MR/Prabhupada 0281 - मनुष्य पशु आहे, पण तर्कसंगत जनावर



Lecture on BG 7.2 -- San Francisco, September 11, 1968

यज्ज्ञात्वा नेह भूयोSन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते. भूयो म्हणजे आणखी काही समजण्यासारखे नाही.सर्वकाही संपूर्ण माहिती आहे. मग प्रश्न असा असू शकतो की लोक श्रीकृष्णांना समजत नाहीत. अर्थ तो एक संबंधित प्रश्न आहे. आणि नंतरच्या श्लोकात श्रीकृष्णांद्वारे त्याचे उत्तर दिले आहे.

मनुष्याणां सहस्रेषु
कश्चिद्यतति सिद्धये
यततामपि सिद्धानां
कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः
(भ गी ७।३)

मनुष्याणां सहस्रेषु.वेगवेगळ्या प्रकारची माणसे आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला इतर ग्रहांव्यतिरिक्त फक्त या ग्रहावरच्या प्रत्येकाची माहिती आहे. शेकडो, हजारो जातींचे लोक आहेत. अगदी इथे आपण बसलो आहोत, अनेक स्त्रिया आणि पुरुष, वेगवेगळ्या जाती आहेत. आणि जर तुम्ही बाहेर गेलात,तिथेही विविधता आहे. जर तुम्ही दुसऱ्या देशात गेलात- भारत,जपान,चायना - तुम्हाला भन्नता दिसू शकेल. म्हणून असं सांगितले आहे, मनुष्याणां सहस्रेषु (भ गी ७।३), सहस्रावधी विविध मनुष्यांपैकी, कश्चिद्यतति सिद्धये केवळ काही मनुष्य जीवनाचे तत्वज्ञान समजू शकतात. कारण मनुष्य बुद्धिजीवी प्राणी आहे. मनुष्य बुद्धिजीवी आहे. मनुष्य प्राणी आहे,पण बुद्धिजीवी प्राणी. काय चांगले आणि काय वाईट हे ठरवण्याचे विशेष वरदान माणसाला मिळाले आहे. प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी माणसाला मिळाली आहे. तर सध्याच्या काळात शिक्षण पद्धती इतकी वाईट आहे की वस्तुतः ते पशु शिक्षण आहे, पशु शिक्षण म्हणजे जेव्हा आपल्याला आहार,निद्रा,भय आणि मैथुन जास्त आवडते,ते पशु शिक्षण आहे. आहार,निद्रा,भय आणि मैथुन, हे प्राण्यांमध्ये सुद्धा सापडते. कोणताही फरक नाही. त्याचे आपले स्वतःचे संभोगाचे नियम आहेत, स्वतःचे निद्रयेचे नियम आहेत. स्वतःचे रक्षण करण्याचे नियम आहेत. तुम्ही एकांत स्थळी पत्नी बरोबर संभोग करत आहात, एका चांगल्या खोलीत,सजवलेल्या खोलीत, पण एक कुत्रा रस्त्यावर संभोग करत आहे,पण परिणाम एकच आहे. म्हणून संभोगाची पद्धत सुधारणे म्हणजे संस्कृतीची प्रगती नाही. हि पशूंची सभ्यता आहे, एवढेच. पशु सुद्धा,कुत्रा सुद्धा इतर कुत्रांपासून स्वतःचे रक्षण करू शकतो. आणि तुम्हाला वाटत असेल की स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही आण्विक ऊर्जेचा शोध लावला आहे,तर तो मानवी संस्कृतीचा विकास नाही. बचाव उपाय, एवढेच, अशाप्रकारे तुम्ही विश्लेषण करत राहाल. मनुष्याचे विश्लेषण योग्य आहे जेव्हा तो आपल्या घटनात्मक स्थितीचा शोध घेतो. "मी काय आहे? मी काय आहे? मी हे शरीर आहे का? मी या जगात का आलो आहे?" हि जिज्ञासा आवश्यक आहे. हे मनुष्याचे विशेष विशेषाधिकार आहेत. म्हणून जेव्हा एखादा चोकशी करायला सुरवात करतो "मी काय आहे?" आणि जर तो अशाप्रकारे शोध घेत गेला तर तो देवापर्यंत येईल. कारण तो भगवंतांचा अंश आहे. तो भगवंतांचा नमुना आहे. म्हणून मनुष्याणां सहस्रेषु (भ.गी. ७.३). हजारो मनुष्यांच्या जातींपैकी, एखादा,किंवा काही व्यक्ती म्हणू शकता, भगवंतांना जाणून घेण्यास इच्छुक असू शकतात. केवळ जाणत नाही… भगवंतांना जाणण्यासाठी नाही,तर स्वतः बद्दल जाणण्यासाठी. आणि जर त्याला वास्तवात स्वतःबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तो हळूहळू भगवंतांपर्यंत येईल.