MR/Prabhupada 0391 - मानस देह गेहचे तात्पर्य
मानस, देहो, गेहो, जो किचू मोर. हे गाणे भक्तिविनोद ठाकूर यांनी गायले आहे. ते संपूर्ण शरणागतीची प्रक्रिया शिकवत आहेत. मानस, देहो, गेहो, जो किचू मोर. सर्व प्रथम, ते मनाचे आत्मसंमर्पण करतात, कारण मन सर्व प्रकारच्या कल्पनांचे स्रोत आहे. आणि समर्पण करणे, भक्ती सेवा प्रदान करणे म्हणजे प्रथम मनावर नियंत्रण ठेवणे. म्हणून ते सांगतात मानस, म्हणजे "मन," मग देह: "इंद्रिय." शरीरा. देह म्हणजे हे शरीर; शरीर म्हणजे इंद्रिय. तर, जर आपण श्रीकृष्णांच्या पदकमलांशी मन समर्पित केले, मग आपोआप इंद्रिय सुद्धा समर्पित होतात. मग, "माझे घर." देह, गेहो. गेहो म्हणजे घर. जो किचू मोर. आपली सर्व संपत्ती या तीन गोष्टींच्या तडजोडीमध्ये आहे: मन, शरीर, आणि आपले घर. म्हणून भक्तिविनोद ठाकूर सर्व काही समर्पण करण्यास सुचवतात.
अर्पिळू तुवा, नंद-किशोर. नंद-किशोर कृष्ण आहे. तर "मी माझे मन, माझे शरीर आणि माझे घर तुला समर्पित करीत आहे," आता, संपदे विपदे, जिवने-मरणे: "एकतर मी आनंदात आहे किंवा मी दुःखात आहे, एकतर मी जिवंत स्थितीत आहे किंवा मी मृत आहे." दाय मम गेला, तुवा ओ-पद बरने: "आता मी मुक्त आहे. मला अराम वाटत आहे कारण मी तुला सर्व समर्पण केले आहे." मारोबि राखोबि-जो इच्छा तोहारा: "आता ते तुमच्यावर आहे, तुम्ही मला ठेऊ इच्छिता किंवा तुम्ही मला मारू इच्छिता, ते तुमच्यावर अवलंबून आहे." नित्य-दास प्रति तुवा अधिकारा: "आपल्याला वाटत असेल ते करण्याचा आपल्याला अधिकार आहे. तुमच्या सेवकाच्या नात्याने. मी तुमचा चिरंतर सेवक आहे."
जन्मोबी मोई इच्छा जदि तोर: "जर आपणास इच्छा असेल तर" - कारण भक्त स्वगृही, परमधाम परत जातो - म्हणून भक्तिविनोद ठाकूर सुचवतात,"जर तुम्हाला आवडत असेल तर मी पुन्हा जन्म घेईन, काही फरक नाही." भक्त-गृहे जनी जन्म हौ मोर: " विंनती आहे की जर मला जन्म लागला, कृपया मला भक्ताच्या घरी माझा जन्म घेण्याची संधी द्या." कित-जन्म हौ जथा तुवा दास: "मी एक कीटक म्हणून जन्माला आलो तर मला काही वाटणार नाही, पण मी भक्ताच्या घरी आहे." बहिर मुख ब्रह्म-जन्मे नाही आस: मला अभक्त जीवन आवडत नाही अगदी जरी मी ब्रम्हदेव म्हणून जन्माला आलो. मला भक्तांसोबत राहायचे आहे," भुक्ति-मुक्ती-स्पृहा विहीन जे भक्त: "मला असे भक्त हवे आहेत जे भौतिक आनंदाचा किंवा आध्यात्मिक मुक्तीचा काळजी करीत नाहीत."
लभैते ताको संग अनुरक्त: "मला केवळ अशा शुद्ध भक्तांच्या संगाची इच्छा आहे." जनक जननी, दयित, तनय: "आता, याच्यापुढे,, तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही माझी मुलगी आहात, तुम्ही माझा मुलगा आहात, तुम्ही माझे भगवंत आहेत, तुम्ही माझे आध्यात्मिक गुरु आहात, तुम्ही माझे पती आहात, सर्व काही तुम्ही आहात." भक्तिविनोद कोहे, शुनो काना: "माझ्या भगवंता, काना- कृष्ण, तुम्ही राधारानीचे प्रियकर आहात, पण तुम्ही प्राणनाथ आहेत, कृपया मला संरक्षण द्या."