MR/Prabhupada 0043 - भगवद-गीता मुलभूत सिद्धांत आहे

Revision as of 12:36, 21 October 2018 by Vanibot (talk | contribs) (Vanibot #0023: VideoLocalizer - changed YouTube player to show hard-coded subtitles version)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 7.1 -- Sydney, February 16, 1973

प्रभुपाद:

(मय्यासक्तमनाः पार्थ)
योगं युञज्न् मदाश्रय:
असंशयं समग्रं मां
यथा ज्ञास्यसि तच्छृणु :(भ.गी. ७।१)

हा भगवद्गीतेतला एक श्लोक आहे कृष्ण भावनामृत किंवा ईश्वरीय भावना कशी विकसित करावी. भगवद्-गीता, तुमच्यापैकी बहुतेकांनी या पुस्तकाचे नाव ऐकलेले आहे. हे ज्ञानाने परिपूर्ण असलेले पुस्तक संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात वाचले जाते. प्रत्यक्षपणे प्रत्येक देशात भगवद्-गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत. तर, भगवत-गीता आपल्या कृष्ण भावनामृत चळवळीचे मूलभूत तत्त्व आहे. आपण कृष्ण भावनामृताच्या रूपात ज्याचा विस्तार करत आहोत, ते भगवद्-गीताच आहे. असे नाही की आम्ही काही निर्मित केले आहे. कृष्ण भावनामृत निर्मितीपासूनच अस्तित्वात आहे, परंतु निदान गेल्या पाच हजार वर्षांपासून जेव्हा कृष्ण या ग्रहावर उपस्थित होते, त्यांनी स्वतः कृष्ण भावनामृताचे निर्देश दिले, आणि उपदेंश जे त्यांनी मागे ठेवले , ती ही भगवद्-गीता आहे.

दुर्दैवाने, या भगवद्गीतेचा तथाकथित विद्वान आणि स्वामीं द्वारे अनेक प्रकारे गैरवापर केला गेला मानवतावादी अवतार किंवा पुरुषांचा नास्तिक वर्ग त्यांनी स्वतःच्या पद्धतीने भगवद्गीतेचा अर्थ लावला आहे. १९६६ मध्ये मी अमेरिकेत असताना एका अमेरिकन स्त्रीने मला विचारले कि मी भगवद्गीतेची इंग्रजी भाषेतली आवृत्ती सुचवावी जेणे करून ती ते वाचू शकते पण प्रामाणिकपणे सांगू , मी त्यापैकी एकाचीही शिफारस करू शकलो नाही त्यांच्या लहरी स्पष्टीकरणामुळे . त्यातूनच मला "भगवद्-गीता जशी आहे तशी" लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

आणि हि सध्याची आवृत्ती "भगवद्-गीता जशी आहे तशी" ,मॅकमिलन कंपनीने प्रकाशित केली आहे, जगातील सर्वात मोठा प्रकाशक आणि आम्ही छान काम करीत आहोत. आम्ही १९६८ मध्ये लहान आवृत्तीत "भगवद्-गीता जशी आहे तशी" प्रकाशित केले आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली मॅकमिलन कंपनीच्या ट्रेड मॅनेजरने कळविले की , आमच्या पुस्तकाची अधिक आणि अधिक विक्री होत आहे आणि इतरांची विक्री कमी होत आहे आणि नुकतीच 1972 साली आम्ही "भगवद्गीता जशी आहे तशी " ची संपूर्ण आवृत्ती प्रकाशित केली आणि मॅकमिलन कंपनीने पन्नास हजार प्रती अगोदरच प्रकाशित केल्या त्या तीन महिन्यांतच संपल्या आणि आता ते दुसऱ्या आवृत्तीची व्यवस्था करीत आहेत.