MR/Prabhupada 0376 - भजहू रे मनचे तात्पर्य
Purport to Bhajahu Re Mana -- Los Angeles, January 7, 1969
भजहू रे मन श्री-नंद-नंदन-अभय चरणारविंद रे. हे गाणे महान कवी आणि वैष्णव गोविंद दास यांनी लिहिले आहे. भगवद् गीतेमध्ये असे सांगितले आहे की जर तुम्ही तुमचे मन नियंत्रित केले आहे, तर तुमचे मन सर्वात चांगला मित्र आहे. पण जर तुमचे मन अनियंत्रित असेल, तर ते तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे. तर आपण मित्र आणि शत्रूच्या शोधात असतो, दोघे माझ्या बरोबर बसलेले आहेत. जर आपण मनाच्या मैत्रीचा उपयोग करू शकलो, तर आपण उच्चतम परिपूर्णतेच्या स्तरापर्यंत पोहोचतो. पण जर आपण आपले मन शत्रू बनवले, तर नरकाच्या मार्ग मोकळा आहे. म्हणून गोविंद दास ठाकूर, ते त्यांच्या मनाला संबोधित करीत आहेत. योगी वेगवेगळ्या व्यायाम प्रक्रियेद्वारे मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते देखील मंजूर आहे. पण त्याला बराच वेळ लागतो, आणि काहीवेळा ते अपयशी ठरते, बऱ्याच बाबतीत ते अपयशी ठरते. अगदी विश्वामित्रांसारखे महान योगी, ते देखील अपयशी झाले, या छोट्या आणि अप्रामाणिक योगींच्या बद्दल काय बोलणार.
तर गोविंद दास सल्ला देतात की, तुम्ही फक्त तुमचे मन कृष्ण भावनामृतमध्ये गुंतवा. मग मन आपोआप नियंत्रित होते." जर मनाला कृष्णभावनामृत वगळता कुठल्याही इतर व्यवसायात गुंतण्याची शक्यता नसल्यास मग ते माझे शत्रू बनू शकणार नाही. ते आपोआप माझे मित्र होते. असा आदेश श्रीमद भागवतात दिला आहे: स वै मनः कृष्ण-पदारविंदयो: (श्रीमद भागवतम ९.४.१८) राजा अंबरीश, त्यांनी सर्व प्रथम त्यांचे मन कृष्णाच्या पदकमलांशी गुंतवले. तर त्याचप्रमाणे, इथे सुद्धा, गोविंद दास ठाकूर, ते त्यांच्या मनाला विचारतात: "माझ्या प्रेमळ मना, तू स्वतःला अभय-चरणाविन्दच्या पदकमलाशी गुंतुवून घे." ते कृष्णाच्या पदकमलांचे नाव आहे. अभय म्हणजे निर्भय. जर तुम्ही कृष्णाच्या पदकमलांचा आश्रय घेतला तर तुम्ही लगेच निर्भय बनता. म्हणून ते सल्ला देतात "माझ्या प्रेमळ मना, तू फक्त स्वतःला गिविंदाच्या पदकमलांची सेवा करण्यात गुंतवून घे."
भजहू रे मन श्री-नंद-नंदन. ते "गोविंद" म्हणत नाहीत. ते कृष्णाला "नंद महाराजांचा पुत्र" म्हणून संबोधित करतात. "कारण ती पदकमल निर्भय आहेत, तुम्हाला मायेच्या हल्ल्याचे कोणतेही भय नाही." "ओह, मला अनेक गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. मी कसे माझे मन कृष्णाच्या पदकमलांशी स्थिर करू?" गोविंद दास सल्ला देतात, "नाही, नाही." दुर्लभ मानव-जनम. "तू तुझे आयुष्य अशा प्रकारे वाया घालवू नको. हा मनुष्य जन्म खूप दुर्मिळ आहे. अनेक हजारो आणि लाखो जन्मांनंतर, तुला हि संधी मिळाली आहे." दुर्लभ मानव-जनम सत-संगे. "म्हणून कुठेही जाऊ नको. तू फक्त शुद्ध भक्तांच्या संगामध्ये रहा."
तरह ई भव-सिंधू रे, "मग तू अज्ञानाचा महासागर तरून जाऊ शकशील." "ओह, जर मी माझे मन सतत कृष्णाच्या विचारात गुंतवले, तर मी कसा माझ्या कुटुंबाचा आनंद घेऊ, माझी इतर उपजीविकेचा?" म्हणून गोविंद दास सांगतात, ऐ धन यौवन. "तू तुझ्या संपत्तीचा आणि तुझ्या यौवनचा आनंद घेऊ इच्छीतोस." ऐ धन यौवन, पुत्र परिजन, "आणि तुला मैत्रीची संगत, प्रेम आणि कुटुंबाचा आनंद घेण्याची इच्छा आहे, पण मी सांगतो," इथे कि आचे परतिती रे, "तुला वाटते का या निरर्थक गोष्टीत दिव्य आनंद आहे? नाही, काहीही नाही, तो भ्रम आहे." ऐ धन यौवन, पुत्र परिजन, इथे कि आचे परतिती रे, दुर्लभ मानव-जनम सत-संगे, तरह ई भव-सिंधू रे.शीत आतप बात बरिषण ए दिन जामिनी जागी रे विफले सेविनु कृपण दुर्जन चपल सुख-लब लागी रे
गोविंद दास त्याच्या मनाला आठवण करून देत आहे: "तुला तुझ्या भौतिक सुखाचा अनुभव आहे. तर भौतिक सुख म्हणजे, भौतिक सुखाचे अंतिम ध्येय लैगिक सुख आहे. पण किती काळ तू या लैगिक जीवनाचा आनंद घेऊ शकतोस तुला आठवत नाही का?" चपल. "चंचल. समजा थोड्या मिनिटासाठी किंवा क्षणासाठी. तेवढेच. पण त्यासाठी तू एवढी मेहनत करीत आहेस?" शीत आतप. "हिमवर्षाची काळजी न करता. तप्त उन्हाची काळजी न करता. मुसळधार पावसाची चिन्ता न करता. रात्र पाळीची काळजी न करता. संपूर्ण दिवस आणि रात्र तू काम केलेस. आणि काय परिणाम आहे? फक्त त्या चंचल क्षणिक आनंदासाठी. तुला याची लाज वाटत नाही का?"
तर शीत आतप, बात बरिषण, ए दिन जामिनी जागी रे. दिन म्हणजे दिवस, जामिनी म्हणजे रात्र. तर दिवस आणि रात्र, तू एवढे परिश्रम करीत आहेस. का?" चपल सुख-लब लागी रे. "फक्त त्या चंचल सुखासाठी." मग ते सांगतात, येई धन यौवन, पुत्र परिजन, इथे कि आचे परतिती रे. "वास्तवात या जीवनातील आनंद उपभोगण्यात काही ख़ुशी, शाश्वत आनंद, दिव्य आनंद, नाही, किंवा हे तारुण्य, किंवा कुटुंब, समाज. तिथे आनंद नाही दिव्य आनंद नाही." म्हणून कमल-दल-जल, जीवन तलमल. "आणि तुला माहित नाही किती काळ तू या जीवनाचा आनंद घेऊ शकतोस. कारण ते अशाश्वत आहे. तू अशाश्वत स्तरावर आहेस. ज्याप्रमाणे लिलीच्या पानावर पाणी आहे. ते डळमळते. कोणत्याही क्षणी ते खाली पडेल. तर आपले आयुष्य अशाश्वत आहे. कोणत्याही क्षणी ते खाली पडेल. आपण सामोरे जाऊ शकतो, संधीद्वारे, धोक्याने, आणि समाप्त. तर अशाप्रकारे आयुष्य वाया घालवू नका.
"भजहू हरी-पद नीती रे. "नेहमी कृष्ण भावनेमध्ये गुंतून रहा. ते तुमच्या आयुष्याचे यश आहे." आणि कसे कृष्ण भावनेमध्ये गुंतून राहायचे? ते सल्ला देतात, श्रवण कीर्तन, स्मरण वंदन, पाद-सेवन दास्य रे. तू भक्तीच्या सेवेच्या नऊ प्रकारातील कोणत्याही एका प्रकारचा अवलंब करू शकतोस. जर तू सर्व प्रकारांचा अवलंब केलास, ते खूप चांगले आहे. जरी नाही केला, तरी तू त्यातील आठ प्रकारांचा अवलंब करू शकतोस. त्यातील सात, त्यापैकी सहा, त्यापैकी पाच, चार प्रकारांचा अवलंब करू शकतो. पण अगदी जरी तू त्यापैकी एकाचा अवलंब केला, तुझे आयुष्य यशस्वी होईल. त्या नऊ पद्धती काय आहेत? श्रवणं किर्तनं. अधिकारी सूत्रांकडून ऐकणे. आणि जप. श्रवणं किर्तनं. स्मरणं. आठवणे. वंदनं. प्रार्थना. श्रवण कीर्तनं, स्मरणं वंदन, पाद-सेवनं. शाश्वत सेवकाप्रमाणे त्याच्या पदकमलांची सेवा करणे. पूजन-सखी-जन. किंवा फक्त मित्राच्या रूपात कृष्णावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा. आत्म-निवेदन, किंवा कृष्णासाठी सर्वाचा त्याग करा. हि भक्तिपूर्ण सेवा आहे, आणि गोविंद दास कृष्ण भावनेसाठी महत्वाकांक्षी आहेत.