MR/Prabhupada 0148 - आपण भगवंतांचे अंश आहोत

Revision as of 17:53, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 7.6.1 -- Madras, January 2, 1976


त्याला धर्म म्हणतात. संबंध,अभिध्येय, प्रयोजन, ह्या तीन गोष्टी. संपूर्ण वेद तीन भागात विभागले गेले आहेत. संबंध, आपलं भगवंतांशी काय नातं आहे.त्याला संबंध म्हणतात. आणि मग अभिध्येय . आपलं जे नातं आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याला अभिध्येय म्हणतात. आणि का असं वागलं पाहिजे? कारण आपल्याला जीवनाचा ध्येय सापडलं आहे. जीवनाचा ध्येय मिळवण्यासाठी तर आयुष्याचं ध्येय काय आहे? आयुष्याच ध्येय ते आहे. तुमच्या मूळ घरी,देवाच्याद्वारी. ते आयुष्याचे ध्येय आहे. आपण भगवंतांचे अंश आहोत. भगवंत सनातन आहेत आणि त्यांचं स्वतःच सनातन निवास्थान आहे.


परस्तस्मातु भावोSन्योSव्यत्त्कोSव्यत्त्कात्सनातः (भ गी ८।२०)

ते एक सनातन स्थान आहे. हे भौतिक जग,कायम अस्तित्वात राहत नाही.

भूत्वा भूत्वा प्रलीयते (भ गी ८।१९)

ते ठराविक काळापुरते प्रकट होते. ज्याप्रमाणे तुमचा देह आणि माझा देह, ते ठराविक काळापुरत व्यक्त होते ते काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते. त्यापासून उपफळे उत्पन्न होतात. मग आपण वृद्ध होतो,झीज होते, आणि मग लुप्त होते. याला षडविकार म्हणतात. जे काही आहे ते भौतिक आहे. पण दुसरी प्रकृती आहे तिथे षड्विकार नाहीत.ती सनातन आहे तर त्याला सनातन धर्म म्हणतात. आणि जीव, आपण जिवंत प्राणी, आपल्याले वर्णन सुद्धा शाश्वत म्हणून केले आहे.

न हन्यते हन्यमाने शरीरे (भ गी २।२०)

आणि भगवंतानाही सनातन म्हणून संबोधले जाते. तर आपली मूळ स्थिती ही आहे की आपण सनातन आहोत. श्रीकृष्ण सनातन आहेत आणि श्रीकृष्णांचे निवासस्थान सनातन आहे. जेव्हा आपण त्या सनातन धर्माकडे परत जातो आणि सर्वोच्च सनातन श्रीकृष्णानं बरोबर रहातो... आणि आपण सुद्धा सनातन आहोत. ज्यापद्धतीने आपण जीवनाचे सर्वोच्च उद्दिष्ट साध्य करू शकतो, तिला सनातन धर्म म्हणतात. आपण इथे सनातन धर्म पाळत आहोत. तर सनातन धर्म आणि हा भागवत धर्म, एकच गोष्ट. भागवत, भगवान. भगवान शब्दापासून भागवत शब्द आला आहे. तर हा भागवत धर्म श्री चैतन्य महाप्रभूंनी भागवत धर्माचे वर्णन केले आहे. त्यांनी सांगितलय,

जीवेर स्वरूप हय नित्य कृष्ण दास (चै च मध्य २०।१०८-१०९)

आपण श्रीकृष्णांचे चिरंतर दास आहोत. हे आहे. पण सध्याच्या क्षणी, आपल्या भौतिक संपर्कामुळे, भगवंतांचे किंवा श्रीकृष्णांचे दास बनण्या ऐवजी, आपण इतर अनेक गोष्टींचे,मायेचे दास बनलो आहोत,आणि म्हणून आपण दुःख भोगत आहोत. आपण समाधानी नाही. तिथे असू शकत नाही. ते उचित नाही. ज्याप्रमाणे तुम्ही यंत्रामधून एक खिळा घ्या. जर खिळा काही कारणाने किंवा इतर कशाने खाली पडला तो उपयोगाचा रहाणार नाही. पण तोच खिळा, जेव्हा तुम्ही यंत्रामध्ये बसवलात किंवा त्या खिळ्याशिवाय ते यंत्र चालत नसेल. ते बिघडलेल्या अवस्थेत आहे,म्हणून तुम्ही तोच खिळा घ्या आणि त्यात बसवा. आणि ते यंत्र सुरु झाले आणि तो खिळा अत्यंत मौल्यवान बनेल. तर आपण भगवंतांचे,श्रीकृष्णांचे अंश आहोत. श्रीकृष्ण,त्यांनी सांगितलंय

ममैवांशो जीवभूतः (भ गी १५।७)

तर आपण आता वेगळे झालो आहोत. आपण पतित आहोत. दुसरं उदाहरण ज्याप्रमाणे मोठी आग आणि ठिणगी. ठिणगी सुद्धा अग्नी असते जोपर्यंत ती अग्नीपासून वेगळी होत नाही. आणि जर काही कारणाने ठिणगी आगीतून खाली पडली,ती विझते, त्यात आगीचे गुण रहात नाही, पण ती उचलली आणि पुन्हा आगीत टाकली,तिची परत ठिणगी बनते. तर आपलीपण स्थिती तशीच आहे. है नाहीतर त्या किंवा इतर कारणाने,आपण या भौतिक जगात आलो आहोत. जरी आपण लहान कण, भगवंतांचे अंश असलो. पण कारण आपण या भौतिक जगात आहोत आपण भगवंतां बरोबरचे आपले नाते विसरलो आहोत आणि आपली...

मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति (भ गी १५।७)

आपण भौतिक जगाच्या नियमान विरुद्ध संघर्ष करत आहोत, इतर अनेक गोष्टी, इथेही आपण सेवा करत आहोत. कारण आपण चिरंतर सेवक आहोत. परंतु कारण आपण भगवंतांची सेवा करणं सोडून दिल्याने आपल्याला इतर अनेक गोष्टींची सेवा करण्यात गुंताव लागत आहे. पण कोणीही समाधानी नाही,जसे (आदरणीय) न्ययमूर्तींनी सांगितलं कोणीही समाधानी नाही. ते खरं आहे. ते समाधान करू शकत नाही. ते समाधान करू शकत नाही कारण आपण घटनात्मकरूपाने भगवंतांचे दास आहोत. पण आपल्याला या भौतिक जगात इतर अनेक गोष्टीची सेवा करायला पाठवलं आहे. जे योग्य नाही. म्हणून आपण अनेक प्रकारच्या सेवेच्या योजना करत आहोत त्याला मानसिक तर्कवितर्क म्हणतात.

मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति (भ गी १५।७)

संघर्ष. हा संघर्ष आहे.