MR/Prabhupada 0421 - महामंत्राचा जप करताना टाळायचे दहा अपराध १ ते ५
Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968
मधुद्विश: श्रीला प्रभुपाद? मी दहा अपराध वाचले पाहिजेत का?
प्रभुपाद: होय.
मधुद्विश: आमच्याकडे ते आहेत.
प्रभुपाद:फक्त पहा. वाचत जा. हो, तू वाच.
मधुद्विश: "महामंत्राचा जप करताना टाळायचे दहा अपराध. क्रमांक पहिला: भगवंतांच्या भक्ताची निंदा करणे."
प्रभुपाद: आता फक्त समजण्याचा प्रयत्न करा. भगवंतांच्या कोणत्याही भक्ताची निंदा केली जाऊ नये. कोणत्याही देशात त्याने काही फरक पडत नाही. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त, तो एक महान भक्त आहे. आणि अगदी मुहम्मद, तो देखील भक्त आहे. असे नाही की कारण आपण भक्त आहोत, आणि ते भक्त नाहीत. असा विचार करू नका. जो कोणी भगवंतांच्या नावाचा प्रचार करतो, तो भक्त आहे. त्याची निंदा करू नये. तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मग?
मधुद्विश: "क्रमांक दुसरा: इतर देवता आणि भगवंतांना समान पातळीवर समजणे, किंवा अनेक देव आहेत असे मानणे.
प्रभुपाद: होय. ज्याप्रमाणे अनेक मूर्ख आहेत, ते सांगतात की देवता… अर्थात, तुम्हाला देवतांबरोबर कोणतेही वैयक्तिक काम नाही. वैदिक धर्मात शेकडो आणि हजारो देवता आहेत. विशेषतः असे सुरु आहे की तुम्ही कृष्ण किंवा शिवा किंवा काली कोणाचीही पूजा करा सारखेच आहे. हा मूर्खपणा आहे. आपण करू नये, मला म्हणायचे आहे ,तुम्ही त्यांना सर्वोच्च भगवंतांच्या समान पातळीवर मानू नये . कोणीही भगवंतांपेक्षा महान नाही. कोणीही भगवंतांच्या समान नाही. तर हि समानता टाळली पाहिजे. मग?
मधुद्विश: "क्रमांक तिसरा: आध्यत्मिक गुरूच्या आज्ञेचे उल्लंघन करणे."
प्रभुपाद: हो. आध्यात्मिक गुरुची आज्ञा तुमचे जीवन आणि आत्मा (सर्वस्व)असले पाहिजे. मग सगळे स्पष्ट होईल. मग?
मधुद्विश: "क्रमांक चौथा: वेदांचे अधिकार कमी करणे."
प्रभुपाद: हो. कोणीही अधिकृत शास्त्रवचनांना कमी करू नये.
मधुद्विश: "क्रमांक पाचवा: देवाच्या पवित्र नावाचा स्वतःच अर्थ लावणे."
प्रभुपाद: हो. आता ज्याप्रमाणे आपण हरे कृष्ण जप करतो. जसे त्या दिवशी कोणी मुलगा होता: "एक प्रतीक." हे प्रतीकात्मक नाही. कृष्ण. आपण "कृष्णाचा," जप करतो कृष्णाला संबोधित करीत आहोत. हरे म्हणजे कृष्णाची शक्ती, आणि आपण प्रार्थना करतो, की, "कृपया मला तुमच्या सेवेत गुंतवा." ते हरे कृष्ण आहे. तिथे दुसरा काही अर्थ नाही. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. फक्त प्रार्थना आहे, हे भगवंतांची शक्ती, हे भगवान कृष्ण, भगवान राम, कृपया मला तुमच्या सेवेत गुंतवा." एवढेच. तिथे इतर दुसरा काही अर्थ नाही.