MR/Prabhupada 0312 - मनुष्य विचारी प्राणी आहे

Revision as of 18:07, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Morning Walk -- April 1, 1975, Mayapur

प्रभुपाद : आता, किमान माझ्यासाठी तरी, हे कृष्णभावनामृत आंदोलन फारसे सैद्धांतिक नाही. ते व्यावहारिक आहे. मी सर्व समस्या सोडवू शकतो.

पुष्ट कृष्ण : परंतु लोक कोणत्याही प्रकारची तपश्चर्या किंवा कष्ट स्वीकारायला तयार नाहीत.

प्रभुपाद : हं?

पुष्ट कृष्ण : लोक कोणतीही तपश्चर्या स्वीकारणार नाहीत.

प्रभुपाद : मग त्यांना रोगाच्या स्वरूपात कष्ट स्वीकारावे लागतील. जर तुम्ही आजारी पडलात, तर मग तुम्हाला... ही तपश्चर्या म्हणजे काय आहे? तपश्चर्या कोठे केली जाते?

पुष्ट कृष्ण : जर ते औषध स्वीकारणार नाहीत, तर ते निरोगी होऊ शकणार नाहीत.

प्रभुपाद : मग त्यांना त्रास सहन करावा लागेल. एखाद्या आजारी माणसाची औषध घेण्याची इच्छा नाहीये, मग बरा...? त्याला त्रास सहन करावाच लागेल. तो बरा कसा होणार?

पंचद्रविड : ते म्हणतात की खऱ्या अर्थाने आपण आजारी आहोत.

प्रभुपाद : हं?

पंचद्रविड : ते म्हणतात आपण आजारी झालो आहोत. ते म्हणतात, आपल्यापैकी सर्वचजण आजारी आहोत, ते नाही.

प्रभुपाद : होय. बहिऱ्याला वाटते की सर्वजण बहिरे आहेत. (हास्य) याचा अर्थ असा होतो की ते मनुष्यही नाहीत, पशू आहेत ते. ते एकत्र येऊन निर्णय करायलाही तयार नाहीत, "आम्ही आजारी आहोत की तुम्ही. बसा. आपण बोलूया." त्याच्यासाठीही ते तयार नाहीत. मग? अशा पशूंसोबत आपण काय करू शकतो?

पंचद्रविड : ते म्हणतात आपण जुन्या विचारसरणीचे आहोत. त्यांना आपल्याबद्दल काही विचार करावासा वाटत नाही.

प्रभुपाद : मग तुम्ही इतर सर्व समस्यांचा विचार का करता? समाजाच्या समस्यांबद्दल इतके चिंतित का होता? तुम्ही विचार करता, पण तुम्हाला काही उपाय शोधता येत नाही. संपूर्ण जगभर वृत्तपत्रे खचून भरली आहेत.

विष्णुजन : श्रील प्रभुपाद, तुम्ही त्यांना विचारी बनवू शकता का? जर ते अविचारी असतील, तर त्यांना विचारी बनवण्याचा काही मार्ग...

प्रभुपाद : ते विचारशीलच आहेत. प्रत्येक मनुष्य विचारशील असतो. असे म्हटले जाते, "मनुष्य विचारी प्राणी आहे." त्यामुळे जर विचारशीलता नसेल, तर याचा अर्थ ते पशू आहेत.

पंचद्रविड : मग अशा प्राण्यांचे आपण काय करावे?

प्रभुपाद : ते अतिशय साधे सत्य आहे. एवढेच की, मी हे शरीर नाही. मला आनंद हवा आहे. तर मला आनंद का हवा आहे? जर तुम्ही या एका मुद्द्यावर चर्चा करणार, तर तुम्हाला समजेल की तो मनुष्य विचारशील झाला आहे. मला आनंद का हवा आहे? याचे उत्तर काय आहे? ते एक तथ्य आहे. प्रत्येकाला आनंद हवा आहे. आपल्याला आनंद का हवा आहे? याचे उत्तर काय आहे?

पंचद्रविड : कारण प्रत्येकजण दुःखी आहे, आणि त्यांना ते आवडत नाही.

प्रभुपाद : हे याचेच वेगळे स्पष्टीकरण आहे.

कीर्तनानंद : कारण मूलतःच आपण आनंदी आहोत.

प्रभुपाद : होय. मूलतःच आपण आनंदी आहोत. कोण आनंदी आहे? हे शरीर की आत्मा?

पुष्ट कृष्ण : नाही, आत्मा.

प्रभुपाद : आनंद कोणाला हवा आहे? मला या शरीराला संभाळावेसे वाटते - का? कारण मी या शरीरात आहे. आणि जर मी हे शरीर सोडून गेलो, तर या शरीराच्या आनंदाची कोणाला फिकीर आहे? हे साधेसे तथ्य, त्यांना तेही माहीत नाही. मला आनंद का हवा आहे? मी या शरीराला झाकून ठेवले आहे कारण ते थंडीने प्रभावित होऊ नये यासाठी. मग या थंडी व उष्णतेतून मला या शरीराचा आनंद का हवा आहे? कारण मी या शरीराच्या आत... जर मी हे शरीर सोडून जाईल तर मला या शरीराच्या आनंदाची इच्छा राहणार नाही. मग तुम्ही त्याला रस्त्यावर फेका किंवा अत्यंत थंडीत किंवा उष्णतेत, काही फरक पडत नाही. मग आनंद कोणाला हवाय? तेच त्यांना माहीत नाही. तुम्ही कोणाच्या आनंदासाठी इतके व्यग्र आहात? ते त्यांना माहीत नाही. अगदी कुत्र्या-मांजरांप्रमाणे.

पुष्ट कृष्ण : पण त्यांना वाटते की त्यांच्याकडे भगवंतांचे नाव घ्यायला वेळ नाही.

प्रभुपाद : हं?

पुष्ट कृष्ण : त्यांचे तत्त्वज्ञान आहे की आनंदी होण्यासाठी तुम्हाला दिवसभर काम करावे लागेल.

प्रभुपाद : हं. हे तुमचे तत्त्वज्ञान आहे. तुम्ही मूर्ख आहात, पण आपण काही काम करत नाही. तुम्ही आमचे उदाहरण का घेत नाही? आम्ही अगदी आनंदाने जगत आहोत.