MR/Prabhupada 0405 - असुरांना भगवन्ताचे व्यक्तित्व समजत नाही. याला असुरी म्हणतात
Lecture on SB 7.7.30-31 -- Mombassa, September 12, 1971
दानव समजू शकत नाही की देव एक व्यक्ती असू शकते. ते आसुरी आहे. ते नाही करू शकत... कारण ते समजू शकत नाही, अडचण अशी आहे की दानव देवाला समजण्याचा प्रयत्न करतो, स्वतःशी तुलना करून. डॉ. फ्रॉग, ती डॉ. फ्रॉग ची गोष्ट. डॉ. फ्रॉग अटलांटिक महासागर समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्या तीन फुट विहिरीबरोबर तुलना करून, आणि काय. जेव्हा त्याला माहिती दिली की तिथे एक अटलांटिक महासागर आहे, तेव्हा तो फक्त त्याच्या मर्यादित जागेबरोबर तुलना करीत आहे. ती चार फूट असू शकते, किंवा ती पाच फूट असू शकते, ती दहा फूट असू शकते, कारण तो तीन फूटाच्या आत आहे. त्याच्या मित्रांनी सांगितले, "बाप रे, मी जलाशयाचा साठा बघितला आहे, अफाट पाणी." तर तो अफाट पणा, तो अनुमान काढत आहे, "किती अफाटपणा असु शकतो? माझी विहीर तीन फूट आहे, ती चार फुट असु शकते, पाच फूट," तो असे चालू ठेवत आहे. पण तो लाखोच्या लाखो फूट जाऊ शकतो तरी तो मोठा आहे. ती दुसरी गोष्ट. त्यामुळे, नास्तिक लोक, दानव, ते त्याच्या पद्धतीने विचार करतात की भगवंत, कृष्ण असा असु शकतो, कृष्ण असा असु शकतो, कृष्ण असा असु शकतो. साधारणपणे ते असा विचार करतात की कृष्ण मीच आहे, ते कसे म्हणतात? कृष्ण महान नाही. ते विश्वास ठेवत नाहीत के भगवंत महान आहेत. तो असा विचार करतो की भगवंत हे माझ्या सारखेच आहेत, मी सुद्धा भगवंत आहे. हे असुरी आहे.