MR/Prabhupada 0044 - सेवेचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे



Lecture on BG 4.1 -- Montreal, August 24, 1968

तर याचा अर्थ असा आहे कि तो कृष्णाच्या आदेशांचे पालन करत आहे .बस. त्याची हरकत नाही कि " मी कृष्णाचा चा शत्रू बनायला चाललोय " सिद्धांत हा आहे कि तो पालन करत आहे जर कृष्णा ने सांगितले " तू माझा शत्रू बन " तर मी त्याचा शत्रू बनू शकतो . हाच भक्ती योग आहे. हो. मला कृष्णाला प्रसन्न करायचं आहे . जसे एक स्वामि आपल्या नोकराला सांगतो " तू मला इथे मार " आणि तो तशा प्रकारे मारत आहे . तर ती सेवा आहे. इतरांना वाटेल " हा तर मारत आहे आणि विचार करत आहे कि मी सेवा करत आहे ? हे काय आहे ?

तो तर मारत आहे " पण स्वामि ची इच्छा आहे कि "तू मला मार" हीच सेवा आहे . सेवा म्हणजे तुम्ही मालकाच्या आज्ञेचे पालन करावे . ती सेवा काय आहे याने फरक नाही पडत . भगवान चैतन्यांच्या जिवनातील एक छान उदाहरण आहे , त्यांचा एक खाजगी सेवक होता ,गोविंद . भगवान चैतन्य जेव्हा प्रसाद ग्रहण करतील त्यानंतरच गोविंद प्रसाद ग्रहण करायचा तर एक दिवस , भगवान चैतन्य प्रसाद घेतल्यानंतर उंबरठ्यावर झोपले काय म्हणतो आपण त्याला ? उंबरठा ? दरवाजा ? प्रवेशद्वार तर गोविंद त्यांना ओलांडून गेला जेव्हा ते विश्राम करायचे तेव्हा गोविंद त्यांचे पाय चेपायचा तर गोविंद त्यांना ओलांडून गेला आणि त्यांचे पाय चेपु लागला.

तेव्हा भगवान चैतन्य झोपले होते , आणि जवळपास अर्ध्या तासा नंतर , जेव्हा ते उठले , त्यांनी पाहिले , " गोविंदा , तू अजून तुझा प्रसाद नाही घेतलास ?" " नाही प्रभू ." " का ?" " मी तुम्हाला ओलांडून नाही जाऊ शकत .तुम्ही इथे झोपले आहात ." "मग तू आत कसा आलास ?" "मी तुम्हाला ओलांडून आलो " " जर तू आधी मला ओलांडून आलास , तर पुन्हा ओलांडून का नाही जाऊ शकत ?" "आधी मी तुमची सेवा करण्यासाठी आलो . आणि आता मी माझा प्रसाद घेण्यासाठी तुम्हाला ओलांडून नाही जाऊ शकत " ते माझे कर्तव्य नाही आहे . ते माझ्या स्वतः साठी असेल . आणि हे मी तुमच्यासाठी करत आहे . तर कृष्णाच्या आनंदासाठी तुम्ही त्याचे शत्रू बनू शकता , तुम्ही त्याचे मित्र बनू शकता , तुम्ही काहीही बनू शकता . हाच भक्ती योग आहे. कारण तुमचे ध्येय आहे की कृष्णाला कसे प्रसन्न करावे . आणि जेव्हा असा क्षण येईल कि तुम्हाला तुमच्या इंद्रियांना प्रसन्न करावस वाटेल , तेव्हा तुम्ही या भौतिक जगात येता , त्वरीत .

कृष्ण-बहिर्मुख ह्या भोग वांछा करे
निकट स्थ माया तारे जापतीया धरे (प्रेम-विवर्त )

जेव्हा आपण कृष्णाला विसरतो आणि स्वतः च्या इंद्रिय संतुष्टी साठी यत्न करू पाहतो , ती माया आहे. आणि जसे आपण इंद्रिय संतुष्टी च्या प्रक्रियेचा त्याग करतो आणि प्रत्येक कर्म कृष्णासाठी करू लागतो , तीच मुक्ति आहे .