MR/Prabhupada 0375 - भजहू रे मनचे तात्पर्य, भाग दोन



Purport to Bhajahu Re Mana -- San Francisco, March 16, 1967

तर आयुष्य खूप अस्थिर आणि धोकादायक स्थितीत आहे. म्हणूनच या मनुष्य जन्माचा फायदा घेतला पाहिजे आणि लगेच कृष्ण भावनेमध्ये गुंतले पाहिजे. प्रत्येकाने ती विनंती आपल्या मनाला केली पाहिजे, "माझ्या प्रेमळ मना, मला धोकादायक स्थितीत ओढू नको. कृपया मला कृष्ण भावनामृतमध्ये ठेव." अशाप्रकारे कृष्णभावनामृत, ते कसे प्राप्त केले जाऊ शकते, ते सुद्धा गोविंद दास यांनी वर्णन केले आहे. ते सांगतात, श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, पादसेवन, दास्य रे, पूजन, सखी-जन, आत्म-निवेदन गोविंद-दास-अभिलाषी रे. अभिलाषा म्हणजे आकांक्षा, आशा, किंवा महत्वाकांक्षा. नऊ वेगवेगळ्या प्रकारे ते भक्त बनण्यासाठी महत्वाकांक्षी आहेत.

पहिली गोष्ट आहे श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. आपण अधिकारींकडून ऐकले पाहिजे. ती आध्यात्मिक जीवनाची किंवा कृष्ण भावनामृतची सुरवात आहे. अर्जुना प्रमाणे. त्याने त्याची आध्यात्मिक चेतना, किंवा कृष्ण भावना प्राप्त केली, श्रीकृष्णांकडून एकून. त्याचप्रमाणे, एखाद्याने श्रीकृष्णांकडून किंवा कृष्णांच्या प्रतिनिधींकडून ऐकले पाहिजे. जो श्रीकृष्णांचे शब्द जसेच्या तसे प्रस्तुत करतो - त्याच्याकडून ऐकले पाहिजे. कारण सध्याच्या क्षणी आपल्याला थेट ऐकायची संधी नाही. कृष्णाकडून थेट ऐकण्याची. व्यवस्था आहे.

कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत, आणि एखादा त्यांच्याकडून सहज ऐकू शकतो. कुठेही आणि कधीही, पण त्याला कसे ऐकायचे याचे प्रशिक्षण असले पाहिजे. त्यासाठी श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या मदतीची आवश्यकता आहे. म्हणून चैतन्य महाप्रभु सांगतात की आपण श्रीकृष्णाची भक्तीमय सेवा प्राप्त करू शकतो कृष्ण आणि आध्यात्मिक गुरूच्या संयुक्त कृपेने. गुरु-कृष्ण-कृपाय पाय भक्ती-लता-बीज (चैतन्य चरितामृत मध्य १९.१५१) । आध्यात्मिक गुरूच्या कृपेने, आणि श्रीकृष्णाच्या कृपेने, आपणाला कृष्णाच्या भक्तिमय सेवेची संधी प्राप्त होते. तर चैतन्य चरितामृतमध्ये असे देखील सांगितले आहे की, आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णाची थेट अभिव्यक्ती आहे.

कृष्ण आध्यात्मिक गुरूच्या रूपात भक्ताच्या समोर येतात ज्याप्रमाणे सूर्य तुमच्या खोलीत किरणांच्या रूपात येतो. जरी सूर्य तुमच्या खोलीत किंवा तुमच्या शहरात किंवा तुमच्या देशात येत नाही - तो लाखो आणि करोडो मैल दूर आहे - तरीही, तो त्याच्या शक्तीने कुठेही प्रवेश करू शकतो, सूर्यप्रकाशाने. त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण त्यांच्या वेगवेगळ्या शक्तीने सर्वत्र प्रवेश करतात. आणि कृष्णाकडून हा प्रकाश प्राप्त करण्यासाठी, आपण श्रवण केले पाहिजे. श्रवण हे खूप महत्वाचे आहे. म्हणून गोविंद दास सांगतात, श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. आणि आणि ज्याने चांगल्या पद्धतीने ऐकले आहे, त्याचा पुढचा टप्पा कीर्तनं असेल. ज्याप्रमाणे आमच्या मुलांनी चांगल्या प्रकारे काही ऐकले आहे, आता ते रस्त्यारस्त्यावरून कीर्तन करण्यास उत्सुक आहेत. हा नैसर्गिक क्रम आहे. असे नाही की तुम्ही श्रवण करता, पण तुम्ही गप्प राहता. नाही. पुढचा टप्पा कीर्तन असेल. जप करून, किंवा लिहून, किंवा बोलून, किंवा प्रचार करून, कीर्तन होईल. तर श्रवण कीर्तन, प्रथम ऐकणे आणि नंतर जप. आणि श्रवण आणि जप कोणाबद्दल? विष्णुबद्दल, वायफळ बोलण्यासाठी नाही.

श्रवण कीर्तनं विष्णो: (श्रीमद भागवतम ७.५.२३) । या गोष्टी शास्त्रात सांगितल्या आहेत. सर्वसाधारण लोक, ते देखील श्रवण आणि जप करण्यात व्यस्त आहेत. ते वर्तमानपत्रात राजकारणा विषयी काही ऐकतात, आणि संपूर्ण दिवस ते चर्चा आणि जप करीत आहेत. "ओह, हा माणूस निवडला जाणार आहे. हा माणूस निवडला जाणार आहे." तर श्रवण आणि कीर्तन सगळीकडे आहे. पण जर तुम्हाला आध्यात्मिक मुक्ती हवी असेल, तर तुम्ही विष्णूबद्दल श्रवण आणि कीर्तन केले पाहिजे इतर कोणाबद्दलही नाही. तर कवी गातो, श्रवणं आणि कीर्तनं विष्णो. श्रवणं, कीर्तनं, स्मरण, वंदन, पाद-सेवन, दास्य रे.

तर वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत: श्रवण, कीर्तन, आठवणे, मंदिरात उपासना करणे, सेवेमध्ये व्यस्त असणे. तर त्यांना सर्व नऊ प्रकारच्या भक्तीची इच्छा आहे. शेवटी, पूजन सखी-जन सखी-जन म्हणजे जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, त्यांना संतुष्ट करण्यासाठी. आणि आत्म-निवेदन. आत्मा म्हणजे स्वतः, आणि निवेदन म्हणजे शरण. गोविंद-दास-अभिलाष. कवीचे नाव आहे गोविंद दास. आणि ते व्यक्त करतात की त्यांची इच्छा फक्त हीच आहे. त्यांना त्यांच्या मानवी जीवनाची संधी अशाप्रकारे वापरायची इच्छा होती. हे या गाण्याचे सार आहे.