MR/Prabhupada 0182 - स्वतःला त्या धुतलेल्या स्थितीत ठेवा

Revision as of 10:05, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 2.3.15 -- Los Angeles, June 1, 1972


एक फायदा म्हणजे, कृष्णा बद्दल ऐकून तो हळूहळू पापमुक्त होतो, फक्त ऐकून. आपण पापी असल्याशिवाय या भौतिक जगात प्रवेश करत नाही. तर परत परमेश्वर धामात जाण्याआधीच आपल्याला पापमुक्त व्हायला लागेल . कारण देवाचे राज्य ... देव शुद्ध आहे,त्याचे राज्य शुद्ध आहे. कोणतेही अपवित्र अस्तित्व तेथे प्रवेश करू शकत नाही. तर शुद्ध होणे आवश्यक आहे.भगवद गीतेमध्ये ते देखील म्हटले आहे. येशाम अंत-गतम पापम . "जो आपल्या जीवनातील सर्व पाप प्रतिक्रियांपासून पूर्णपणे मुक्त झाला आहे," येशाम त्व अंत-गतम पापम जनानाम पुण्य-कर्मणाम, "आणि नेहमी पवित्र वृत्तीमध्ये , कार्यात गुंतला आहे, आणखी पापयुक्त क्रियाकलाप नाहीत ..."

तर हि कृष्णभावनामृत चळवळ आहे ज्यात त्याने संधी दिली आहे सर्व पापी क्रियाकलाप मिटवण्याची आणि स्वत: ला नीट ठेवण्याची : अवैध संभोग नाही, नशा नाही, मांस नाही,जुगार नाही . जर आपण या नियमांचे पालन केले तर दीक्षा झाल्यानंतर माझे सर्व पाप धुऊन जातात. आणि जर मी स्वतःला त्या धुतलेल्या स्थितीत ठेवले तर मग पुन्हा पापी होण्याचा प्रश्न कुठे आहे? परंतु एकदा धुऊन निघाले , आपण आंघोळ केली आणि पुन्हा धूळ अंगावर टकली - तर ती प्रक्रिया मदत करणार नाही. जर तुम्ही म्हणाल, "मी पुन्हा स्वच्छ करतो आणि पुन्हा धूळ फेकतो ," तर मग स्वच्छतेचा उपयोग काय आहे? धुऊन टाक. एकदा धुतले, आता त्या स्वच्छ स्थितीत राहा. ते आवश्यक आहे. तर ते शक्य होईल जर आपण नियमित श्रीकृष्णाविषयी ऐकून त्याच्या संपर्कात राहिलो तर. तुम्ही पवित्र राहणे आवश्यक आहे. आणि ते म्हणजे पुण्य-श्रवण-कीर्तन: जर आपण कृष्णा बद्दल ऐकले तर मग पुण्य, आपण नेहमी पवित्र स्थितीत असाल. पुण्य-श्रवण-कीर्तन: तुम्ही जप करा किंवा .. त्यामुळे आमचा सल्ला आहे कि नेहमी जपत रहा

हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे
हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे

तर आपण आपल्या पापी क्रियाकलापांमध्ये पुन्हा घसरण्याविषयी सावध असले पाहिजे. प्रत्येकाने सावधगिरीने वागणे आवश्यक आहे, आणि स्वत:ला नाम जपामध्ये गुंतवून ठेवावे .मग तो ठीक राहील. तर

श्रन्वताम स्व-कथा कृष्ण : पुण्य-श्रवण-कीर्तन: (श्रीभ १।२।१७)

आणि हळू-हळू, जसे आपण कृष्णाबद्दल ऐकत राहतो तेव्हा हृदयातील सर्व गलिच्छ गोष्टी शुद्ध होतील. गलिच्छ गोष्टी म्हणजे "मी भौतिक शरीर आहे; मी अमेरिकन आहे; मी भारतीय आहे; मी हिंदू आहे; मी मुस्लिम आहे; मी हा आहे; मी तो आहे." हे आत्म्याच्या आवरणाचे विविध प्रकार आहेत. अनाच्छादित आत्म्याला पूर्णपणे जाणीव आहे की "मी देवाचा शाश्वत दास आहे."बस . त्याच्याकडे दुसरी ओळख नाही. त्याला मुक्ती म्हणतात. जेव्हा एखादा या जाणिवेपर्यंत पोहोचतो की "मी कृष्णाचा , परमेश्वराचा शाश्वत सेवक आहे, आणि माझा एकमात्र व्यवसाय म्हणजे त्याची सेवा करणे," याला मुक्ती म्हणतात. मुक्तीचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे आणखी दोन हात येतील , दुसरे दोन पाय येतील . नाही. तीच गोष्ट, फक्त ती शुद्ध केली जाते. ज्याप्रमाणे एका मनुष्याला ताप आलेला आहे. खूप लक्षणे आहेत, पण जसा ताप गेला तेंव्हा सर्व लक्षणे संपुष्टात येतात. तर, आपला, या भौतिक विश्वात ताप म्हणजे इंद्रिय तृप्ती. इंद्रिय तृप्ती . हा ताप आहे. तर जेव्हा आपण कृष्ण चैतन्यात गुंतले जातो , तेव्हा हा इंद्रिय तृप्ति व्यवसाय थांबतो. हा फरक आहे. हीच परीक्षा आहे आपण कृष्ण भावनामृतात किती अग्रेसर होत आहात .