MR/Prabhupada 0274 - आपण ब्रम्ह-संप्रदायी आहोत



Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973

तर आपण वरिष्ठ व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला पाहिजे. बाकीचे सगळे बदमाश आणि मूर्ख आहेत. जर तुम्ही अशा वक्तीशी,गुरु संपर्क साधलात,जो श्रीकृष्णांचा प्रतिनिधी नाही,तुम्ही एका बदमाशाकडे जात आहात. तुम्ही कसे ज्ञानी व्हाल? तुम्ही श्रीकृष्ण किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला पाहिजे.ते आवश्यक आहे. तद विज्ञानार्थं स गुरुं एव अभिगच्छेत (मु,उ.१.२.१२).तर गुरु कोण आहे? समित-पानिः श्रोत्रियं ब्रम्ह-निष्ठम. गुरु पूर्णपणे कृष्णभावनामृत आहे.ब्रम्ह-निष्ठम. आणि श्रोत्रियं. श्रोत्रियं म्हणजे ज्यांनी ऐकलं आहे, वरिष्ठ आचार्यांकडून ऐकून. श्रोत्रियं पथ ने ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं आहे. एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः (भ गी ४।२) तर इथे आपण अर्जुनाकडून शिकले पाहिजे की जेव्हा आपण गोंधळलेलो असतो, जेव्हा आपण आपली खरी कर्तव्य विसरतो आणि म्हणूनच आपण गोंधळलेलो असतो. तेव्हा आपले कर्तव्य आहे की अर्जुनसारखे श्रीकृष्णांना शरण जाणे. जर तुम्ही म्हणालात: "श्रीकृष्ण कुठे आहेत?" कृष्ण तिथे नाहीत,पण श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. तो वैदिक आदेश आहे. तद विज्ञानार्थं स गुरुं एव अभिगच्छेत (मु,उ.१.२.१२). गुरूंशी संपर्क साधला पाहिजे. आणि गुरु म्हणजे मूलतः कृष्ण. तेने ब्रम्ह हृदा य आदिकवये मुहयन्ति यत्सूरयः (श्री भ १।१।१) जन्माद्यस्य यतोSन्वयादितरतच्श्रार्थेष्वभिज्ञः स्वराट् तुम्हाला संपर्क साधलाच पाहिजे. ते गुरु आहेत. म्हणून आपण विचार करतो,आपण ब्रम्हाला घेऊ… कारण ते या ब्रम्हांडाचे पहिले प्राणी आहेत,त्यांचा गुरूच्या रूपात स्वीकार केला जातो. त्यांनी दिले… ज्याप्रमाणे आपण ब्रम्ह-सांप्रदायातील आहोत. चार संप्रदाय आहेत,ब्रम्ह-सांप्रदाय, श्री-सांप्रदाय,रुद्र-सांप्रदाय आणि कुमार-सांप्रदाय. ते सर्व महाजन आहेत. महाजनो येन गतः पंथाः (चै च मध्य १७।१८६) आपण महाजनांनी दाखवलेला मार्ग स्विकारला पाहिजे. तर ब्रम्ह महाजन आहेत. हातात वेद असलेले ब्रम्हाचे चित्र तुम्हाला सापडेल. तर ते आहेत, त्यांनी वेदांची पहिली शिकवण दिली. पण त्यानं वैदिक ज्ञान कुठून मिळाले? म्हणून वैदिक ज्ञान अपौरुषेय आहे. ते मानवाने निर्माण केलेले नाही. ते भगवंतांद्वारे बनवलेले आहे. धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीतं(श्री भ ६।३।१९) निर्माण केलेले नाही. ते भगवंतांद्वारे बनवलेले आहे. धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीतं (श्री.भा. ६.३.१९). तर कसे भगवान श्रीकृष्णांनी ब्रम्हाला दिले? तेने ब्रम्ह हृदा. ब्रम्हा, ब्रम्हा म्हणजे वैदिक ज्ञान. शब्द-ब्रम्ह. तेने. त्यांनी वैदिक ज्ञान हृदयातून दिले. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतीपूर्वकम् (भ गी १०।१०) जेव्हा ब्रम्हाला निर्माण केले,तेव्हा ते गोंधळलेले होते: "माझे कर्तव्य काय आहे? सगळीकडे अंधार आहे." म्हणून त्यांनी ध्यान केले,आणि श्रीकृष्णांनी त्यांना ज्ञान दिले की: " तुझे कर्तव्य हे आहे. तू अशाप्रकारे कर." तेने ब्रम्ह हृदा य आदिकवये, आदिकवये (श्री भ १।१।१) ब्रम्हा आदिकवये आहे. म्हणून वास्तविक गुरु श्रीकृष्ण आहे. आणि इथे आहे… श्रीकृष्ण भगवद् गीतेत सल्ला देत आहेत. हे दुष्ट आणि मूर्ख श्रीकृष्णांचा गुरुच्या रूपात स्विकार करत नाहीत. ते कुठल्यातरी दुष्ट आणि मूर्ख,दुराचारी, पापी व्यक्तीकडे जातील आणि गुरु स्विकार करतील. तो कसा गुरु असू शकेल?