Template

Template:MR/Marathi Main Page - What is Vanipedia

वाणीपीडिया हा श्रील प्रभुपादांच्या शब्दांचा (वाणी) गतीशील ज्ञानकोश आहे. सहकार्याद्वारे आपण श्रील प्रभुपादांच्या शिकवणुकीचे विविध दृष्टिकोनातून अन्वेषण करतो, त्यांचे विस्तृतपणे संकलन करतो आणि त्या सुलभ आणि सहज समजण्यायोग्य मार्गाने सादर करतो. श्रील प्रभुपादांच्या डिजिटल शिकवणुकीचा, सर्वांच्या हितासाठी, जगाला कृष्ण जाणीवांचे विज्ञान उपदेश करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी निरंतर, जागतिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही एक अतुलनीय भांडार बांधत आहोत.


वाणीपीडिया प्रकल्प हा जागतिक बहुभाषिक सहयोगी प्रयत्न आहे, जो श्रीला प्रभुपादांच्या कित्येक भक्तांमूळे विविध मार्गांनी सहभागी होण्यास पुढे येत असल्यामुळे यशस्वी होत आहे. प्रत्येक भाषा विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असते. नोव्हेंबर २०२७ मध्ये त्यांच्या ५० व्या पुण्यतिथी वर्धापन दिनानिमित्त श्रीला प्रभुपादांची सर्व रेकॉर्ड केलेली व्याख्याने, संभाषणे आणि त्यांची पत्रे किमान १६ भाषांमध्ये अनुवादित केलेली आहेत आणि ३२ भाषांमध्ये कमीतकमी २५ % अनुवादित करावयाची आहेत. हिंदी यांपैकी एक भाषा असेल का?