MR/Prabhupada 0403 - विभावरी शेष तात्पर्य भाग २

Revision as of 22:39, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Purport to Vibhavari Sesa

जसे राम. जेव्हा ते प्रभू रामचंद्र म्हणून प्रकट झाले, त्यांनी रावणाला मारले, रावाणान्तकर. माखन-तस्कर. आणि वृंदावनमध्ये ते लोणी चरणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बालपणीच्या लीला, ते गोपींच्या भांड्यांतून लोणी चोरायचे ती त्यांची आनंद लीला होती, म्हणून त्यांना माखन-तस्कर म्हणतात. गोपी-जन-वस्त्र-हारी, आणि त्यांनी गोपींची वस्त्रे सुद्धा चोरली, जेव्हा त्या स्नान करीत होत्या. हे खूप गोपनीय आहे. प्रत्यक्षात गोपींना श्रीकृष्ण हवे होते. त्यांनी कात्यायनी-देवीकडे प्रार्थना केली. कात्यायनी देवी. कारण त्यांच्या वयाच्या सर्व मुली त्यांना आकर्षित झाल्या होत्या, म्हणून त्यांना श्रीकृष्ण पतीच्या रूपात हवे होते.

तर वरवर पाहता, श्रीकृष्ण एकाच वयाचे होते. आणि ते सर्व गोपींचे पती कसे होऊ शकतात? पण त्यांनी स्वीकारले. कारण गोपींना श्रीकृष्णांची पत्नी बनण्याची इच्छा होती. म्हणून कृष्ण त्यांचा प्रस्ताव स्वीकारतात. त्यांच्यावर दया दाखवण्यासाठी, त्यांनी वस्त्रे चोरली, कारण एक पती आपल्या पत्नीची शारीरिक वस्त्रे काढू शकतो. दुसरा कोणी त्याला स्पर्श करू शकत नाही. तर तो हेतू होता, पण लोकांना माहित नाही. म्हणून कृष्ण-लीला आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडून ऐकली पाहिजे, किंवा हा भाग टाळला पाहिजे. नाहीतर आपला गैरसमज होईल की कृष्णांनी वस्त्रे चोरली, आणि ते खूपच पतित आहेत, स्त्री-शिकारी,अशाप्रकारे. असे नाही. ते सर्वोच्च भगवान आहेत.

ते सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करतात. तर श्रीकृष्णांना गोपींना नग्न पाहण्यात काही स्वारस्य नव्हते. पण कारण त्यांची पत्नी बनण्याची इच्छा होती, म्हणून त्यांनी त्यांची इच्छा पुरी केली. एक टोकन, " होय, मी तुमचा पती आहे, मी तुमची वस्त्रे घेतली. आता तुम्ही तुमची वस्त्रे घ्या आणि घरी जा." म्हणून त्यांना गोपी-जन-वस्त्र-हारी म्हणून ओळखतात. ब्रजेर राखाल, गोपी-वृंद-पाल, चित्त-हारी वंशी-धारी. ब्रजेर-राखाल. वृंदावनामधील गोपालक, आणि गोप-वृंद-पाल, त्यांचा उद्देश गुराखी पुरुषांना कसे संतुष्ट करायचे हा होता. त्यांचे वडील, काकांसहित, ते सर्व गायी राखत होते, त्यांना खुश करण्यासाठी. तर त्यांना गोप-वृंद-पाल म्हणतात. चित्त-हारी वंशी-धारी, आणि जेव्हा ते बासरी वाजवत होते, ते सर्वांचे हृदय जिंकत होते, चित्त-हारी. ते सर्वांचे हृदय जिंकत होते.

योगिंद्र-वंदन, कृष्ण एक छोटा गुराखीचा मुलगा म्हणून खेळत असले तरीही ज्याप्रमाणे गावातील मुले त्यांच्या मित्रांबरोबर विनोद करतात, पण तरीही, ते योगिंद्रवंदन आहेत. योगिंद्र म्हणजे महान योगी, द्रष्टा. ध्यानावस्थित-तद-गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः(श्रीमद भागवतम् १२.१३.१) । योगिनः. ध्यान, कोणाला ते शोधण्याचा पर्यंत करीत आहेत? ते श्रीकृष्णांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर जोपर्यंत ते कृष्णावर आपले मन केंद्रित करण्याच्या स्थितीपर्यंत येत नाहीत त्यांचा योग सिद्धांत, किंवा गूढ शक्ती, भ्रमित राहते. योगींनाम आपि सर्वेषाम मंद-गत-अंतर (भ.गी. ६.४७) । योगी, प्रथम श्रेणीच्या योग्याने, आपल्या हृदयात सतत कृष्णाला ठेवले पाहिजे. हीच योगाची परिपूर्णता आहे.

म्हणून योगिंद्र-वंदन असे म्हणतात. श्री-नंद-नंदन, ब्रज-जन-भय-हारी. जरी ते महान मुनींद्वारे पुजले जात असले, तरीही ते वृंदावनमध्ये नंद महाराजांचा पुत्र म्हणून राहतात. आणि वृंदावनमधील रहिवासी, त्यांना श्रीकृष्णांच्या संरक्षणाखाली सुरक्षित वाटते. नवीन निरद, रूप मनोहर, मोहन-वंशी-विहारी. नवीन निरद, निरद म्हणजे ढग, त्यांचा वर्ण नवीन ढगाप्रमाणे आहे. नवीन ढग, काळसर, रूप. तरीही ते इतके सुंदर आहेत. सर्वसाधारणपणे या भौतिक जगात काळा सुंदर समजला जात नाही, पण कारणकी त्यांचे शरीर दिव्य आहे, जरी ते काळे असले तरी, ते सार्वभौमिक आकर्षक आहेत. रूप मनोहर.

मोहन-वंशी-विहारी. फक्त जेव्हा ते त्यांची बासरी घेऊन उभे राहतात. ते, अगदी जरी काळे असले, तरी ते सर्वांसाठी एवढे आकर्षक बनतात यशोदा-नंदन, कंस-निसूदन, ते माता यशोदेचा पुत्र म्हणून प्रसिद्ध आहेत, ते कंसाचे हत्यारे आहेत, आणि निकुंज-रास-विलासी. आणि ते नृत्य, रस नृत्य करत होते, निकुंजमध्ये, वंशी-वट, निकुंज. कदंब-कानन, रास-परायण, अनेक कदंबाची झाडे आहेत. कदंब एकप्रकारचे फुल आहे जे मुखत्वेकरून वृंदावनमध्ये उगवते. खूप सुवासिक आणि सुंदर, भरीव फुल, गोल. तर कदंब-कानन, ते त्यांचा रस नृत्याचा आनंद या कदंब वृक्षाच्या खाली घेत असत. आनंद-वर्धन प्रेम-निकेतन, फुल-शर-योजक काम.

तर ते गोपींच्या कामुक इच्छांना उत्तेजित करीत आहेत, आणि त्यांचा दिव्य आनंद वाढवत आहेत. आनंद-वर्धन प्रेम-निकेतन, कारण ते सर्व आनंदाचे भांडार आहेत. गोपी येत होत्या आनंद घेण्यासाठी कारण ते सर्व आनंदाचे भांडार आहेत. ज्याप्रमाणे आपण तलावात पाणी आणण्यासाठी जातो जिथे पाणी असते. त्याचप्रमाणे, जर आपल्याला खरंच आनंदमय जीवन हवे असेल, तर आपल्याला ते श्रीकृष्ण, जे सर्व आनंदाचे भांडार आहेत त्यांच्याकडून घेतले पाहिजे.

आनंद-वर्धन, ज्यामुळे आनंद वाढेल. भौतिक आनंद कमी होईल. तुम्ही फार काळ उपभोग घेऊ शकणार नाही, ती कमी होईल. पण आध्यात्मिक आनंद, जर तुम्हाला श्रीकृष्ण, सर्व आनंदाचे भांडार त्यांच्याकडून घ्यायची इच्छा असेल, तर तो वाढेल. तुमची आनंद शक्ती वाढेल, आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद मिळेल. जसे-जसे तुम्ही तुमची आनंद शक्ती किंवा इच्छा वाढवता, पुरवठा देखील वाढत जातो. त्याला अंत नाही.

फुल-शर-योजक काम, ते दिव्य कामदेव आहेत. कामदेव, त्यांच्या धनुष्य आणि बाणासह, तो भौतिक जगातील कामुक इच्छा वाढवतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगात, ते सर्वोच्च कामदेव आहेत. ते गोपींच्या कामुक इच्छा वाढवत होते. त्या तिथे येत असत, आणि ते दोघे, काही कमी नव्हते, त्या त्यांच्या इच्छा वाढवत होत्या, आणि कोणत्याही भौतिक संकल्पनेशिवाय, कृष्ण त्यांच्या इच्छा पुऱ्या करीत होते. त्या केवळ नृत्य करीत होती, एवढेच. गोपांगना-गण, चित्त-विनोदन, समस्त-गुण-गण-धाम. ते गोपांगनासाठी विशेषकरून आकर्षित आहेत. गोपांगना म्हणजे व्रज-धामाचे नर्तक.

गोपांगना-गण, चित्त-विनोदन, त्या फक्त श्रीकृष्णांच्या विचारात मग्न होत्या त्या इतक्या श्रीकृष्णांशी आकर्षिल्या, जोडल्या गेल्या होत्या. त्या, त्यांच्या हृदयातील श्रीकृष्णांच्या रूपाचे अस्तित्व एक क्षणभरही त्याग करू शकल्या नाहीत चित्त-विनोदन, त्यांनी गोपींचे हृदय चोरले, चित्त-विनोदन. समस्त-गुण-गण-धाम, ते सर्व दिव्य गुणाचे भांडार आहेत. यमुना-जीवन, केली-परायण, मानस-चंद्र-चकोर. मानस-चंद्र-चकोर, असा एक पक्षी आहे ज्याला चकोर म्हणतात. तो चांदण्यांकडे पहातो. त्याचप्रमाणे, ते गोपींच्यामध्ये चंद्र आहेत, आणि त्या केवळ त्याच्याकडे पाहत आहेत. आणि ते यमुना नदीचे जीवन आहेत, कारण ते यमुना नदीमध्ये उडया मारून आनंद घेत होते. नाम-सुधारस, गाओ कृष्ण-यश, राखो वचन

तर भक्तिविनोद ठाकुर सर्वांनां विनंती करीत आहेत, "आता तुम्ही ह्या सर्व वेगवेगळ्या भगवंतांच्या नावांचा जप करा, आणि मला वाचावा." राखो वचन मनो: "माझ्या प्रेमळ मना, कृपया माझा शब्द राख. नाकारू नको, या सर्व कृष्णांच्या पवित्र नावांचा जप कर."