MR/Prabhupada 0110 - आधीच्या आचार्यांच्या हातातल्या बाहुल्या बाणा

Revision as of 17:53, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Morning Walk -- April 19, 1973, Los Angeles

स्वरुप दामोदर: जर त्यांनी श्रीमद-भागवत ऐकल तर त्याचं हृदय परिवर्तन होईल.

प्रभुपाद: नक्कीच. काल, त्यासाठी कोणीतरी आपल्या विद्यार्थ्यांचे आभार मानले. ओह , आम्ही तुमचे खूप आभारी आहोत की तुम्ही भागवतम् देता." कोणीतरी नाही का,असं म्हटलं ?

भक्त: हो,हो. असं त्रिपुरारी म्हणाला. त्रिपुरारी.

प्रभुपाद: ओह त्रिपुरारी होय. कोणीतरी असं म्हणत होत?

त्रिपुरारी; हो, काल विमानतळावर दोन मुले, त्यांनी श्रीमद-भागवताचे दोन संच विकत घेतले.

जयतीर्थ: संपूर्ण? त्रिपुरारी: सहा खंड. त्यांनी भागवतम् घेतलं आणि म्हणाले: "खूप आभारी आहोत ." आणि नंतर त्यांनी ते त्यांच्या सामानात ठेवलं आणि ते त्यांच्या विमानाची वाट पाहत होते आणि त्या प्रत्येकाकडे प्रथम खंड आहे...

प्रभुपाद: होय,कोणत्याही प्रामाणिक माणसाला आपल्या प्रचार चळवळीबद्दल मनापासून आदर वाटतो हि पुस्तक वितरित करुन, तुम्ही श्रीकृष्णाची मोठी सेवा करताय. त्यांनी सगळयांना सांगितलं: सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। (भ गी १८।६६)

म्हणूनच,कृष्ण येतो, म्हणुन कोणी तीच सेवा करत असेल. "कृष्णाला शरण जातो," तो कृष्णाद्वारे ओळखला जातो. असं भगवद्-गीतेत सांगितलंय. न च तस्मान्मनुष्येषु (भ गी १८।६९)

मानवी समाजात, जो प्रचारकार्यात मदत करतो त्याच्यापेक्षा अधिक प्रिय कोणीही नाही. हरे कृष्णा.

ब्रम्हानंद: श्रीला प्रभुपाद,आम्ही फक्त तुमच्या हातातल्या कठपुतळ्या आहोत. तुम्ही आम्हाला पुस्तक देता.

प्रभुपाद: नाही, आपण सगळे कृष्णाच्या हातातल्या कठपुतळ्या आहोत. मी पण कठपुतळी आहे. कठपुतळी. हि गुरुशिष्य परंपरा आहे. आपण,आपण कठपुळी बनलं पाहिजे. एवढंच. जसा मी माझ्या गुरु महाराज्यांच्या हातातली कठपुतळी आहे, जर तुम्ही माझ्या कठपुतळ्या बनलात,मग ते यश आहे. जेव्हा आपण पूर्वीच्या आचार्यांच्या हातातल्या कठपुतळ्या बनू तेथे खरं यश आहे. तांदेर चरण सेवी भक्त सने वास भक्तांच्या संगतीत राहणे आणि आधीच्या आचार्यांच्या हातातले बाहुले बनणे. हे यश आहे. म्हणून आम्ही तस बनायचा प्रयत्न करत आहोत. कृष्णभावनामृत संघ आणि पूर्व आचार्यांची सेवा करणे. एव्हढेच.

हरेर नाम हरेर नाम...(चै च अादि १७।२१)

लोक येतील. ती आमच्या प्रचारकार्याची प्रशंसा करतील. त्याला थोडा वेळ लागेल.

स्वरुप दामोदर; दोन वर्षापूर्वीपेक्षा आता ते जास्त प्रशंसा करतात.

प्रभुपाद: होय,होय. स्वरुप दामोदर:आता त्यांना खरं तत्वज्ञान समजायला लागलंय.