MR/Prabhupada 1063 - आपल्याला कर्म आणि कर्मफलांच्या सर्व बंधनातून मुक्ती प्रदान करतात

Revision as of 09:32, 12 September 2017 by Pathik (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1063 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


660219-20 - Lecture BG Introduction - New York

ज्याप्रमाणे आपल्या वर्तमान जीवनामध्ये सुद्धा, आपण आपली कर्मे , आणि त्यापासून प्राप्त होणारी फळे भोगतो. समजा कि मी एक व्यापारी आहे आणि मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप परिश्रम केले आणि मी भरपूर पैसे मिळविले . आता मी त्या पैशांचा उपभोक्ता आहे. त्याचप्रमाणे, जर मी माझा व्यवसाय खूप पैसे गुंतवून सुरु केला, परंतु मी तो यशस्वी करू शकलो नाही. मी माझे सर्व पैसे गमाविले. त्यामुळे मी आत्ता यातना भोगतोय. त्याच प्रमाणे, जीवनातील सर्व स्तरांवर आपण भोग भोगतो, आपण आपल्या कर्माची फळे उपभोगतो. यालाच कर्म असे म्हणतात.

अशाप्रकारे ईश्वर, जीव, प्रकृती किंवा परम भगवान, जीव, भौतिक प्रकृती, अनंत काळ आणि आपली विविध कर्मे, या गोष्टींची व्याख्या भगवद-गीते मध्ये केली गेली आहे. या पाच गोष्टींपैकी, ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ या चार गोष्टी शाश्वत आहेत. प्रकृतीची अभिव्यक्ती अस्थायी असू शकेल, परुंतु म्हणून प्रकृती मिथ्या नाही. काही दार्शनिक म्हणतात कि हि प्रकृती मिथ्या आहे, परंतु भगवद-गीते मध्ये प्रस्तुत केलेल्या तत्वज्ञानानुसार किंवा वैष्णव सिंद्धांतानुसार, प्रकृती मिथ्या आहे हि विधान मान्य नाही. ते असे मानतात कि प्रकृती हि अशाश्वत आहे, मिथ्या नाही. ती केवळ त्या मेघाप्रमाणे आहे, जो आकाशामध्ये दिसूलागतो आणि पावसाळ्याला सुरुवात होते, आणि आपण हे पाहू शकतो कि पावसाळ्यानंतर लगेचच शेतामध्ये अनेक नवनवीन पिके येतात. आणि जसा पावसाळा संपतो तसे मेघ नाहीसे होतात. त्याचप्रमाणे, हळू हळू, सर्व पीके सुकून जातात आणि पुन्हा एकदा ती जमीन नापीक होते. अशाप्रकारे, या भौतिक जगताची अभिव्यक्ती देखील कालांतराने होत असते. आपण भगवद गीतेच्या पानांमधून हे समजावून घेऊ शकतो, जाणू शकतो कि "भूत्वा भूत्वा प्रलीयते " (भ.गी. ८|१९) भौतिक जगताची हि अभिव्यक्ती काही कालावधीसाठी भव्य /उदात्त होते आणि पुन्हा ती नाहीशी होते. हे प्रकृतीचे कार्य आहे. परंतु हे निरंतर चालते. म्हणून प्रकृती शाश्वत आहे. हि मिथ्या नाही. कारण भगवंतांनी हे स्वीकारले आहे कि, मम प्रकृति, "माझी प्रकृती" अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् (भ.गी. ७|५). भिन्ना प्रकृति, भिन्ना प्रकृति, अपार प्रकृति. हि भौतिक प्रकृति हि परमेश्वराची एक भिन्न (विलग) शक्ती आहे, आणि जीव, हे देखील परमेश्वराची शक्ती आहेत, परंतु ते विलग नाहीत. त्यांच्यातील संबंध शाश्वत आहे. अशाप्रकटे भगवंत, जीव, निसर्ग, भौतिक प्रकृति आणि काल, हे सर्व शाश्वत आहेत. परंतु कर्म शाश्वत नाहीत. कर्म आणि कर्मफल अतिशय पुरातन असू शकते. आपण आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांची फळे अनादी कालापासून भोगीत आलो आहोत. परंतु तरीदेखील, आपण आपली कर्मे अथवा कर्मांची फळे बदलू शकतो. हा बदल आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेवर अवलंबून आहे. निःसंदेह आपण विविध प्रकारची कर्मे करण्यात व्यस्त आहोत. परंतु आपल्याला हे माहित नाही कि आपण कशा पद्धतीची कर्मे केली पाहिजेत ज्यामुळे आपल्याला कर्म आणि कर्मफल यांच्या चक्रातून मुक्ती मिळू शकेल. याचे हि वर्णन भगवद गीते मध्ये केले गेले आहे.

तर, ईश्वराची स्थिती हि परम चेतन स्वरूप आहे. ईश्वर किंवा परमेश्वराची स्थिती परम चेतन स्वरूप आहे. आणि जीव किंवा समस्त प्राणिमात्र, कारण कि ते भगवंतांचे अंश स्वरूप आहेत, ते देखील चेतन आहेत. जीव देखिल चेतन आहे. जीवाचे वर्णन प्रकृति म्हणून केले गेले आहे, आणि भौतिक सृष्टी चे वर्णन देखिल प्रकृति म्हणून केले गेले आहे, परंतु या दोहोंमध्ये, एक प्रकृति, जीव, हे चेतन आहेत. दुसरी प्रकृति चेतन नाही. हाच फरक आहे. म्हणून जीव प्रकृतिस श्रेष्ठ म्हणाले जाते, कारण जीव हे भगवंतांप्रमाणेच चेतन आहेत. भगवंत हे परम चेतन आहेत. कोणीही असा दावा करू नये कि जीव, अथवा प्राणिमात्र देखिल परम चेतन आहेत. नाही. एक जीव त्याच्या कुठल्याही सिद्धावस्थेत परम चेतन होऊ शकत नाही. हा एक भ्रामक सिद्धांत आहे. हा एक भ्रामक सिद्धांत आहे. परंतु तो चेतन आहे, एव्हढच. परंतु तो परम चेतन नाही.