MR/Prabhupada 0407 - हरिदासच्या जीवनाचा इतिहास हा आहे की ते एका मुसलमान कुटुंबात जन्माला आले होते
प्रभुपाद: दरम्यान एक ब्राम्हण येऊन आणि त्याने भगवान चैतन्य यांना आमंत्रित केले, "मी बनारसमधील सर्व संन्याशांना निमंत्रित केले आहे, पण मला माहित आहे तुम्ही या मायावादी संन्याशांनां भेटणार नाही. पण तरीही मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. तुम्ही कृपया माझे निमंत्रण स्वीकारा." तर चैतन्य महाप्रभूंनी प्रकाशानंद सरस्वतींना भेटण्याची हि संधी पाहिली त्यांनी त्याचे निमंत्रण स्वीकारले, आणि तिथे त्यांची भेट झाली. आणि तिथे वेदांत-सूत्रावर प्रकाशानंद सरस्वतींबरोबर चर्चा झाली. आणि त्यांनी त्यांचे वैष्णवांमध्ये रूपांतर केले. तो दुसरा किस्सा आहे.
हयग्रीव: हि व्यक्ती किती वर्षांची आहे?
प्रभुपाद: प्रकाशानंद सरस्वती? ते सुद्धा वृद्ध मनुष्य होते. साठ वर्षांपेक्षा कमी नाही. होय.
हयग्रीव: आणि त्या शहरामध्ये त्यांनी भूमिका काय होती? तो काय होता…? ते एक वेदांतवादी होते?
प्रभुपाद: प्रकाशानंद सरस्वती. तो एक मायावादी संन्यासी होता. त्यांनी चैतन्य महाप्रभूंची तत्वे स्वीकारली आणि त्यांना सन्मान प्रदान केला. त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला. आणि ते देखील सामील झाले. पण ते अधिकृतपणे वैष्णव बनल्याचा कुठेही उल्लेख नाही. पण त्यांनी चैतन्य महाप्रभूंचे तत्वज्ञान स्वीकारले. पण सार्वभौम भट्टाचार्य अधिकृतपणे, ते वैष्णव बनले. मग हरिदास प्रभू भेटले…
हयग्रीव: पाचवे दृश्य.
प्रभुपाद: पाचवे दृश्य.
हयग्रीव: हा हरिदास ठाकुर आहे?
प्रभुपाद: हरिदास ठाकुर.
हयग्रीव: कोणाच्या मृत्यूच्या वेळी? हरिदासच्या मृत्यूच्या वेळी?
प्रभुपाद: होय. हरिदास खूप वृद्ध होते. ते मुस्लिम होते.
हयग्रीव: ते ती व्यक्ती होते ज्यांना नदीत फेकले गेले.
प्रभुपाद: होय.
हयग्रीव: तर शेवटी त्यांचा अंत होतो, पाचव्या दृश्यात.
प्रभुपाद: आपण त्याच्यासाठी नाही आहोत… अर्थात, हरिदास ठाकूर यांचे एक वेगळे आयुष्य आहे, पण ते आपण दाखवणार नाही.
हयग्रीव: होय ठीक आहे. हि विशेष घटना.
प्रभुपाद: विशेष घटना महत्वपूर्ण आहे, की चैतन्य महाप्रभु ब्राम्हण होते आणि ते एक संन्यासी होते. सामाजिक रितीरिवाजानुसार त्यांनी मुसलमानाला स्पर्श करायचा नाही. पण हरिदास ठाकुर मुस्लिम होते, आणि त्यांच्या मृत्यू समयी त्यांनी त्यांचे मृत शरीर स्वतः उचलले आणि नृत्य केले. आणि त्यांनी त्यांना कब्रस्थानात ठेवले आणि प्रसाद वाटला. आणि हरिदास ठाकुर दोन, तीन दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती. कारण ते मुसलमान होते ते जगन्नाथ मंदिरात प्रवेश करत नव्हते. कारण हिंदू खूप कठोर होते. ते एक भक्त होते, काही हरकत नाही. कशाला ते भांडण निर्माण करतील? तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या वर्तनाची प्रशंसा केली की ते कोणतेही भांडण निर्माण करू इच्छित नव्हते… कारण ते एक भक्त बनले आहेत. जबरदस्तीने ते मंदिरात जाऊ इच्छित नव्हते. पण चैतन्य महाप्रभु स्वतः रोज येत आणि त्यांना पाहून जात. समुद्र स्नानाला जाताना, ते प्रथम हरिदास ठाकूर यांना पाहून जात. "हरिदास? तु काय करीत आहात?" हरिदास त्यांना सम्मान प्रदान करत, आणि ते थोड्या वेळ बसून बोलत असत. मग चैतन्य महाप्रभु स्नान करायला जात असत. अशा प्रकारे, एक दिवस ते आले त्यांनी पहिले हरिदास यांची तब्येत बरी दिसत नाही. "हरिदास? तुझी तब्येत कशी आहे?" "प्रभू, ती फार चांगली नाही… शेवटी, हे शरीर आहे." मग तिसऱ्या दिवशी त्यांनी पहिले की हरिदास आज शरीर सोडणार आहेत. तर चैतन्य महाप्रभु यांनी त्यांना विचारले, "हरिदास. तुझी काय इच्छा आहे?" ते दोघे समजले. हरिदास यांनी सांगितले " हा माझा अंतिम क्षण आहे. कृपया तुम्ही माझ्या समोर उभे रहा." तर चैतन्य महाप्रभु त्याच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी त्यांचे शरीर सोडले.(विराम)
हयग्रीव: तुम्ही त्याचा उल्लेख केलात…
प्रभुपाद: ते गेल्या नंतर चैतन्य महाप्रभूंनी स्वतः त्यांचे शरीर उचलेल, आणि इतर त्यांना समुद्र किनारी नेले आणि तणाची कबर खोदली. ती कबर अजूनही जगन्नाथ पुरीमध्ये आहे समाधी, कबर. तर चैतन्य महाप्रभूंनी नृत्य करायला सुरवात केली. तो समारंभ होतो. कारण हा वैष्णव समारंभ होता, सर्व काही कीर्तन आणि नृत्य. तर तो हरिदास ठाकुर यांचा अंतिम समारंभ होता.
हयग्रीव: तुम्ही काहीतरी उल्लेख केला होता चैतन्य नृत्य हरिदास बरोबर?
प्रभुपाद: हरिदास त्यांचे शरीर. चैतन्य… मृत शरीर. हरिदास यांचे मृत शरीर.
हयग्रीव: ओह, त्यांच्या मृत शरीराबरोबर?
प्रभुपाद: होय. त्यांचे मृत शरीर.
हयग्रीव: त्यांच्या मृत्यूनंतर.
प्रभुपाद: त्यांच्या मृत्यूनंतर.
हयग्रीव: चैतन्य...
प्रभुपाद: जेव्हा. मला म्हणायचे आहे, हरिदास जेव्हा जिवंत होते, ते नाचत होते. पण हरिदास यांच्या मृत्यूनंतर, चैतन्य महाप्रभु यांनी स्वतः शरीर उचलेल, आणि कीर्तन करीत नृत्य करायला सुरवात केली. त्याचा अर्थ त्यांच्या अंतिम संस्काराचे विधी चैतन्य महाप्रभूंनी स्वतः आयोजित केले. ते समुद्र किनारी शरीर आणि कब्रस्थानात त्यांनी…
हयग्रीव: त्यांनी आयोजित...
प्रभुपाद: होय अंतिम संस्कार, होय.
हयग्रीव: कीर्तनासह.
प्रभुपाद: कीर्तनासह. कीर्तन नेहमी होत. आणि दफन केल्यावर प्रसाद वितरण केले गेले आणि कीर्तन होते. तर इथे हरिदास बरोबर काही वार्तालाप दाखवला पाहिजे कसे सहानुभूतिपूर्वक.
हयग्रीव: ठीक आहे. इतर काही आहे का...हरिदासबद्दल काही इतर माहिती आहे का?
प्रभुपाद: हरिदासच्या आयुष्याचा इतिहास असा आहे की ते एका मुसलमान कुटुंबात जन्माला आले होते. या किंवा त्या कारणाने ते भक्त बनले आणि ३००,०० वेळा ते जप करीत होते. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे, आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आचार्य, जपाची अधिकृत व्यक्ती बनवले. म्हणून आम्ही त्यांचा गौरव करतो, "नामाचार्य हरिदास ठाकूर कि जय." कारण त्यांना आचार्य, हरे कृष्ण जप करणारी अधिकृत व्यक्ती बनवले मग, जेव्हा भगवान चैतन्य यांनी संन्यास घेतला, हरिदास ठाकूर यांची इच्छा होती, की, "माझ्या प्रेमळ भगवंता, तुम्ही नवद्वीप सोडत आहात, मग माझ्या आयुष्याचा काय उपयोग आहे?" एकतर तुम्ही मला घेऊन जा किंवा मला मरून जाऊ दे." तर चैतन्य महाप्रभु म्हणाले, "नाही. तुम्ही का मारणार? तुम्ही माझ्या बरोबर या." तर ते त्यांना आपल्याबरोबर जगन्नाथ पुरीला घेऊन गेले. जगन्नाथ पुरीला, कारण ते त्यांना स्वतःला मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेले समजत होते, त्यांनी प्रवेश केला नाही. तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना काशिनाथ मिश्रांच्या घरी जागा दिली. आणि तिथे ते जप करीत होते आणि चैतन्य महाप्रभू त्यांना प्रसाद पाठवत होते अशा प्रकारे त्यांचे दिवस जात होते. आणि चैतन्य महाप्रभु त्यांना भेटण्यासाठी रोज येत असत आणि एक दिवस अशा प्रकारे त्यांचा मृत्य झाला.