MR/Prabhupada 0099 - श्रीकृष्णाद्वारे कसे ओळखले जाऊ

Revision as of 05:12, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 13.4 -- Bombay, September 27, 1973


तर आपण निरनिराळ्या मनुष्यांच्या जाती पाहतो,जरी सगळ्या मुंबईत असल्या किंवा कोणत्याही शहरात. तसेच सगळे सजीव प्राणी, त्यांच्यात समान गुणधर्म नसतात. त्यातील काही जण भौतिक गुणांतील सत्वगुणात असतात. काही जण रजोगुणात असतात. आणि काहीजण तमोगुणात असतात. तर जे तमोगुणात असतात, ते जसे काही पाण्यात पडलेले आहेत. जसे अग्नीवर पाणी पडले तर तो विझून जातो. आणि सुक गवत,जर त्यावर आगीची ठिणगी पडली,सुक्या गवताचा फायदा घेऊन. आग पेट घेईल. त्याचा मोठा अग्नी निर्माण होईल. तसेच,जे सत्वगुणात आहेत,ते सहजपणे त्यांची कृष्णभावना जागृत करू शकतात. कारण भगवत-गीतेत सांगितलंय,

येषां त्वन्तगतं पापं (भ गी ७|२८)

का लोक ह्या देवळात येत नाहीत? कारण अडचण अशी आहे की त्याच्यातील काहीजण तमोगुणात आहेत.

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: (भ गी ७|१५)

ते येत नाहीत. जे फक्त पापकर्म करण्यात गुंतलेले आहेत, ते भगवान श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते शक्य नाही. पण सगळ्यना हि संधी दिलेली आहे. आम्ही खुशामत करत आहोत, "कृपया इथे या. कृपया..." भगवान श्रीकृष्णांच्यावतीने हे आपलं कर्तव्य आहे. जसे श्रीकृष्णांनी व्यक्तिशः येऊन भगवद्-गीता शिकवली आणि सगळ्यांना संगितले,

सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ गी १८. ६६)

ते आपलं कार्य आहे. "अरे हि लोक माझ्यावतीने कार्य करताहेत. म्हणून श्रीकृष्ण अत्यंत कौतुक करतात. मला तिथे जाण्याची गरज नाही. त्यांनी माझं काम केलं " आपण काय काम केलं. आपण फक्त लोकांना सांगतो,"कृपया श्रीकृष्णांना शरण जा." त्यामुळे आपण खूप प्रिय आहोत. श्रीकृष्णांनी सांगितलंय

न च तस्मान्मनुष्येषु कच्श्रिन्मे प्रियकृत्तमः (भ गी १८|६९)

आपलं काम हे आहे की आपण श्रीकृष्णांद्वारे कसे ओळखले जाऊ. मग कोणी कृष्णभवनामृत झाला किंवा नाही याची आपल्याला काही चिंता नाही आपलं कार्य खुशामत करणे. एवढंच."कृपया इथे या,आणि श्रीकृष्णांची मूर्ती पहा. नमस्कारकरून, प्रसाद घेऊन, घरी जा. पण लोक मानत नाहीत. कारण का? आता,जी लोक पापं करण्यात. गुंतलेली असतात. अशी माणसं हे कार्य करायला तयार नसतात म्हणून श्रीकृष्णांनी सांगितलंय, येषां त्वन्तगतं पापं जो कोणी पापमुक्त झाला आहे.

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्(भ गी ७|२८)

कोण पापातून मुक्त होऊ शकतो? जो कोणी सतत पुण्यकर्म करण्यात मग्न आहे. जर तुम्ही सतत पुण्यकर्मे करण्यात गुंतलेले असाल,तर तुम्हाला पापकर्मे करायला कशी कुठे संधी मिळेल? म्हणून सगळ्यात मोठे पुण्यकर्म हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे होय. जर तुम्ही सतत गुंतलेले असाल,हरे कृष्ण,हरे कृष्ण,कृष्ण,कृष्ण,तर तुमचे मन सतत कृष्ण भावनेत राहील. मग तिथे तुमच्या मनात इतर काही विचार यायला जागा नसेल.हि कृष्णभवनामृत बनण्याची पद्धत आहे जेव्हा आपल्याला श्रीकृष्णांचा विसर पडेल,लगेच मायाशक्तीचा प्रभाव आपल्यावर पडेल.