MR/Prabhupada 0014 - भक्त उंच आहेत

Revision as of 03:45, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


The Nectar of Devotion -- Calcutta, January 30, 1973

एक भक्ता करिता, श्रीकृष्ण हे भक्ताच्या तळव्यांच्या अंतर्गत असतात. अजित​, जितोऽप्यसौ. जरी श्रीकृष्ण हे जिंकण्या योग्य नाहीत, पण त्याला आपल्या भक्ताने अधिकार गाजवलेले आवडते. अशी स्तिथि आहे. ज्या प्रकारे त्याने स्वेच्छेने यशोदा मातेला स्वतःवर अधिकार गाजवण्यायोग्य स्तिथ केले, राधाराणीला अधिकार गाजवायला दिला, आपल्या मित्रांना अधिकार गाजवायला दिला. श्रीकृष्ण पराभूत झाले आणि त्यांना आपल्या मित्रांना आपल्या खांद्यावर घ्यावे लागले. प्रत्यक्ष व्यवहारात कधी कधी आम्ही बघतो की एक राजा आपल्या सहयोग्यांमधे एक विदूषक ठेवतो, आणि कधी कधी विदूषक राजाचा अपमान करतो, आणि राजाला आनंद मिळतो. कधी कधी विदूषक... ज्या प्रकारे एक प्रसिद्ध विदूषक आहे, गोपाल बॉन, बंगाल मध्ये. तर एक दिवस राजाने त्याला विचारले, "गोपाल, तुझ्यात आणि गाढवात काय फरक आहे?" म्हणून त्याने ताबडतोब राजा पासून अंतर मोजले. तो म्हणाला, "फक्त तीन फुट आहे, साहेब. फरक फक्त तीन फूट आहे. " म्हणून प्रत्येकाने हसायला सुरवात केली. आणि राजाने त्या अपमानाचा आनंद घेतला. कारण कधी कधी ते आवश्यक आहे. त्यामुळे श्रीकृष्ण सुद्धा... प्रत्येकजण उन्नत स्थानावर त्याची प्रशंसा करतो. प्रत्येकजण. ती श्रीकृष्णाची स्तिथि आहे - सर्वोत्तम भगवान. वैकुंठ लोकात, फक्त प्रशंसा आहे. अशी कुठली ही गोष्ट नाही. पण वृंदावन मध्ये श्रीकृष्ण आपल्या भक्तांना अपमान करण्याची सूट देतो. लोकांना हे माहीत नाही की, वृंदावन मधले जीवन काय आहे. म्हणून भक्त उच्च पदाला पोहोचतात. राधाराणी हुकुम देते, "श्रीकृष्णाला इथे यायला देऊ नका." श्रीकृष्ण आतमध्ये येऊ शकत नाही. तो इतर गोपींची खुषामात करतो : "कृपया मला तिथे जाऊ द्या." "नाही, नाही. हुकुम नाही आहे. आपण जाऊ शकत नाही." तर ते श्रीकृष्णाना ते आवडते.