MR/Prabhupada 0016 - मला काम करायचे

Revision as of 03:50, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 7.1 -- San Francisco, March 17, 1968

तर एकाला समजले पाहिजे श्रीकृष्णांशी नाते कसे जोडायचे. श्रीकृष्ण सर्वत्र आहेत. हे कृष्णभावनाभावित आंदोलन आहे. हे कृष्णभावनाभावित होणे आहे. एकाला माहीत असलेच पाहिजे आपण श्रीकृष्णांच्या स्वरूपाची वैशिष्टे कशी साध्य करू शकतो. लाकडामध्ये किंवा लोखंड किंवा धातू... काही हरकत नाही. श्रीकृष्ण सर्वत्र आहेत. तुम्हाला शिकले पाहिजे कसे श्रीकृष्णांना सर्व गोष्टींनी संपर्क केला पाहिजे. ते ह्या योगाच्या प्रणाली मध्ये स्पष्ट केले जाईल. आपणास ते शिकून घेता येईल. त्यामुळे कृष्णभावनाभावितहोणे हा सुद्धा योग आहे, परिपूर्ण योग, सर्व योग प्रणाली मध्ये उच्चतम. कोणीही, कुठलाही योगी येऊ शकतो, आणि आम्ही आव्हान देऊ शकतो. आणि आम्ही त्याला एक क्रमांकाचा योग प्रणाली म्हणू शकतो. हा एक क्रमांकाचा आहे आणि त्याचवेळी खूप सोपा आहे. तुम्हाला तुमच्या शरीराला व्यायाम ध्यायचा नाही आहे. समजा तुम्ही अशक्त आहात किंवा तुम्हाला काही थकवा जाणवत आहे, पण कृष्णभावनाभावित असणार्‍याला वाटणार नाही. आमचे सर्व विद्यार्थी, ते फक्त जास्त काम करण्यास उत्सुक असतात, कृष्णभावनाभावित. "स्वामीजी, मी काय करावे? मी काय करू शकतो?" ते करत आहेत. छान. खूप छान. त्यांना थकवा वाटत नाही. त्याला कृष्णभावनाभावित म्हणतात. भौतिक जगा मध्ये, जर तुम्ही थोड्या वेळेसाठी काम केले, तर तुम्हाला थकवा जाणवतो. तुम्हाला विश्रांतीची गरज लागते. अर्थातच, मी नाही, मला असे म्हणायचे आहे, मीच खुद्द अतिशयोक्ती करतोय. मी बहात्तर वर्षांचा वृद्ध मनुष्य आहे. बापरे, मी आजारी होतो. मी भारतात परत गेलो. मी पुन्हा परत आलोय. मला काम करायचे आहे! मला काम करायचे आहे. स्वाभाविकच, मी या सर्व कार्यातून निवृत्ती घेतली असती , पण मला वाटत नाही ... जेव्हडे मी करू शकतो, मला काम पाहिजे. मी करू ईच्छितो... दिवस आणि रात्र. रात्री मी डिक्ट्याफोन ने काम करतो. तर मला खेद आहे... मला खेद वाटतो जर मी काम करू नाही शकलो. ही कृष्णभावना आहे. एक जण काम करण्यास उत्सुक असला पाहिजे. ते असे नाही की तो एक निष्क्रिय समाज आहे. नाही. आमच्या कडे पुरेसे काम आहे. ते पत्रिका संपादन करीत आहेत, ते पत्रिका विकत आहेत. फक्त एव्हडेच शोधा कृष्णभावना कशी पसरविता येईल, खूपच. हे प्रात्यक्षिक आहे.