MR/Prabhupada 0295 - एक जीव इतर सगळ्या जीवांच्या सर्व गरजा पुरवत आहे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0295 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
 
No edit summary
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0294 - श्रीकृष्णांना शरण जाण्याचे सहा मुद्दे|0294|MR/Prabhupada 0296 - जरी प्रभू येशू ख्रितांना वधस्तंभावर चढवले, तरी त्यांनी आपले मत कधीही बदलले नाही|0296}}
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0294 - |0294|MR/Prabhupada 0296 - |0296}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 22: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|5-jZbT5ER0M|एक जीव इतर सगळ्या जीवांच्या सर्व गरजा पुरवत आहे - Prabhupāda 0295}}
{{youtube_right|u0wAxw6CBPo|एक जीव इतर सगळ्या जीवांच्या सर्व गरजा पुरवत आहे<br/> - Prabhupāda 0295}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 13:22, 1 June 2021



Lecture -- Seattle, October 4, 1968

हे जीवन, हे मानवी जीवन… आता आपल्यालाकडे आहे… इतर जन्मात आपण इंद्रियतृप्तीचा पूर्ण प्रमाणात आनंद घेतला आहे. या मानवी जीवनात आपण कोणता आनंद घेऊ शकतो? इतर जीवनात… अर्थात, डार्विनच्या सिद्धांतानुसार, मानवी जन्मा आधी माकडाचा जन्म होता. तर माकड… तुम्हाला अनुभव नाही. भारतामध्ये आम्हाला अनुभव आहे. प्रत्येक माकडाने जवळजवळ शंभर मुली मिळवल्या आहेत. शंभर, तर आम्ही आनंद मिळवण्यासाठी काय करू शकतो? प्रत्येक,त्यांचा कळप असतो, आणि प्रत्येक कळप, एका माकडाला कमीतकमी पन्नास, साठ पाचवीसपेक्षा कमी मिळत नाहीत. डुक्करांचे जीवन, त्यांना सुद्धा एक डझन मिळतात… डझन. आणि त्यांच्यात काही फरक नसतो, " माझी आई कोण आहे, माझी बहीण कोण आहे, माझे नातलग कोण आहेत." तुम्ही बघा? तर ते आनंद उपभोगत आहेत. तर तुम्हाला असे म्हणायचे आहे का की मनुष्य जीवन हे माकड आणि डुक्कर, मांजरी आणि कुत्री यांसारखे आहे. मानवी जीवनाची परिपूर्णता इंद्रियतृप्ती करण्यात आहे का? नाही. त्याचा आनंद आपण इतर योनीत घेतला आहे. आता? वेदांत सांगते, अथातो ब्रम्ह जिज्ञासा. हे जीवन ब्रम्हन विषयी चौकशी करणे आणि समजून घेण्यासाठी आहे. ब्रम्हन काय आहे? ईश्वर परम ब्रम्ह किंवा परम, ईश्वर परमः कृष्ण: (ब्रम्हसंहिता ५.१). आणि कृष्ण परब्रम्हन आहेत. ब्रह्मन, आपण सगळे ब्रह्मन आहोत, पण ते परब्रम्हन आहेत, सर्वोच्च ब्रह्मन. ईश्वर परमः कृष्ण: (ब्रम्हसंहिता ५.१). ज्याप्रमाणे तुम्ही सर्व अमेरिकन आहात. पण तुमचे राष्ट्राध्यक्ष जॉन्सन सर्वोच्च अमेरिकन आहेत.ते नैसर्गिक आहे. वेद सांगतात की सर्वांचे सर्वोच्च भगवंत आहेत. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् (कथा उपनिषद २.२.१३). देव कोण आहे? ते सर्वात परिपूर्ण शाश्वत आहेत, ते सर्वात परिपूर्ण जीवन शक्ती आहेत. ऐको बहूनाम विदधाति कामान. ऐको बहूनाम विदधाति कामान. एक शक्ती इतर सगळ्या जीवांच्या सर्व गरजा पुरवत आहे. ज्याप्रमाणे एका लहान कुटूंबात वडील पत्नी,मुले नोकर यांच्या गरजा पुरवतात. त्याचप्रमाणे, तुम्ही विस्तारित करा: सरकार किंवा राज्य किंवा राजा सर्व नागरिकांच्या गरजा पुरवतात. पण सर्वकाही अपूर्ण आहे. सर्वकाही अपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा पुरवू शकता, तुमच्या समाजाच्या पुरवू शकता, तुमच्या देशाच्या पुरवू शकता, पण तुम्ही सर्वांच्या गरजा पुरवू शकत नाही. पण लाखो, करोडो जीव आहेत. कोण अन्न पुरवत आहे? तुमच्या खोलीतील शेकडो, हजारो मुग्यांना कोण गरजा पुरवत आहे? कोण अन्न पुरवत आहे? जेव्हा तुम्ही ग्रीन लेकवर जाता, तेथे हजारो बदक असतात. त्यांची काळजी कोण घेत आहे? पण ते जिवंत आहेत. लाखो चिमण्या, पक्षी, पशू हत्ती आहेत. एका वेळी तो शंभर पौंड खातो. कोण अन्न पुरवत आहे? केवळ इथेच नाही, पण सर्वत्र लाखो करोडो ग्रह आणि विश्व आहेत. तो देव आहे. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् ऐको बहूनाम विदधाति कामान. प्रत्येकजण त्याच्यावर अवलंबून आहे, आणि तो सगळ्यांच्या गरजा पुरवत आहे, सर्व गरजा. सर्वकाही पूर्ण. या ग्रहांप्रमाणेच सर्वकाही पूर्ण आहे. पूर्णमदः पूर्णमिद पूर्णात् पूर्णमूदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते (ईषोपनिषद स्तवन ) प्रत्येक ग्रह असा बनवला आहे की तो स्वतःमध्येच परिपूर्ण आहे. समुद्र आणि महासागरामध्ये पाण्याचा साठा आहे. ते पाणी सूर्यप्रकाशाद्वारे घेतले जाते. फक्त इथे नाही, इतर ग्रहांवर सुद्धा ही प्रक्रिया चालू आहे. ते मेघामध्ये रूपांतरित केले जाते. नंतर संपूर्ण जमिनीवर वितरित केले जाते, आणि सर्वकाही भाज्या, फळे आणि झाडे उगवत आहेत. तर सर्वकाही पूर्ण व्यवस्था आहे. आपल्याला हे समजले पाहिजे की, सर्वत्र ही संपूर्ण व्यवस्था कोणी केली आहे. सूर्य योग्य वेळी उगवत आहे. चंद्र योग्य वेळी उगवत आहे, ऋतू योग्य वेळी बदलत आहेत. तर तुम्ही कसे म्हणू शकता? वेदामध्ये देव असल्याबाबतचा पुरावा आहे.