे, शूनी जार गुण गाथा. केवळ दिव्य लीलाआणि चैतन्य प्रभूंचे गुणविशेष ऐकून, अगदी पाषाण हृदयी व्यक्ती,त्या देखील पाझरतात. अश्या अनेक घटना आहेत, जगाई माधाई. अनेक पतित जीव, ते सर्वोच्च आध्यात्मिक स्तर प्राप्त करतात. मग लोचनदास ठाकुर सांगतात की विषय मजिया, रोहिलि पोरिया. दुर्दैवाने मी शरीराच्या किंवा इंद्रियांच्या मागण्यांमध्ये इतका गुंतलो आहे, की मला चैतन्य महाप्रभूंच्या पदकमलांचा विसर पडला आहे."

विषय मजिया, रोहिलि पोरिया, से पदे नाहिलो आस. "मी चैतन्यप्रभूंच्या पदकमलांशी जोडला जाण्याची इच्छा करीत नाही." तर असे का आहे? तर ते दुःख करीत आहेत की आपण कर्म, भुनाजाये शमन. की "मी माझ्या पूर्व कर्मांमुळे दुःखी आहे, त्यामुळे मी कृष्णभावनामृत आंदोलनाकडे आकर्षित होऊ शकलो नाही. ती यमराजाने मला दिलेली एक शिक्षा आहे, मृत्यूचा अधीक्षक." वास्तविक, हे कृष्णभावनामृत आंदोलन, संकीर्तन चळवळ, इतकी चांगली आणि आकर्षक आहे. प्रत्येक साधा, मला म्हणायचे आहे, जुन्या विचारांची व्यक्ती देखील आकर्षित होईल. एखादा आकर्षित झाला नाही, असे समजले पाहिजे की मृत्यूचा अधीक्षकांच्या कायद्याद्वारे त्याला शिक्षा केली जात आहे. असं असले तरी,

जर आपण जप करण्याच्या तत्वांशी राहिलो. मग अगदी यमराज देखील. मृत्यूचा अधीक्षक, तो सुद्धा शिक्षा करण्यास असफल ठरेल. असे ब्रम्हसंहिता सांगते. ब्रम्हसंहिता सांगते, जोकोणी भक्ती जीवन स्वीकारतो, त्याच्या पूर्व कर्मांच्या प्रतिक्रिया ताबडतोब समायोजित केल्या जातात. तर आपल्यापैकी प्रत्येकाने या कृष्णभावनामृत आंदोलनात भाग घेतला पाहिजे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे जप करुन.