MR/Prabhupada 0300 - मूळ व्यक्ती मेली नाही

Revision as of 18:07, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture -- Seattle, October 2, 1968

प्रभुपाद: गोविन्दं आदिपुरुषमं तं अहं भजामि.

भक्त: गोविन्दं आदिपुरुषमं तं अहं भजामि.

प्रभुपाद: तर आपला कार्यक्रम सर्वोच्च मूळ व्यक्ती, गोविंदाची पूजा करणे हा आहे. हि कृष्णभावनामृत चळवळ, शोधून काढणे की मूळ व्यक्ती कोण आहे. स्वाभाविकता, प्रत्येकजण कुटुंबातील मूळ व्यक्ती, समाजातील मूळ व्यक्ती शोधून काढण्यास उत्सुक असतो. देशाची मूळ व्यक्ती, मानवतेची मूळ व्यक्ती… तुम्ही शोध करत जाल. पण जर तुम्ही मूळ व्यक्ती शोधून काढू शकलात ज्याच्यापासून सर्वकाही आले आहे ते ब्रह्मन् आहे. जन्माद्यस्य यतो (श्रीमद भागवतम १.१.१) वेदांत सूत्र सांगते ब्रह्मन्, संपूर्ण सत्य, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. खूप साधे वर्णन.

देव काय आहे, संपूर्ण सत्य काय आहे, खूप साधी व्याख्या - मूळ व्यक्ती. तर हि कृष्णभावनामृत चळवळ म्हणजे मूळ व्यक्तीच्या संपर्कात येणे. मूळ व्यक्ती मृत नाही. कारण सर्वकाही मूळ व्यक्तीपासून उत्पन्न होते, सर्वकाही अतिशय चांगले कार्य करत आहे. सूर्य उगवत आहे, चंद्र उगवत आहे, ऋतू बदलत आहेत, तर… रात्र आहे, दिवस आहे, नेमका क्रम आहे. मूळ व्यक्तीच्या शरीराचे कार्य छान सुरु आहे. तुम्ही कसे म्हणू शकता की देव मृत आहे? जसे तुमच्या शरीरात, जेव्हा वैद्य तुमची नाडी तपासून सांगतो की तुमच्या हृदयाचे ठोके छान चालले आहेत. तो जाहीर करत नाही की "हा माणूस मृत आहे." ते सांगतात, "हो, हा जिवंत आहे." त्याचप्रमाणे, जर तुम्ही पुरेसे हुशार असल्यास, विश्व् शरीराच्या नाडीचा अनुभव घेऊ शकता - आणि ते छान चालले आहे. तर तुम्ही कसे म्हणू शकता देव मृत आहे? देव कधीच मरत नाही. हा बदमाशांचा दृष्टीकोन आहे की देव मृत आहे - अज्ञानी व्यक्ती, अशी व्यक्ती जी समजत नाही की मृत किंवा जिवंत कसे जाणायचे. एखादी व्यक्ती जी समजू शकते की मृत किंवा जिवंत कसे जाणायचे, ती कधी म्हणणार नाही की देव मृत आहे. म्हणून भगवद्-गीतेमध्ये असे सांगितले आहे की: जन्म कर्म मे दिव्यमेवं यो जानाति तत्वतः (भ.गी. ४.९) "कोणतीही बुद्धिमान व्यक्ती जी सहजपणे समजू शकते, मी माझा जन्म कसा घेतो आणि कसे कार्य करतो," जन्म,कर्म… आता, या शब्दावर लक्ष द्या जन्म, आणि कर्म, काम. ते कधी म्हणत नाहीत जन्म मृत्यू. मृत्यू म्हणजे मरण. जे काही जन्माला येते, त्याचा मृत्यू होतो. सर्वकाही. आपल्याला असा अनुभव नाही की जो जन्माला येतो पण मरत नाही. हे शरीर जन्माला आले; म्हणजे ते मृत होणार. हे शरीर जन्म घेते, ते एक दिवस मरणार. मी माझे वय वाढवत आहे, माझ्या वयाच्या वर्षांची संख्या, म्हणजे मी मरत आहे. पण या भगवत गीतेच्या श्लोकात कृष्ण सांगतात जन्म कर्म, पण कधी नाही म्हणत "माझा मृत्यू." मृत्यू होऊ शकत नाही. देव चिरंतन आहे. तुम्ही देखील आहात, तुम्ही सुद्धा मरणार नाही. मी हे जाणत नाही. मी फक्त माझे शरीर बदलत आहे. तर हे जाणावे कृष्णभावनामृत शास्त्र हे महान शास्त्र आहे. हे सांगितले गेले आहे… हि नविन गोष्ट नाही., हे भगवद् गीतेत सांगितले आहे. तुमच्यापैकी बरेच जण, तुम्ही भगवद् गीतेशी चांगल्या प्रकारे परिचित आहात. भगवद् गीतेते, हे स्वीकारले नाही की मृत्यू नंतर हे शरीर… मृत्यू नक्कीच नाही - या शरीराचा नाश, जन्म किंवा मृत्यूनंतर. तुम्ही किंवा मी मरणार नाही. न हन्यते (भ.गी. २.२०)। न हन्यते म्हणजे "मरत नाही किंवा कधीही नष्ट होत नाही," अगदी या शरीराचा नाश झाल्यावरही. हि स्थिती आहे.