MR/Prabhupada 0402 - विभावरी शेष गीताचे तात्पर्य भाग १



Purport to Vibhavari Sesa

भक्तिविनोद ठाकुर यांनी हे गीत गायले आहे. ते सर्वाना सकाळी लवकर उठायला सांगत आहेत. विभावरी शेषा, रात्र संपली आहे, आलोक-प्रवेशा, सूर्यप्रकाश दिसायला लागला आहे., आता तुम्ही उठा. निद्रा छारि उठ जीव, आता आणखी झोपू नको. ते वैदिक जीवन आहे. आपण सूर्योदयानंतर झोपू नये. तो सूर्योदयापूर्वी उठला पाहिजे. ते निरोगी जीवन सुद्धा आहे. तर पलंगावरून उठल्यावर त्वरित, आपण भगवंतांच्या पवित्र नावाचा जप केला पाहिजे.

इथे असे सुचवले आहे, बोलो हरी हरी, आत तुम्ही हरे कृष्ण मंत्राचा जप करा, मुकुंद मुरारी, श्रीकृष्णांची वेगवेगळी नावे. मुकुंद म्हणजे जो मुक्ती देतो. मुरारी. मुरारी म्हणजे कृष्ण मुरा नावाच्या असुराचा शत्रू. राम हे दुसरे एक नाव आहे, राम, कृष्ण. हयग्रीव. हयग्रीव हा कृष्णाचा आणखी एक अवतार आहे. त्याचप्रमाणे नृसिंह, नर-हरी, अर्धा सिंह, अर्धा मनुष्य, नृसिंह-देव. वामन अवतार, नृसिंह वामन, श्री-मधुसूदन मधुसूदन, मधू आणि कैटभ नावाचे राक्षस होते. ते ब्रम्हाला गिळंकृत करण्याकरिता आले त्याच्या निर्मितीनंतर, म्हणून त्यांना मारले गेले. म्हणून श्रीकृष्णांचे दुसरे नाव मधुसूदन आहे. मधुसूदन नाव भगवद्-गीतेत अनेक ठिकाणी सापडते. मधुसूदन म्हणजे मधुचा शत्रू.

श्रीकृष्ण मित्र आणि शत्रू दोन्ही आहेत. वास्तविक ते सर्वांचे मित्र आहेत, पण ते शत्रू बनतात- जसे एखादा श्रीकृष्णांना शत्रू सारखे वागवतो. ते कोणाचेही शत्रू नाहीत, पण जर कोणची त्यांना शत्रूच्या रूपात पाहायची इच्छा असेल तर ते शत्रू प्रमाणे दिसतात. ते परिपूर्ण आहेत. असुर, त्यांना श्रीकृष्णांना शत्रू म्हणून पाहायची इच्छा असते, तर असुरांची इच्छा स्वीकारून, ते त्यांच्यासमोर शत्रू म्हणून प्रकट होतात, आणि त्यांना मुक्ती देतात. ती श्रीकृष्णांची संपूर्ण लीला आहे. मधुसूदन ब्रजेन्द्र-नंदन श्याम

प्रत्यक्षात भगवंतांना नाव नाही, पण त्यांना नावे त्यांच्या लीलांवरून पडली आहेत. ज्याप्रमाणे हे मधुसूदन नाव दिले आहे कारण त्यांनी मधु असुराला मारले. त्याचप्रमाणे, ते ब्रजेन्द्र-नंदन, व्रजाचा पुत्र, वृंदावन म्हणून ओळखले जातात. कारण ते यशोदा आणि नंद महाराजांचा पुत्र म्हणून प्रकट झाले, ब्रजेन्द्र-नंदन. श्याम. त्याच्या शरीराची छटा काळसर आहे, म्हणून त्यांना श्यामसुंदर असे म्हणतात. पुतना-घातन, कैटभ-शातन, जय दाशरथी-राम. तर कारण त्यांनी पुतना राक्षशीणीला मारले, त्यांचे नाव पुतना-घातन आहे. घातन म्हणजे मारणारा. कैटभ-शासन, आणि ते सर्वप्रकारच्या धोक्यांवर शासन करणारे आहेत. जय-दाशरथी-राम. त्यांनी रावणाला मारले त्या संबंधात, त्यांचा गौरव होतो, जय-दाशरथी. दाशरथी म्हणजे: त्यांच्या वडिलांचे नाव दशरथ होते, म्हणून ते दाशरथी, दाशरथी-राम.

यशोदा-दुलाल गोविंद-गोपाल. यशोदा-दुलाल म्हणजे माता यशोदेचा लाडका मुलगा. गोविंद-गोपाल, आणि ते गोपालक होते, गोविंद, गायीना आनंद देणारे. वृंदावन-पुरंदर. वृंदावन भूमीचे मुख्य. ते वृंदावनातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते. रावाणान्तकर गोपी-प्रिय-जन. ते गोपींचे खूप लाडके आहेत. गोपी-प्रिय राधिका-रमण. आणि ते नेहमी राधाराणीच्या संगाचा आनंद घेतात. म्हणून त्यांचे नाव राधिका-रमण. भुवन-सुंदर-बर. तर त्यांनी इतक्या सर्व गोपीना आकर्षित केले. याचा अर्थ ते संपूर्ण ब्रम्हांडासाठी आकर्षक आहेत. या ब्रम्हांडात कोणीही श्रीकृष्णांपेक्षा जास्त आकर्षक नाही. किंवा कोठेही, म्हणून त्यांना भुवन-सुंदर-बर म्हणतात. बर म्हणजे मुख्य. रावाणान्तकर, माखन-तस्कर, गोपी-जन-वस्त्र-हारी.