MR/Prabhupada 0382 - दशावतार स्तोत्र भाग २: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0382 - in all Languages Category:MR-Quotes - 1970 Category:MR-Quotes - P...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0381 - दशावतार स्तोत्र भाग १|0381|MR/Prabhupada 0383 - गौर पहुचे तात्पर्य|0383}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0381 - |0381|MR/Prabhupada 0383 - |0383}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->

Latest revision as of 22:38, 1 October 2020



Purport to Sri Dasavatara Stotra -- Los Angeles, February 18, 1970

पुढचा अवतार वामनदेव आहे, बटू. प्रभू वामन बली महाराजांसमोर अवतरित झाले. ती सुद्धा आणखी एक फसवणूक होती. बली महाराजांनी सर्व ग्रहांवर विजय मिळवला, आणि देव खूप त्रासलेले होते. तर वामन महाराज… वामनदेव बली महाराजांकडे गेले. की "तू मला काही दान दे. मी ब्राम्हण आहे. मी तुझ्याकडे भिक्षा मागायला आलो आहे." तर बली महाराज म्हणाले, "होय. मी तुला देईन." तर त्यांना फक्त तीन पावलं जमीन हवी होती. तर एका पावलाने संपूर्ण विश्व व्यापले, वरचे, आणि दुसऱ्या पावलाने दुसरे अर्धे व्यापले. मग तिसरे पाऊल बली महाराज म्हणाले, "हो, आता तिथे जागा नाही. कृपया तुमचे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. हे घ्या माझे मस्तक." तर बली महाराजांच्या बलिदानाने वामनदेव खूप प्रसन्न झाले. त्यानी भगवंतांना सर्वकाही दान केले. म्हणून ते बारा महाजनांपैकी एक आहे. बारा महाजनांपैकी, बली महाराज एक महाजन आहेत. कारण त्यांनी परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी सर्वकाही अर्पण केले.

आणि पुढचा परशुराम आहे, परशुराम, त्यांनी एकवीस वेळा नरसंहार केला. सर्व क्षत्रिय राजांना मारण्यासाठी. त्या वेळी क्षत्रिय राजे खूप अप्रामाणिक होते, तर त्यांनी एकवीस वेळा त्यांना मारले. ते इकडे तिकडे पळून गेले. आणि महाभारताच्या इतिहासावरून हे समजते, त्या वेळी काही क्षत्रिय पळाले आणि त्यांनी युरोपियन दिशेला आश्रय घेतला आणि त्या क्षत्रियांपासून इंडो-युरोपियन वंश निर्माण झाला. तो इतिहास आहे, महाभारतातील ऐतिहासिक माहिती. मग पुढचा अवतार प्रभू राम आहे. तर ते रावणाबरोबर लढले, ज्याला दहा तोंडे होती. तर...आणि पुढचा अवतार बलराम आहे. बलराम श्रीकृष्णांचा मोठा भाऊ आहे. ते शंकर्षणचा अवतार आहेत, श्रीकृष्णांचा पुढील विस्तारित अवतार. तर त्यांचा रंग गोरा होता, आणि त्यांनी निळी वस्त्रे परिधान केली होती, आणि त्यांच्या हलाने ते कधीकधी यमुना नदीवर रागावले होते, आणि त्यांनी यमुना नदी सुकवण्याचा प्रयत्न केला. ते वर्णन इथे दिले आहे. आणि यमुना, भीतीमुळे, ती बलरामांच्या प्रस्तावाशी सहमत झाली.

आणि पुढचा अवतार भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्ध, त्यांनी वैदिक सिद्धांत नाकारले. म्हणून त्यांना नास्तिक समजले जाते. जो कोणी वैदिक तत्वांशी सहमत नाही, त्याला नास्तिक मानले जाते. ज्याप्रमाणे जे कोणी बायबलवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना अधार्मिक वृत्तीचे म्हणतात, त्याचप्रमाणे, जे वैदिक तत्वे स्वीकारीत नाहीत, त्यांना नास्तिक म्हणतात. तर भगवान बुद्ध जरी श्रीकृष्णांचा अवतार होते, त्यांनी सांगितले की "मी वेदांवर विश्वास ठेवत नाही." काय कारण होते? गरीब प्राण्यांना वाचवणे हे कारण होते. त्यावेळी लोक वैदिक यज्ञाच्या नावाखाली गरीब प्राण्याचा बळी देत होते. तर आसुरिक व्यक्ती, त्यांना अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली काहीतरी करायची इच्छा होती. ज्याप्रमाणे मोठा वकील कायद्याच्या पुस्तकांचा आधार घेतो आणि कायदा बेकायदेशीर बनवतो. त्याप्रमाणे, आसुर इतके हुशार असतात की ते आध्यात्मिक आदेशाचा आधार घेतात आणि ते काहीही करतात. तर या गोष्टी चालू आहेत. वैदिक बलिदानाच्या नावाखाली, ते कशाही तर्हेने प्राणी मारतात. तर भगवान या गरीब प्राण्यांवर अतिशय दयाळू झाले. आणि ते भगवान बुद्ध म्हणून अवतरले, आणि त्यांचे तत्वज्ञान अहिंसा होते. त्यांचे तत्वज्ञान नास्तिक होते, कारण त्यांनी सांगितले की "देव नाही. पदार्थाचे मिश्रण एक प्रकटीकरण आहे, आणि तुम्ही भौतिक घटक विलग करता, शून्य होईल आणि तिथे आनंद आणि वेदनेची जाणीव नसेल. ते निर्वाण जीवनाचे अंतिम ध्येय आहे." ते त्यांचे तत्वज्ञान आहे. पण वास्तविक त्यांचे उद्दिष्ट प्राण्यांची हत्या थांबवणे होते, माणसांना पाप कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी. म्हणून भगवान बुद्धांची पण प्रार्थना केली जात आहे. तर लोकांना आश्चर्य वाटते, की भगवान बुद्ध नास्तिक म्हणून गणले जातात. आणि तरीही वैष्णव, ते भगवान विष्णू ( बुद्ध) यांना आदरयुक्त प्रार्थना अर्पण करतात. (का)? कारण वैष्णव जाणतात भगवंत त्यांच्या वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी कसे कार्य करतात. बाकीच्यांना, ते माहित नाही.

पुढील अवतार कल्की आहे. तो अजून व्हायचा आहे. कल्की अवतार या युगाच्या, कलियुगाच्या अंताला अवतरीत होईल. . कलियुगाचा वय, या युगाचा कालावधी अद्याप आहे, मला म्हणायचे आहे, पूर्ण होणार ४००,००० वर्षे. तर कलियुगाच्या अंतकाळी, त्याचा अर्थ शेवटच्या टप्प्यात, ४००,००० वर्षानंतर, कली अवतार होईल ते वैदिक साहित्यात भाकीत केले आहे, जसे भगवान बुद्धांचा अवतार देखील श्रीमद भागवतामध्ये भाकीत केला गेला होता. आणि श्रीमद-भागवतं पाच हजार वर्षांपूर्वी संकलित केले गेले, आणि भगवान बुद्ध २५०० वर्षांपूर्वी प्रकट झाले. म्हणून भगवान बुद्धांच्या अवतारबद्दल भाकीत केले आहे. की कलियुगाच्या सुरवातीला भगवान बुद्ध अवतार घेतील. भाकीत होते, आणि प्रत्यक्षात ते खरे झाले. त्याचप्रमाणे, कल्की अवताराचे भाकीत केले गेले आहे, आणि ते देखील खरे ठरेल. तर त्यावेळी, भगवान कल्कीचे कार्य फक्त मारणे असेल. सूचना नाहीत. जसे... भगवद् गीतेमध्ये भगवान कृष्णांनी भगवद् गीतेच्या आकारात सूचना दिल्या. पण कलियुगाच्या अंतकाळी, लोक इतकी पतित होतील की तिथे कोणतीही सूचना देण्याची काहीही शक्यता नाही. ते समजू शकणार नाहीत. त्यावेळी शस्त्र असेल फक्त त्यांना मारणे. आणि जो कोणी भगवंतांद्वारे मारला जाईल, त्याला सुद्धा मोक्ष मिळेल. तो भगवंतांचा दयाळू गुण आहे. एकतर ते रक्षण करतात किंवा ते मारतात परिणाम सारखाच आहे. तर तो कलियुगाचा अंतिम टप्पा असेल, आणि त्यानंतर, परत सत्य-युग, धार्मिकतेचे युग सुरु होईल. हे वैदिक साहित्याचे विधान आहे.