MR/Prabhupada 0019 - आपण ऐकत आहात कधीही काय, आपण इतरांना सांगा

Revision as of 03:56, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Jagannatha Deities Installation Srimad-Bhagavatam 1.2.13-14 -- San Francisco, March 23, 1967

समजा तुम्हाला मला जाणून घ्यावयाचे आहे किंवा माझ्याबद्धल काहीतरी माहिती पाहिजे, तुम्ही कुठल्या पण मित्राला विचारू शकता "अरे, स्वामिजी कसे आहेत?" तो काहीतरी सांगेल, दुसरा कोणी, काहीतरी. पण मी स्वत: तुम्हाला स्पष्ट करताना, "ही माझी स्थिती आहे. मी हा असा आहे," ते योग्य आहे. ते योग्य आहे. तर तुम्हाला परम भगवंता बद्धल माहिती हवी असेल, तुम्ही तर्क करू शकत नाही, ना चिंतन. ते शक्य नाही, कारण तुमची इंद्रीये फारच सदोष आहेत. तर मार्ग काय आहे? त्याच्याकडून फक्त ऐकून घ्या. तर तो आस्थावाइकपणे भगवद गीता सांगवयास आला आहे. श्रोतव्यः फक्त ऐकून घ्यायचा प्रयत्न करा. श्रोतव्यः आणि कीर्तितव्यश्च​. जर तुम्ही कृष्णभावनाभावित वर्गात फक्त तुम्ही ऐकलेत आणि ऐकलेत, आणि बाहेर जा आणि विसरा, अरे, ते बरोबर नाही. त्यामुळे तुमच्यात सुधारणा होणार नाही. मग काय आहे?कीर्तितव्यश्च​: "जे तुम्ही ऐकत आहात, ते तुम्ही दुसर्‍याला सांगितले पाहिजे." ते परिपूर्ण आहे. म्हणून आम्ही स्थापना केली जाऊ देवाचिया गावा. विद्यार्थ्यांना अनुमती आहे, ते जे काही ऐकत आहेत, ते वीचारमग्न असले पाहीत आणि लिहिले पाहिजे. कीर्तितव्यश्च​: , फक्त ऐकून चालणार नाही. "अरे बाप रे, मी लक्षावधी वर्षांपासून ऐकत आहे; अजूनही, मला समझत नाही." - कारण तुम्ही पठण​ करीत नाही, तुम्ही जे काही ऐकले आहे त्याची पुनरावृत्ती करत नाही. तुम्हाला पुनरावृत्ती केली पाहिजे. कीर्तितव्यश्च​:, . श्रोतव्यः कीर्तितव्यश्च​ धेयः. आणि तुम्ही कसे लिहु शकता किंवा तुम्ही कसे बोलू शकता आपण त्याचा विचार करत नाही तोपर्यंत? तुम्ही कृष्णा बद्धल ऐकत आहात; तुम्हाला विचार केला पाहिजे, तरच तुम्ही बोलू शकता. नाहीतर नाही. तर श्रोतव्यः कीर्तितव्यश्च​ धेयः आणि पूज्यश्च​,. आणि आपण आराधना करावी. त्यामुळे आम्हाला ह्या देवाची उपासना करण्याची गरज आहे. आम्हाला त्याचा विचार केला पाहिजे, आम्हाला संवाद साधला पाहिजे, आम्हाला श्रवण केले पाहिजे, आम्हाला आराधना केली पाहिजे, पूज्यश्च​ . तर, अधूनमधून? नाही. नित्यदा: नियमितपणे, नियमित. नित्यदा, हा उपक्रम आहे. तर जो कोण हा उपक्रम अंगिकारतो , त्याला परं सत्याचे ज्ञान होऊ शकते. हे श्रीमद् भागवता मध्ये नमूद केले आहे.