MR/Prabhupada 0085 - ज्ञानाची संस्कृती म्हणजे आध्यात्मिक ज्ञान

Revision as of 18:08, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on Sri Isopanisad, Mantra 9-10 -- Los Angeles, May 14, 1970

"ज्ञानींनी आपल्याला हे समजावून सांगितले आहे की, ज्ञानयुक्त संस्कृतीमधून एक परिणाम प्राप्त झाला आहे , आणि असे म्हटले जाते ज्ञानाचा अभाव असलेल्या संस्कृतीतुन विविध परिणाम प्राप्त होतात ." तर काल आपण काही प्रमाणात समजावून सांगितलं की ज्ञानाचा अभाव असलेली संस्कृती काय आहे आणि ज्ञान संस्कृती काय आहे. ज्ञानाची संस्कृती म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. ते वास्तविक ज्ञान आहे. आणि भौतिक समाधानासाठी ज्ञान वृद्धी किंवा या भौतिक शरीराचे रक्षण करण्यासाठी , ती अज्ञानी संस्कृती आहे. कारण आपण कितीही या शरीराचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करु , त्याचा नैसर्गिक क्रम तर होताच राहील . ते काय आहे?

जन्म-मृत्यु-जरा-व्याधी (भ गी १३।९)(भ गी १३।९)

पुनर्जन्म आणि मृत्यू पासून आपण या शरीराला वाचवू शकत नाही, आणि शरीर असताना , रोग आणि वृद्धत्व . तर लोक या शरीराच्या ज्ञानाच्या ज्ञानासाठी खूप व्यस्त आहेत, जरी प्रत्येकजण पाहत आहे की प्रत्येक क्षणी या शरीरचा क्षय होत आहे . देहाच्या मृत्यूची नोंदणी देहच्या जन्माच्या वेळीच झालेली असते . ते सत्य आहे. तर आपण या शरीराच्या नैसर्गिक क्रमाला थांबवू शकत नाही. आपल्याला शरीराच्या प्रक्रिया स्वीकारणे आवश्यक आहे , म्हणजे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग. तर म्हणून , भागवद म्हणते,

यस्यात्म बुद्धिः कुणपे त्रि-धातुके (श्री भा १०।८४।१३) .

हे शरीर तीन मूलभूत घटकांपासून बनले आहे. श्लेष्मा, पित्त आणि हवा . ही वैदिक आवृत्ती आणि आयुर्वेदिक उपचार आहे. हे शरीर श्लेष्मा, पित्त आणि वायुची एक पिशवी आहे. वृद्ध होताना वायुचा प्रवाह अनियंत्रित होतो ; म्हणून वृद्ध मनुष्याला संधिवात , इतर शारीरिक आजार संभवतात . तर भागवत म्हणते , "ज्याने पित्त, श्लेष्म , आणि वायू च्या मिश्रणाचा शरीर म्हणून स्वीकार केला आहे, तो माणूस गाढव आहे." वास्तविक पाहता , हे खरं आहे. जर आपण या पित्त , श्लेष्म आणि वायू या मिश्रणाचा मी म्हणून स्वीकार केला ... तर ... इतका हुशार व्यक्ती, एक महान तत्वज्ञानी, फारच महान शास्त्रज्ञ, याचा अर्थ असा की तो पित्त, श्लेष्म आणि वायू यांचे मिश्रण आहे? नाही ते चूक आहे . तो या पित्त कफ आणि वात यांपासून वेगळा आहे . तो आत्मा आहे आणि त्याच्या कर्माप्रमाणे, तो त्याच्या प्रतिभा दर्शवित आहे . म्हणून त्यांना हे कर्म, कर्माचा नियम समजत नाही. का आपण इतक्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांना पाहतो ?