MR/Prabhupada 0282 - आपण आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे

Revision as of 18:07, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 7.2 -- San Francisco, September 11, 1968

तर मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः

(भ गि ७।३)

इथे असे सांगितले आहे की मनुष्यस तेषां शास्त्र अधिकार यज्ञानां सहस्रमध्ये. आता,मी काय आहे, देव काय आहे, भौतिक जग काय आहे, ते कसे चालते, या गोष्टींचा विचार करण्याचे काम शिक्षित मनुष्याचे आहे. मूर्ख माणूस विचार करू शकत नाही. म्हणून शास्त्र अधिकार. शास्त्र म्हणजे एखाद्याला ज्ञानाच्या पुस्तकांमध्ये,शास्त्रामध्ये काही ज्ञान प्राप्त झाले आहे. जेव्हा आपण पाहतो एखाद्याकडे ज्ञानाची पुस्तके किंवा शास्त्राची माहिती आहे,मात्रा कमी होईल. या जागेत जर आपण शोधले किती अशिक्षित लोक आहेत,ओह,तुम्हाला पुष्कळ सापडतील. आणि जसे तुम्ही शोधायचा प्रयत्न केलात किती एम.ए.आहेत, तर एकदम संख्या कमी होईल. त्याचप्रमाणे,अनेक माणसे आहेत,पण जर तुम्हाला जीवनाची परिपूर्णता करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना शोध घ्यायचा असेल तर संख्या लगेच कमी होईल. आणि त्यापैकी अनेक स्वामी,योगी आहेत. जर तुम्ही त्याच्यापैकी कोणाला भगवंतांना समजायचे आहे, कोणाला भगवंतांचे ज्ञान आहे, हे मोजलत तर एकदम संख्या कमी होईल. परत. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की खूप हजारो लोकांमधून, कोणी एखादाच आपल्या जीवनाला परिपूर्ण बनवण्यासाठी इच्छुक आहे. आणि अनेक,हजारो लोकांमधून जो प्रत्यक्षात त्याचे जीवन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्हाला कोणीतरी सापडेल - किंवा तुम्हाला कळेल - कोणाला देव किंवा श्रीकृष्ण माहित आहेत. पण श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की ते स्वतः येतात ज्यामुळे ते प्रत्येकाद्वारे ओळखले जातील. आणि ते इतके दयाळू आहेत की त्यांच्या भौतिक जगाच्या प्रस्थाना आधी,ते भगवद् गीता सोडून जातात. जेणेकरून तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक भाषणावरून कळू शकेल की देव काय आहे. तर तुम्ही भगवद् गीता योग्य रीतीने वाचली,जशी श्रीकृष्णांनी सागितली आहे, मूर्खपणें व्याख्या करून नाही. अनावश्यकपणे, पण जशी आहे तशी, जशी आहे तशी… कुदळीला कुदळ म्हणा. श्रीकृष्ण सांगतात की "मी पूर्णपुरुषोत्तम भगवान आहे," आपल्या विवेकबुद्धीने या आवृत्तीचा अर्थ लावू नका,पण श्रीकृष्णांचा पूर्णपुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करा. आणि त्यांचे कार्य, त्यांच्या शास्त्रीय ज्ञानाद्वारे, शहाणपण… आधीच्या प्रत्येकजणांनी, सर्व आचार्यांनी स्वीकारले आहे. तर आपण आचार्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे.महाजनो येन गतः स पंथाः(चै च मध्य १७।१८६) आपण जोपर्यंत महान व्यक्तींच्या पदचिन्हांचे अनुसरण करत नाही तोपर्यंत उच्च गोष्टी आपण समजू शकत नाही, ज्याप्रमाणे वैज्ञानिक विश्वात, गुरुत्वाकर्षणाचा नियम. तुम्हाला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाबद्दल काही माहित नाही,पण सर आयजैक न्यूटन,त्यांनी सांगितले की गुरुत्वाकर्षण आहे. त्यांनी स्वीकारले. एवढेच. ते म्हणजे तुम्ही महान व्यक्तीचे अनुसरण केले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना पूर्ण पुरषोत्तम भगवान (रूपात) स्वीकारले पाहिजे आपल्या लहरीने नाही. पण त्यांचा स्वीकार केला आहे,अशा महान व्यक्तींद्वारे जसे चैतन्य महाप्रभु, रामानुजाचार्य,शंकराचार्य, महान व्यक्तिमत्वे जी अध्यात्मिक जगाच्या नियतीचे मार्गदर्शन करत आहेत. म्हणून तुम्ही त्याचप्रकारे स्वीकार केला पाहिजे.