MR/Prabhupada 0012 - ज्ञान स्रोत ऐकत असावे

Revision as of 03:42, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 16.7 -- Hawaii, February 3, 1975

आपल्यापैकी प्रत्येक जण, आपण अपूर्ण आहोत. आम्हाला आमच्या डोळ्यांवर फारच गर्व आहे : "तुम्ही मला दाखवू शकता का?" तुमच्या डोळ्यांची अशी काय पात्रता आहे की तुम्ही बघू शकता? तो असा विचार करत नाही की, की "माझी पात्रता नाही आहे, तरी, मला बघायचे आहे." हे डोळे, अरे बापरे, ते खूप काही परिस्तीथीवर अवलंबुन आहेत. आता तिथे वीज आहे, आपण पाहू शकता. वीज बंद झाल्यानंतर त्वरित, तुम्ही बघू शकत नाही. तर तुमच्या डोळ्यांचे मुल्य काय आहे ? तुम्ही या भिंतीच्या पलीकडे काय चालले आहे ते बघू शकत नाही. त्यामुळे तुमच्या या तथाकथित इँद्रियांवर ज्ञानाचे स्त्रोत म्हणून विश्वास ठेवू नका. नाही. ज्ञानाचा स्रोत हा श्रवणशक्ति द्वारे असला पाहिजे, त्याला श्रुति असे म्हणतात. त्यामुळे वेद हे श्रुति म्हणून ओळखले जातात. श्रुतिप्रमाण​, श्रुतिप्रमाण​ . ज्याप्रमाणे एक मूल किंवा मुलगा जाणु ईच्छितो की आपले वडील कोण आहेत . तर पुरावा काय आहे? तो पुरावा आहे श्रुति, आई कडून श्रवण केलेला. आई सांगते, "हे तुझे वडील आहेत." तेव्हा तो ऐकतो, तो हे बघत नाही की ते माझे वडील कसे झाले. कारण त्याच्या शरीराच्या निर्मितिच्या आधीपासून वडील होते, तो हे कसे पाहु शकत होता? त्यामुळे बघून, तुम्ही पडताळणी करू शकत नाही की तुमचे वडील कोण आहेत. तुम्हाला अधिकृत व्यक्ती कडून ते ऐकायचे आहे. आई हे प्रमाण आहे. म्हणून श्रुतिप्रमाण​ : प्रमाण हे ऐकण्यामध्ये आहे, बघण्यात नाही. बघण्यात.... आपले अपूर्ण डोळे... तिथे कितीतरी अडथळे आहेत. मग त्याचप्रमाणे, थेट आकलन करून, तुम्हाला सत्य कळू शकत नाही. थेट आकलन तर्क आहे, डॉ. फ्रॉग. डॉ. फ्रॉग तर्क करीत आहेत अटलांटिक महासागर काय आहे . तो एका विहिरीच्या आत आहे, तीन फुट विहीर, आणि काही मित्रांनी त्याला सूचीत केले, "अरे बाप रे, मी अफाट पाणी पाहिले." "जे अफाट पाणी म्हणजे काय?" "अटलांटिक महासागर." "ते किती मोठे आहे?" "खूप, खूप मोठे." त्यामुळे डॉ. फ्रॉग विचार करीत आहेत, "कदाचित चार फुट." ही विहीर तीन फूट आहे. चार फुट असू शकते. ठीक आहे, पाच फुट. चला, दहा फुट." तर अशाप्रकारे, तर्क करत राहणे, कसे फ्रॉग, डॉ फ्रॉग, अटलांटिक महासागर किंवा प्रशांत महासागर समजू शकतील? आपण अनुमानाद्वारे, अटलांटिक, प्रशांत महासागर ह्यांची लांबी आणि रुंदी, अंदाज करू शकतो? तर अनुमान करून, आपण घेऊ शकत नाही. ते इतकी वर्ष ह्या विश्वाबद्धल तर्कवितर्क करीत आहेत, किती तारे आहेत, लांबी आणि रुंदी काय आहे, कुठे आहे ... कुणालाच भौतिक जगाबद्धल जरी काहीही माहीत नाही, आणि अध्यात्मिक जगाबद्धाल काय बोलावे ? ते फार पलीकडे आहे, फार लांब. परस्तस्मात्तु भावोSन्योSव्यक्तोSव्यक्तात्सनातनः (भ.गी.८.२०). तुम्हाला भगवद गीते मद्ध्ये सापडेल, तिथे दुसरा निसर्ग आहे. हा निसर्ग, तुम्हाला दिसेल काय, आकाश, एक गोलाकार घुमट, की, त्याच्या वर, पुन्हा तिथे पाच तत्वांचा थर आहे. हे आच्छादन आहे. ज्याप्रमाणे तुम्ही नारळ बघितला आहे. ते कठीण आच्छादन आहे, आणि त्या आच्छादनाच्या आत पाणी आहे. त्याचप्रमाणे, ह्या आच्छादनाच्या आत... आणि आच्छादनाच्या बाहेर तिथे पाच थर आहेत, एकमेकांच्या तुलनेत हजार पटीने मोठे. पाण्याचा थर, हवेचा थर, आगीचा थर. तर तुम्हाला हे सर्व थर भेदुन जायचे आहे. मग तुम्हाला अध्यात्मिक जग मिळेल. ही सगळी ब्रह्मांडे, अमर्यादित संख्या, कोटी. यस्य प्रभा प्रभवतो जगदण्डकोटि (ब्र.सं. ५.४०) जगदण्ड म्हणजे विश्व. कोटी, किती लाखो एकत्र पुंजक्यात, ते भौतिक विश्व आहे. आणि या भौतिक विश्वाच्या पलीकडे अध्यात्मिक जग आहे, दुसरे आकाश. ते देखील आकाश आहे, त्याला परव्योम असे म्हणतात. म्हणून तुमच्या इन्द्रियांनी आकलन करून तुम्ही सूर्य ग्रह किंवा चंद्र ग्रहावर काय आहे ह्याचा अंदाज बांधू शकत नाही, हा ग्रह, ह्या विश्वात. तुम्ही तर्क करून हे अध्यात्मिक विश्व कसे समजू शकता? हा मूर्खपणा आहे. त्यामुळे शास्त्र सांगते, अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केण योजयेत. अचिन्त्य​, जे कल्पनेच्या पलीकडे आहे, तुमच्या ज्ञानेंद्रिय आकलना पलीकडे, मतभेद करण्याचा प्रयत्न करू नका आणि समझून घ्या आणि तर्क करा. हा मुर्खपणा आहे. हे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला गुरुकडे जायचे आहे. तद्विज्नानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत, समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम (मु.उ.१.२.१२). ही प्रक्रिया आहे.