MR/Prabhupada 0028 - बुद्ध देव आहे

Revision as of 04:16, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on Sri Isopanisad, Mantra 1 -- Los Angeles, May 3, 1970

गर्ग मुनी(वाचन): "ही सुद्धा एक चुकीची समजूत आहे की नुस्त शाकाहारी झाल्याने निसर्गाचे कायदे उल्लंघनाच्या पापांतून आपले रक्षण होईल." भाज्यांनाही जीव असतो. एका जिवाला दुसर्‍या जीवाचे खाद्य व्हावे लागते. हाच निसर्गाचा नियम आहे. आपल्याला शुद्धशाकाहारी होण्याचे गर्व असू नये. भगवंताला ओळखले पाहिजे हा मुद्दा आहे. भगवंताला ओळखण्या साठी लागणारी विकसित प्रज्ञा प्राण्यांना नसते..." प्रभुपद: तोच मुख्य मुद्दा आहे. जसे बौद्ध असतात, ते ही शाकाहारी असतात. बौद्ध तत्त्वानुसार... आजकाल सर्व काही अधोगतिला गेलेले आहे. पण भगवान बुद्धांचा प्रसार ह्या मूर्खांनी किमान जीव हत्या थांबवावी ह्या साठी होता. अहिंसा परमो धर्म. भगवान बुद्धांच्या अवताराचा, भागवतात आणि अनेक ग्रंथात उल्लेख आहे. सुर द्विषाम ते असुरांना फसवण्या साठी आले. असुर... त्यानी असे धोरण केले की असुर फसले. त्यांनी कसे फसवले? असुर भगवन्ताच्या विरुद्ध असतात. ते भगवंतावर विश्वास ठेवीत नाहीत. म्हणून भगवान बुद्धांनी प्रसार केला, "हो. भगवंत नाहीत. पण मी जसे सांगतो तसे वागा". "मान्य सरकार". पण ते भगवंत आहेत. हीच फसवणूक आहे. हो. ते भगवंतावर विश्वास ठेवीत नाहीत, पण बुद्धांवर विश्वास ठेवतात आणि बुद्ध भगवंत आहेत. केशव धृता बुद्ध शरीरा जय जगदीश हरे. तर असुरात आणि भक्तात हाच फरक आहे. एक भक्त बघत असतो की श्रीकृष्ण, केशव, ह्या मूर्खांना कसे फसवित असतात. भक्ताला ते समजते. पण असुर, त्यांना वाटते "अहा, आपल्याला एक चांगला पुढारी मिळाला". तो भगवंतावर विश्वास ठेवीत नाही. (हसणे) पाहीले तुम्ही? सम्मोहाय सूरद्विषाम ( श्री. भा. 1.3.24) ह्याचा अचूक शब्द श्रीमद् भागवतात नमूद आहे. तुम्ही पाहिले आहे, ज्यांनी वाचले आहे : सम्मोहाय, मतिगुंग करण्या साठी, सूरद्विषाम सूरद्विषाम म्हणजे वैष्णवांवर मत्सर्य करणारे. नास्तिक, असूर, नेहमी वैष्णवांवर मात्सर्य करतात. हा निसर्गाचा कायदा आहे. तुम्ही पहा ह्या वडिलांना. वडील आपल्या पाच वर्षाच्या मुलाचे शत्रू झाले. त्याची काय चूक होती बर? तो एक भक्त होता. तेवढच. निष्पाप बालक. तो फक्त, मला म्हणायचे आहे की, हरे कृष्ण मंत्राच्या जपेला तो आकर्षित झाला. स्वतः वडील, इतके कट्टर शत्रू झाले, "ठार मारा ह्या मुलाला." जर स्वतः वडील शत्रू झाले तर बाकीच्यांचे काय म्हणावे? तेंव्हा तुम्ही नेहमी ही अपेक्षा केली पाहिजे की जेंव्हा तुम्ही भक्त व्हाल तेंव्हा संपूर्ण जगच तुमचे शत्रू होईल. इतकेंच. पण तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवला पाहिजे कारण तुम्ही भगवन्ताचे दास नियुक्त झालात.. तुमचे धर्मकार्‍य त्यांचात ज्ञानोदय आणण्याचे आहे. तुम्हाला तसे नाही व्हायचे. जसे नित्यानंद प्रभू ते जखमी झाले, तरीही त्यांनी जगाई-माधाई यांचा उद्धार केला. हे तुमचे तत्व असले पाहिजे. काही वेळा आपल्याला फसवावे लागते, तर कधी आपण जखमी देखील होतो-. कित्येक गोष्टी. एकच प्रयुक्ती आहे, लोकांना कसे कृष्ण प्रज्ञेला आणायचे. हेच आपले धर्मकार्‍य आहे. कोणत्याही प्रकाराने ह्या मूढांना कृष्ण प्रज्ञेत बदलावे, ह्या रीतीने अथवा त्या रीतीने.