MR/Prabhupada 0162 - फक्त भगवद्गीतेचा संदेश पुढे न्या

Revision as of 09:35, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Press Interview -- October 16, 1976, Chandigarh


भारतामध्ये आमच्याकडे आत्म्याबद्दल जाणण्यासाठी विपुल वैदिक साहित्य आहे. आणि मनुष्य जन्मात,जर आपण अध्यात्मिक गोष्टींची काळजी घेतली नाही,तर आपण आत्महत्या करत आहोत. ही भारतात जन्मलेल्या महान व्यक्तींची सूचना आहे. आचार्य जसे...अलीकडील... पूर्वी, इथे मोठे,मोठे आचार्य जसे व्यासदेव आणि इतर होते. देवल अनेक, अनेक आचार्य. आणि अलीकडच्या काळात एक हजार वर्षांपूर्वी, अनेक आचार्य होते.

जसे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विष्णु स्वामी, आणि पाचशे वर्षांपूर्वी चैतन्य महाप्रभु. त्यांनीही आध्यत्मिक ज्ञानाबद्दल अनेक साहित्य दिलंय. पण सध्याच्या क्षणी हे अध्यात्मिक ज्ञान दुर्लक्षित आहे. म्हणूनच चैतन्य महाप्रभूंचा संपूर्ण जगाला हा संदेश आहे. की तुमच्यापैकी प्रत्येकजण, तुम्ही गुरु बना, अध्यात्मिक गुरु. तर कसा प्रत्येकजण अध्यात्मिक गुरु बनेल? अध्यात्मिक गुरु बनणे सोपे काम नाही. एखादा विद्वान ज्ञानी असला पाहिजे आणि आत्मा आणि सर्वकाही गोष्टींचा साक्षात्कार झालेला असला पाहिजे पण चैतन्य महाप्रभूंनी छोटेसे सूत्र दिले आहे. की जर तुम्ही भगवद् गीतेच्या शिकवणीचे कडकपणे पालन केले आणि भगवद् गीतेच्या हेतूचा प्रचार केलात, तर तुम्ही गुरु बनलात. बंगलीमध्ये वापरलेले नेमके शब्द, असं सांगितलंय,

यारे देखा, तारे कहा 'कृष्ण' - उपदेश (चैतन्य चरितामृत मध्य 7.128)

गुरु बनणं खूप कठीण काम आहे.पण जर तुम्ही फक्त भगवद् गीतेचा संदेश पुढे नेलात. आणि भेटणाऱ्या कोणलाही समजवण्याचा प्रयत्न केलात, मग तुम्ही गुरु बनता तर आपल्या या कृष्णभावनामृत चळवळीचा हा उद्देश आहे. आम्ही कुठलाही चुकीचा अर्थ न लावता भगवद् गीता जशी आहे तशी सादर करतो.