MR/Prabhupada 0361 - ते माझे गुरु आहेत. मी त्यांचा गुरु नाही: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0361 - in all Languages Category:MR-Quotes - 1971 Category:MR-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0360 - |0360|MR/Prabhupada 0362 - |0362}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0360 - आम्ही थेट कृष्णाजवळ जात नाही. आम्ही आमची सेवा कृष्णाच्या सेवकापासून सुरु करतो|0360|MR/Prabhupada 0362 - जसे आपले बारा जीबीसी आहेत, तसेच श्रीकृष्णाचे जीबीसी आहेत|0362}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->

Latest revision as of 18:10, 1 October 2020



Lecture on BG 7.3 -- Bombay, March 29, 1971

जर आपण हि भक्तीपूर्ण सेवा स्वीकारली, तर हा जप, कृष्ण या पवित्र नावाचे हे कंपन, अतिशय साधी पद्धत, जर आपण ती स्वीकारली… जसे आम्ही या मुलांना हि जप पद्धती दिली, आणि त्यांनी ती नम्रपणे स्वीकारली. आणि जर त्यांनी नियमित काम चालू ठेवले, तर हळूहळू त्यांना कृष्ण काय ते समजेल. तुम्ही पहात आहात प्रगत विद्यार्थी जे आनंदाने नाचत आहेत, तुम्ही समजू शकाल त्यांना कृष्ण किती समजले आहेत. एक साधी पद्धत. आणि कोणीही रोखले किंवा प्रतिबंध केलेला नाही. "तुम्ही हिंदू नाही आहेत. तुम्ही हरे कृष्णाचा जप करू शकत नाही." नाही. येई कृष्ण-तत्त्व-वेत्ता सई गुरु हय (चैतन्य चरितामृत मध्य ८.१२८)। तो हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा हा किंवा तो कोणीही असला तरी फरक पडत नाही.

आपल्याला कृष्ण विज्ञान, भगवद् गीता जशी आहे तशी शिकली पाहिजे. मग तो आध्यात्मिक गुरु बनतो. हि मुले, हा मुलगा आणि मुलगी यांनी विवाह केला, मी त्यांना ऑस्ट्रेलियाला पाठवत आहे. मुलगा ऑस्टेलियाहुन आला आहे, मुलगी स्वीडनहुन आली आहे. आता ते एकत्र आले आहेत. आता ते सिडनीमध्ये आमच्या संस्थेची देखभाल करणार आहेत. आता मी दोन किंवा तीन दिवसात त्यांना पाठवत आहे. ते मंदिराची व्यवस्था पहातील आणि ते प्रचार सुद्धा करतील. या कृष्णभावनामृत आंदोलनाचा त्यांच्या मदतीने विस्तार होत आहे. मी एकटा आहे, पण ते मला मदत करत आहेत. ते माझे गुरु आहेत. मी त्यांचा गुरु नाही. (टाळ्या) कारण ते माझ्या गुरु महाराजांच्या अज्ञानेचे पालन करण्यास मला मदत करत आहेत. तर हा चांगला संयोग आहे की कोणीतरी ऑस्ट्रेलियाला जात आहे, कोणी फिजी बेटावर जात आहे, कोणी हॉंगकॉंगला जात आहे, कोणी झेकोस्लोवाकियाला जात आहे. आणि आम्ही रशियाला जाण्यासाठी सुद्धा वाटाघाटी करत आहोत. चीनला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही पाकिस्तानलाही दोन मुले पाठवली आहेत - एक ढाक्याला आणि एक कराचीला. (टाळ्या)

तर हि मुले, हि अमेरिकन मुले, मला मदत करत आहेत. मला खेद आहे की कोणी भारतीय यासाठी पुढे येत नाही. अर्थात, काही आहेत, पण खूपच कमी. त्यांनी पुढे आले पाहिजे, भारताच्या तरुण पिढीने, त्यांनी ह्या आंदोलनात सामील झाले पाहिजे. जगभर कृष्णभवनामृताचा प्रसार केला पाहिजे. ते भारतीयांचे काम आहे. चैतन्य महाप्रभूंनी सांगितले,

भारत-भूमिते हैल मनुष्य-जन्म यार
जन्म सार्थक करी कर पर उपकार
(चैतन्य चरितामृत अादि ९.४१) ।

हे पर-उपकार काम, जगभर कृष्णभावनामृताचा प्रसार करण्याचे कल्याणकारी कार्य, सध्याच्या क्षणी हे सगळ्यात महत्वाचे कार्य आहे. ते प्रत्येकाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सर्व प्रकारे एकत्रित करेल. कृष्ण. कृष्ण केंद्र आहे, ते खरं आहे. ते प्रगती करत आहे. आणि जर आपण जास्तीतजास्त प्रयत्न केला, त्याची अधिकाधिक प्रगती होईल.