MR/Prabhupada 0413 - जपाद्वारे, आपण परिपूर्णतेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत येऊ शकतो



Lecture on SB 1.16.26-30 -- Hawaii, January 23, 1974

जपाचे तीन स्तर आहेत. एक जप अपराधासहित, सुरवात. दहा अपराध आहेत. आपण अनेक वेळा वर्णन केले आहे. जर आपण अपराधासहित जप केला. हा एक स्तर आहे. जर आपण अपराधविरहित जप केला, तो एक स्तर आहे. आणि जर आपण शुद्ध जप… अपराधरहित अद्याप शुद्ध नाही. तुम्ही अपराधरहित करण्याचा प्रयत्न करीत आहात, पण अद्याप अपराधरहित नाही. पण जेव्हा शुद्ध जप होतो, ते यश आहे. नाम, नामाभास, आणि शुद्ध-नाम. तर आपला उद्देश आहे… याची चर्चा झाली आहे. हरिदास ठाकुर आणि एक ब्राम्हण यांच्यामधील चर्चा, तुम्हाला चैतन्य चरितामृतामध्ये सापडेल, तर जप करून, आपण परिपूर्णतेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत येऊ शकतो. सुरवातीला अपराध होऊ शकतात, पण जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला, तर तो नामाभास आहे. नामाभास म्हणजे प्रत्यक्षात शुद्ध नाम नाही. पण जवळजवळ शुद्ध. नामाभास, आणि शुद्ध-नाम.

जेव्हा एखादा शुद्ध-नाम जप करतो, भगवंताचे पवित्र नाव, तर तो कृष्णा बरोबर प्रेमाच्या स्तरावर आहे. ती परिपूर्ण अवस्था आहे. आणि नामाभासी स्तरावर, शुद्ध नाही, तटस्थ; शुद्ध आणि अपराधयुक्तच्या मधील. ती मुक्ती आहे. तुम्ही मुक्त बनता, भौतिक बंधनातून मुक्त. आणि जर आपण अपराधासहित जप केला, तर आपण भौतिक जगात रहातो. भक्तिविनोद ठाकूर म्हणाले आहेत, नामाकार बहिर हय नाम नाही हय हे यांत्रिक आहे, "हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण," पण तरीही हे हरे कृष्ण नाही. नामाकार, नाम बहिर हय, नामाकार, नाम नाही हय. तर आपण शुद्ध नाम घेतले पाहिजे. पण आपण निराश होऊ नये. अगदी अशुद्ध… म्हणून आपली जप करण्याची पद्धत ठरलेली असली पाहिजे. कारण आपण शुद्ध स्तरावर नाही. म्हणून, जबरदस्तीने… ज्याप्रमाणे शाळेतील एक मुलगा. आम्हाला आमच्या लहानपणी शाळेत हे प्रशिक्षण होते. आमच्या शिक्षक आम्हाला सांगत, "तुम्ही दहा पाने शुद्ध लेखन लिहा." तर ते म्हणजे दहा पाने सराव, माझे लेखन चांगले होईल.

तर जरी अगदी आम्ही सोळामाळांचे पालन केले नाही, हरे कृष्ण जप करण्याचा प्रश्न कुठे आहे? तर कृत्रिम होऊ नका, होऊ नका, मला म्हणायचे आहे दिखाऊ. वास्तविक गोष्ट बना. आणि ते आवश्यक आहे. जर तुम्हाला आध्यात्मिक जीवनाचा खरा फायदा हवा असेल, कृत्रिम बनू नका. तुम्हाला दिखाऊ माहित आहे? औषधाच्या दुकानात, एक मोठी बाटली. ती बाटली पूर्ण पाण्याने भरलेली असते. आणि रंग लाल असतो किंवा निळा किंवा त्यासारखा काहीतरी. पण खऱ्या औषधाची आवश्यकता नसते… (कोपऱ्यात:) नाही, आत्ता नाही. खऱ्या औषधाला दिखाव्याची आवश्यकता नाही . एक छोटे… जर आपण शुद्ध अपराधरहित जप करू शकलो, एकदा कृष्ण-नाम. तो सर्व भौतिक बंधनातून मुक्त आहे. केवळ एकदाच. एक कृष्ण नामे यत पाप हय पापी हय तत पाप करी बरो नाही. तर शौचं, शौचं म्हणजे आपल्याला आतून आणि बाहेरून स्वच्छ झाले पाहिजे, शौचं. आत, आपण शुद्ध असले पाहिजे शुद्ध विचार, दूषित नाही. आपण कोणालाही आपले शत्रू समजू नये. प्रत्येकजण मित्र आहे. "मी आहे… मी शुद्ध नाही म्हणून मविचार करीत आहे कोणीतरी माझा शत्रू आहे." अशी अनेक लक्षणे आहेत. तर शौचं: आपण आतून आणि बाहेरून स्वच्छ असले पाहिजे. सत्यम शौचम दया. ती दया मी आधीच स्पष्ट केले आहे. दया म्हणजे पतित जीवांवर दया करणे, जो पतित आहे, जो संकटात आहे. तर प्रत्यक्षात, आताच्या क्षणी संपूर्ण जग, ते पतित आहेत. कृष्ण सांगतात,

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर भवति भारत
अभ्युत्थानम अधर्मस्य
तदात्त्मानं सृजाम्यहम्
(भ.गी. ४.७)
परित्राणाय साधूनाम
विनाशाय च दुश्कृताम
धर्म संस्थापनार्थाय
संभवामि युगे युगे
(भ.गी. ४.८)

तर सध्याच्या क्षणी, कली-युगात, ते व्यावहारिकदृष्ट्या ते सर्व राक्षस आहेत. सर्व राक्षस. म्हणून जर कृष्ण… अर्थात, कधीकधी असे होऊ शकते की कृष्ण राक्षसांचा वध करण्यासाठी येथे येतात. तो कल्कि अवतार आहे. ते जयदेव गोस्वामींनी वर्णन केले आहे. ते काय आहे? केशव धृत-कल्कि-शरीरा जय जगदीश हरे. कलौ, धूमकेतुम इव किम आपि करालम्, म्लेछ-निवह-निधने कलयसि करवालम्. म्लेछ, म्लेछ, हे जग, यवन, हि… वैदिक भाषेत दोन शब्द आहेत, म्लेछ, यवन. यवन म्हणजे मांस-भक्षक. यवन. असे नाही की केवळ युरोपियन यवन आहेत, आणि अमेरिकन नाहीत, भारतीय यवन नाहीत. नाही. जो कोणी मांस खातो, तो यवन आहे. यवन म्हणजे मांस भक्षक. आणि म्लेछ म्हणजे अस्वच्छ. जो वैदिक तत्वांचे पालन करीत नाही, त्याला म्लेछ म्हणतात.

ज्याप्रमाणे… मुस्लिम काफिर म्हणतात. जो मुस्लिम धर्माचे पालन करीत नाही, त्याना काफिर म्हणतात. धर्माच्या दृष्टिकोनातून. आणि ख्रिश्चन "हिथेन्स" म्हणतात. जो ख्रिश्चन धर्माचे पालन करीत नाही, त्याना हिथेन्स म्हणतात. हो कि नाही? त्याचप्रमाणे, कोणीही जो वैदिक तत्वांचे पालन करीत नाही त्याला म्लेच्छ म्हणतात. तर अशी वेळ येईल जेव्हा कोणीही जीवनाच्या वैदिक तत्वांचे पालन करणार नाही. म्हणून, म्लेच्छ. तर म्लेच्छ-निवह, जेव्हा सर लोक म्लेच्छ बनतील, कोणीही वैदिक तत्वांचे पालन करणार नाही, म्लेच्छ-निवह-निधने, त्यावेळी कोणताही उपदेश नाही, केवळ हत्या.