MR/Prabhupada 0275 - धर्म म्हणजे कर्तव्य

Revision as of 12:58, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973

तर श्रीकृष्ण गुरु आहेत. इथे अर्जुनाने उदाहरण दिले आहे. पृच्छामी त्वां. त्वां कोण आहे? श्रीकृष्ण. "तू मला का विचारत आहेस?" धर्मसम्मूढचेताः (भ गी २।७) "मी माझ्या कर्तव्यात,धर्मात गोंधळलेलो आहे," धर्म म्हणजे कर्तव्य. धर्मं तू साक्षाद्भगवत्प्रणीतं (श्रश्री भ ६।३।१९) सम्मूढचेताः "तर मी काय केले पाहिजे?"यच्छरेयः. "वास्तविक माझे कर्तव्य काय आहे?" श्रेयः . श्रेयः आणि प्रेयः .प्रेयः… त्या दोन गोष्टी आहेत. प्रेयः म्हणजे जे मला लगेच आवडते,खूप छान. आणि श्रेयः म्हणजे अंतिम ध्येय. त्या दोन गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे मुलाला पूर्ण दिवस खेळायला हवे असते. तो बालिश स्वभाव आहे. हेच श्रेयः आहे. आणि प्रेयः म्हणजे त्याने शिक्षण घेतले पाहिजे म्हणजे भविष्यात त्याचे आयुष्य व्यवस्थित जाईल. ते प्रेयः आहे,श्रेयः. तर अर्जुन प्रेयः विचारत नाही. तो श्रीकृष्णांकडे सल्ला मागत आहे. त्याच्या श्रेयः ला पुष्टी देण्याच्या हेतूने नाही. श्रेयः म्हणजे लगेच तो विचार करतो की: "मी सुखी होईन युद्ध न करून,माझ्या भावांची हत्या करून नाही." ते, तो होता, एका लहान मुलाप्रमाणे, तो विचार करत होता. श्रेय. पण जेव्हा तो आपल्या चेतनेत परत आला… वास्तवात चेतना नाही,कारण तो बुद्धिमान होता. तो प्रेयसाठी विचारत होता. यच श्रेयः स्यात. "खरंच. काय आहे, माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे?" यच्छ्रेयः स्यात. यच्छ्रेयः स्यान्निच्श्रितं (भ गी २।७) न्निच्श्रितं म्हणजे निश्चित कुठल्याही चुकीशिवाय. न्निच्श्रितं. भागवतामध्ये, तिथे आहे, निश्चितं. निश्चितं म्हणजे आपल्याला संशोधन करायची गरज नाही. ते आधीपासूनच ठरलेलं आहे."हा निर्णय आहे." कारण आपण,आपल्या छोट्या बुद्धीने, वास्तविक निश्चितं, श्रेय काय आहे याचा शोध लावू शकत नाही. ते आपल्याला माहित नाही. ते तुम्हाला श्रीकृष्णांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना विचारले पाहिजे. या गोष्टी आहेत. यच्छ्रेयः स्यान्निच्श्रितं ब्रूहि तन्मे. तर… "कृपया मला ते सांगा." "तर मी तुमच्याशी का बोलू?" इथे सांगतात: शिष्यस्तेSहं (भ गी २।७) "आता मी तुमचा माझ्या गुरूंच्या रूपात स्विकार करतो.मी तुमचा शिष्य बनतो." शिष्य म्हणजे: "जे तुम्ही सांगाल, ते मी स्विकारीन." तो शिष्य आहे. शिष्य शब्द शिश-धातूवरून आला आहे. शिश-धातू. शास्त्र. शास्त्र शासन. शिष्य. त्याचे मूळ तेच आहे. शास-धातू. शास-धातू म्हणजे राज,राज्य करणे. आपण विभिन्न प्रकारे राज्य करू शकतो. योग्य गुरूंचा शिष्य बनून, आपण राज्य करू शकतो.ते शिस-धातू आहे. किंवा आपण शास्त्रद्वारे,शस्त्राने राज्य करू शकतो. ज्याप्रमाणे राजाकडे शस्त्र असते.जर तुम्ही राजाच्या सूचना किंवा राज्याच्या नियमांचे पालन केले नाही, मग तिथे पोलीस दल,सैन्य दल आहे. ते शास्त्र आहे.आणि इतर शास्त्र सुद्धा आहेत. शास्त्र म्हणजे पुस्तक,ज्याप्रमाणे भगवद्-गीता. सर्वकाही त्यात आहे. तर आपण शस्त्र,शास्त्र किंवा गुरुद्वारा शासन केले पाहिजे.किंवा शिष्य बनून. म्हणून असं सांगितले जाते: शिष्यस्तेSहं(भ गी २।७) "मी स्वच्छेने बनतो… मी तुम्हाला शरण आलो आहे." "आता तू शिष्य बनला आहेस. तू माझा शिष्य बनला आहेस याला काय पुरावा आहे?" शाधि माम् तवं प्रपन्नम. "आता मी पूर्णपणे शरणागत झालो आहे." प्रपन्नम.