MR/Prabhupada 0011 - कृष्णा च्या उपासना मनात करू शकता



Lecture on BG 4.28 -- Bombay, April 17, 1974

भक्तिरसाम्र्तसिन्धु मध्ये, एक कथा आहे... कथा नव्हे. वस्तुस्थिती. तिथे असे वर्णन केले आहे की एक ब्राह्मण - तो एक महान भक्त होता. - त्याला एक छान सेवा अर्पण करायची होती, अर्चना, मंदिरात पूजा. पण त्याच्या कडे पैसे नव्हते. पण एकदा कधी तरी तो भागवत कथेच्या वर्गात बसला होता. आणि त्याने असे ऐकले की कृष्णाची आराधना मनातल्या मनात सुद्धा करता येते. म्हणून त्याने ही संधी घेतली कारण तो फार काळापासून विचार करत होता श्रीकृष्णांची भव्य उपासना कशी करायची, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तो, जेव्हा त्याला हा मुद्दा मिळाला, की एक कोणी श्रीकृष्णांची मनातल्या मनात आराधना करू शकतो, अशारितीने गोदावरी नदिमध्ये स्नान करून, तो एका झाडाखाली बसून होता आणि मनातल्या मनात तो एक मोठे भव्य सिंहासनाची रचना करत होता, थ्रोन, दागिने, फुले इत्यादीने सुशोभीत करून आणि श्रीकृष्णाना सिंहासनावर बसवून, तो श्रीकृष्णाना आंघोळ घालत होता गंगा , यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरीच्या पाण्याने. नंतर तो श्रीकृष्णाना खूप चांगल्या प्रकारे सजवत होता, नंतर फुले व हार पूजेत अर्पण करत होता. नंतर तो चांगल्या प्रकारे स्वयंपाक करत होता, आणि तो परमान्न​ शिजवत होता , गोड भात. त्यामुळे त्याला तपासून पाहण्याची इच्छा झाली, ते फारच गरम आहे की नाही. कारण परमान्न​ हे थंड घेतले जाते, परमान्न​ गरम घेत नाहीत. त्यामुळे त्याने परमान्नावर बोट ठेवले आणि त्याचे बोट भाजले. नंतर त्याची साधना भंग पावली, कारण तिकडे काहीच नव्हते. केवळ आपल्या मनातल्या मनात तो सर्व काही करत होता. अशा रीतीने... पण त्याने बघितले की त्याचे बोट भाजले होते, त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला. अशाप्रकारे, नारायण वैकुंठलोकातून, तो गालात हसत होता. लक्ष्मी माताजींनी विचारले "तुम्ही गालातल्या गालात का हसत आहात?" "माझा एक भक्त माझी अशा पद्धतीने पूजा करीत आहे. तेव्हा माझ्या माणसाना त्याला ताबडतोब इथे वैकुंठलोकात आणायला पाठवा." तर भक्ति-योग म्हणून छान आहे की जरी तुमच्याकडे काही हेतू नाही श्रीकृष्णाना भव्य पूजा अर्पण करण्याची, तुम्ही मनातल्या मनात करू शकता, ते सुद्धा शक्य आहे.